अंबरनाथ दि. १ ( प्रमोद दळवी ) : अत्यंत चपळ आणि दुर्मिळ समजला जाणारा तस्कर हा साप अंबरनाथ पूर्व येथील रिलायन्स रेसिडेन्सीच्या सोसायटी मधील पार्किंग मधून पकडण्यात सर्पमित्र आकाश गोहिल यांना यश आल्या असून त्या सापाला दाट जंगलात सोडण्यात आले आहे.

अंबरनाथ पूर्व येथील रिलायन्स रेसिडेन्सीच्या सोसायटीच्या पार्किंग मध्ये साप असल्याची माहिती सर्पमित्र आकाश गोहिल यांना देण्यात आली. आकाश याने त्वरित त्या ठिकाणी जाऊन पार्किंग मध्ये लपून बसलेला सापाला त्वरित पकडले. पकडण्यात आलेला तो साप पाच फूट लांबीचा दुर्मिळ तस्कर जातीचा साप आहे. तो साप बिनविषारी असून प्रथमच इतका लांब स्वरूपाचा हा साप सापडला असल्याचे आकाश यांनी सांगितले. हा साप पूर्णपणे बिनविषारी असून तो जास्त बेडूक आणि उंदर खाणारा साप आहे.

या आधी देखील आकाश याने दुर्मिळ तस्कर जातीचे साप छोट्या आकाराचे पकडले होते. पण ही पहिलीच वेळ आहे की इतका लांबीचा साप मिळाला असून त्याला दाट जंगलात सोडण्यात आले आहे. हा साप काल रात्री अकरा वाजता पकडण्यात आला होता. या सापाला तस्कर साप का म्हणतात याचे कारण तो इतक्या चपळाईने नेऊन शिकार करतो की तो साप जास्त कोणाला दिसत नाही. पकडण्यात आलेला हा साप मांदा साप होता. सर्पमित्र आकाश यांनी सोसायटीच्या पार्किंग मधून तो साप शोधून पकडल्याने नागरिकांच्या मनातली भीती दूर झाली आहे. त्या सापाला दाट जंगलात सोडण्यात आले आहे.





























