- शिवसेना उल्हासनगर तर्फे सामाजिक उपक्रम.
उल्हासनगर दि २ : शिवसेना उल्हासनगर शहराचे महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करण्यात आली. या सामाजिक उपक्रमाचे उद्घाटन राजेंद्र चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. हा उपक्रम शिवसेनेच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजक विभागप्रमुख सुनील सिंग (कलवा) आणि ज्ञानेश्वर मरसाळे (माऊली) होते.

कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती उपजिल्हाप्रमुख दिलीप गायकवाड, उत्तर भारतीय शहर संघटक केडी तिवारी, उपविभाग प्रमुख सागर पगारे,. दिलीप अवसरे, पप्पू जाधव, विजय चौरे, अमोल सरदार, विजय पवार, कैलास म्हात्रे, बाळा ठाकरे व चरणसिंग लबाना यांची होती. शाखा प्रमुख सुभाष मरसाळे, बाबूलाल यादव, धर्मदेव ठाकूर, रवी सौदागर, हरि पवार, कुलदीप सिंग लबाना, गणेश काकडे आणि उपशाखा प्रमुख गणेश साळवे, राहुल सौदागर, प्रकाश ससाने, अशोक उमाप, अजय ननवरे, सुरेश खरात, रोहित खरात आदी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. फळे वाटप करताना राजेंद्र चौधरी यांनी रुग्णालयात ऍडमिट असणाऱ्या रुग्णांची विचारपूस देखील केली.

या उपक्रमातून समाजात सेवा, मदत आणि बांधिलकी यांचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला. शिवसेनेच्या वतीने दरवर्षी अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असून, ही परंपरा पुढेही सुरु राहील, असा विश्वास विभागप्रमुख सुनील सिंग (कलवा) व ज्ञानेश्वर मरसाळे (माऊली) यांनी व्यक्त केला.





























