HomeशहरPresident Cup India 2026” टेनिस क्रिकेट स्पर्धेचा भव्य शुभारंभ

President Cup India 2026” टेनिस क्रिकेट स्पर्धेचा भव्य शुभारंभ

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते सलमान खान यांच्या मुख्य उपस्थितीत स्पर्धेचा शुभारंभ

३१ मार्च रोजी ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे होणार कार्यक्रम

खासदार आणि आयटीसीएसएफचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने स्पर्धांचे आयोजन

भाग्यवान प्रेक्षकांना दुचाकी आणि हजारो रुपयांची बक्षिसे

ठाणे दि.३० : टेनिस क्रिकेट स्पोर्ट फेडरेशन ऑफ इंडिया (ITCSF) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “President Cup India – 2026” या देशव्यापी टेनिस क्रिकेट स्पर्धेचा भव्य शुभारंभ येत्या ३१ मार्च २०२६ रोजी ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे संपन्न होणार आहे. या स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते, सुपरस्टार सलमान खान यांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे या उद्घाटन सोहळ्याला अधिकच आकर्षण प्राप्त होणार आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून या भव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असून, ते टेनिस क्रिकेट स्पोर्ट फेडरेशन ऑफ इंडिया (ITCSF) चे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली टेनिस क्रिकेटला राष्ट्रीय स्तरावर संघटित व व्यावसायिक ओळख मिळवून देण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न या स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे.

आयटीसीएसएफच्या माध्यमातून देशभरातील टेनिस क्रिकेट खेळाडूंना मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या स्पर्धेची सुरुवात करण्यात येत आहे. येत्या ३१ मार्च ते ५ एप्रिल या कालावधीत देशातील विविध राज्यांतील १६ संघांमध्ये ही स्पर्धा रंगणार असून, मोठ्या संख्येने खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे. ‘President Cup India’ स्पर्धेची बक्षीस रक्कम ४० लाखांवरून थेट १ कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा ऐतिहासिक निर्णय आयटीसीएसएफने घेतला आहे.

या स्पर्धेत महाराष्ट्र वॉरियर्स, पुणे पायराइट्स, बिहार ब्लास्टर्स, दिल्ली स्ट्राइकर्स, ड्रीम हरियाणा रॉयल्स, गुजरात लायन्स, कर्नाटक रॉयल किंग्स, केरळ वॉरियर्स, कोलकाता रायडर्स (वेस्ट बंगाल), मध्य प्रदेश टायगर्स, पूर्वांचल पँथर्स, राजस्थानी योद्धाज, रॉयल चॅलेंजर्स गोवा, सुप्रीम सुपर किंग्स (तमिळनाडू), यूपी नाइट्स आणि उत्तराखंड टायगर्स असे एकूण १६ संघ सहभागी होणार आहेत. विजेत्या संघाला १ कोटी रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार असून, स्पर्धेत कोट्यवधी रुपयांची बक्षिसे वितरित केली जाणार आहेत.

टेनिस क्रिकेट हा सर्वसामान्य तरुणांचा खेळ असून, ग्रामीण व शहरी भागातील अनेक प्रतिभावान खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर चमकण्याची ही सुवर्णसंधी ठरणार आहे. उद्घाटन सोहळ्याला क्रीडा क्षेत्रातील मान्यवर, विविध संघांचे खेळाडू तसेच मोठ्या संख्येने क्रिकेटप्रेमी उपस्थित राहणार असून, प्रवेश विनामूल्य ठेवण्यात आला आहे.

स्पर्धेत प्रेक्षक आणि खेळाडूंसाठी आकर्षक बक्षिसांचीही मेजवानी ठेवण्यात आली आहे. दररोज भाग्यवान प्रेक्षकांना दुचाकी तसेच हजारो रुपयांची रोख बक्षिसे दिली जाणार आहेत. याशिवाय स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना विशेष सन्मान देण्यात येणार असून ‘Player of the Series’ विजेत्याला Mahindra Thar ही कार प्रदान करण्यात येणार आहे, तर ‘Best Player’ ला दुचाकी दिली जाणार आहे. तसेच स्पर्धेदरम्यान विविध विशेष पारितोषिके आणि सरप्राईज गिफ्ट्सही दिली जाणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कांद्याचे भाव कोसळल्याने समृद्धी एक्स्प्रेस वे ३० मिनिटे रोखून धरला

शेतकरी आणि कामगार - अनेकांनी कांद्याचे हार घातले - एक्स्प्रेसवेवर जमले आणि निषेध सुरू केला.MLC अंबादास दानवे, शिवसेना (UBT) पदाधिकारी, शेतकरी आणि कामगारांसह...

पाकिस्तानच्या शान मसूदचा गेल्या २५ वर्षांतील महान क्रिकेटपटू निवडण्यासाठी आयसीसीच्या विशेष ज्युरीमध्ये समावेश करण्यात...

नवी दिल्ली: पाकिस्तानचा कसोटी कर्णधार शान मसूद याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) गेल्या २५ वर्षांतील महान आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंची निवड करण्यासाठी स्थापन करण्यात...

ग्राउंड स्टाफच्या 3 तासांच्या फ्लॅश स्ट्राइकमुळे AI प्रवासी मुंबई विमानतळावर अडकले आहेत

एअर इंडिया एअर सर्व्हिसेस लिमिटेडच्या ग्राउंड हँडलिंग कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले, 3 तास काम बंद केले टाइम्स न्यूज नेटवर्कमुंबई : एअर इंडिया, एअर इंडिया...

सोपानबाग सोसायटीसाठी प्रवेश रस्ता एक सापळा

पुणे: सोपानबाग येथील ताराबाग परिसरातील अनिका एसेन्शिया सोसायटीतील सुमारे ३०० रहिवाशांना वर्षातील बहुतांश काळ त्यांच्याच घरात अडकल्याचे जाणवते. संपूर्ण पावसाळ्यात अनेक आठवडे परिस्थिती अधिकच...

लियाम हेम्सवर्थसह मायली सायरसचे कथित लीक झालेले डीएम सध्या इंटरनेट खंडित करत आहेत

एक व्हायरल स्क्रीनशॉट कथितपणे लियाम हेम्सवर्थ मायली सायरसला पैशासाठी संदेश देत असल्याचे दाखवत असून, त्यांच्या पूर्वीच्या नात्याबद्दल लोकांमध्ये पुन्हा आकर्षण निर्माण झाले आहे....

error: Content is protected !!