Homeशहरविजेच्या तारांवर आणि घरांवर पसरलेल्या झाडांच्या फांद्या तात्काळ छाटने-मनसे

विजेच्या तारांवर आणि घरांवर पसरलेल्या झाडांच्या फांद्या तात्काळ छाटने-मनसे

  • जीर्ण झालेल्या झाडांची योग्य विल्हेवाट लावणे बाबत संबंधित विभागांना मनसेचे निवेदन.
  • भविष्यात कोणती दुर्घटना घडल्यास संबंधित विभाग सर्वस्वी जबाबदार.

उल्हासनगर दि ३० : प्रभाग समिती क्रमांक १, पॅनल क्रमांक १ येथील एम.आय. डी.सी रस्त्यावरील सर्वच झाडे जीर्ण आणि कमवकुत झालेली आहेत सदर झाडे ही कधीही मोडून पडू शकतात त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनांवर,लोकांच्या अंगावर अशी झाडे कोसळून दुर्घटना होऊन जीवित किंवा वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत  नाही.

संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनपूर्व अवकाळी पावसाने थैमान घातलेले आहे,धोकादायक ईमारती, वृक्ष कोसळण्याचे सत्र सुरू झाले आहे,आपल्या शेजारच्या अंबरनाथ शहरात तर एक व्यक्ती लघवी करत असतांना विजेचा धक्का लागून मृत्यू मुखी पडला त्यानंतर त्या घटनेला जबाबदार धरून संबंधित विभागाचा अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर गुन्हा देखील नोंद करण्यात आलेला आहे.

आपल्या उल्हासनगर शहरात ही अनेक ठिकाणी विजवाहिन्यांच्या खाली झाडे असल्याने पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वादळ,जोराचा वारा यामुळे त्या झाडांच्या फांद्या वीज वाहिन्यांमध्ये घुसून विजेच्या तारांमध्ये आप-आपसांमध्ये घर्षण होऊन शॉकसर्किट झाल्याने तासंतास विजेचा खोळंबा होतो, झाडामध्ये करंट पसरल्याने जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

भविष्यातील अप्रिय घटना टाळायच्या असतील तर संबंधित अधिकाऱ्यांनी मुख्य रस्त्यांवरील, गल्ल्यांमधील  विद्युतवाहिन्यांच्या जवळून तसेच विद्युत वाहिन्यांच्या खाली असलेल्या झाडांच्या फांद्या तात्काळ छाटून घेण्याचे संबंधितांना आदेश द्यावेत.  शिवनेरी नगर, तानाजीनगर, एम.आय.डी.सी रस्त्यावरील अनेक लोकांनी या झाडांच्या फांद्या छाटण्या बाबत,या जीर्ण झालेल्या झाडांची विल्हेवाट लावण्याबाबत उल्हासनगर महानगर पालिकेच्या संबंधित विभागांकडे वारंवार पाठपुरावा केलेला आहे,परंतु सर्व काही कायदेशीर कारवाई झालेली असतांना,झाडांवर कारवाईच्या नाहरकतीच्या नोटीस प्रसिद्ध करून झाल्यानंतर आणि झाडांच्या फांद्या छाटण्यासाठी तसेच जीर्ण झालेल्या झाडांची विल्हेवाट लावण्यासाठी कोणाचीही हरकत नसतांना सुद्धा या धोकादायक, जीवघेण्या जीर्ण झालेल्या झाडांवर उल्हासनगर महानगर पालिका प्रशासनाच्या वतीने निर्णायक कारवाई केली जात नाही.

पावसाळ्याचे दिवस असल्याने वादळ, वारा यामुळे आपल्या शहरात तसेच आजू-बाजूंच्या शहरांमध्ये झाडे पडून दुर्घटना घडत आहेत. एम.आय.डी.सी रस्त्यावरील या जीर्ण झालेल्या झाडांमुळे ही भयंकर दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी आणि उल्हासनगर महानगर पालिका प्रशासनाने तात्काळ या महत्वपूर्ण विषयावर तोडगा काढावा अन्यथा कोणतीही अप्रिय घटना घडल्यास संबंधीत विभागाचे अधिकारी सदर घटनेला सर्वस्वी जबाबदार असतील अश्या आशयाचे निवेदन मनसे तर्फे संबंधित विभागांना देण्यात आले. यावेळी मनसेचे महानगर संघटक मैनुद्दीन शेख, वाहतूक सेनेचे शहर संघटक काळु थोरात, विभाग अध्यक्ष कैलास घोरपडे, कैलास वाघ, शाखा अध्यक्ष संजय नार्वेकर, जगदीश माने, मनोज चिंचनकर उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘चार जणांच्या कुटुंबात, आम्ही सर्व एकाच स्वप्नात जगलो’: केएस भरतने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा...

भारताचे केएस भरत (पीटीआय फोटो/आर सेंथिलकुमार) भारतीय यष्टीरक्षक-फलंदाज केएस भरतने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे, ज्याने त्याला देशासाठी सात कसोटी सामने खेळताना...

वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर बेस्ट बसने दिलेल्या धडकेत ॲप कॅब चालकाचा मृत्यू झाला

मालाड पूर्व येथे पश्चिम द्रुतगती महामार्गावर बेस्ट बसने धडक दिल्याने ॲप कॅब चालकाचा मृत्यू झालामालाड पूर्व येथे पश्चिम द्रुतगती महामार्गावर बेस्ट बसने धडक...

घोषणेनंतर चार वर्षांनी, रांजणगाव येथील इलेक्ट्रॉनिक क्लस्टरमध्ये पायाभूत कामांना वेग आला

297 एकरांमध्ये पसरलेल्या या प्रकल्पात एकूण 492 कोटी रुपयांची गुंतवणूक आहे, ज्यामध्ये MIDC 285 कोटी आणि केंद्राचा 208 कोटी रुपयांचा वाटा आहे. पुणे...

व्यक्तिमत्व चाचणी: तुम्ही ग्राउंड, भावनिकदृष्ट्या दूर, स्वप्न पाहणारे, बंडखोर, नियंत्रण करणारे, संवेदनशील, तापट किंवा...

आपल्यापैकी बऱ्याच जणांना वाटते की आपल्याला काही विशिष्ट रंग “आवडतात”, परंतु बऱ्याचदा, आपण ज्या शेड्स काढल्या जातात त्या आपल्या आंतरिक जगाबद्दल आपल्या...

आयटी फर्मच्या हिंजवडी शाखेने प्रोजेक्टशिवाय अनेक फ्रेशर्सना कामावर घेतले, सरकारच्या आयटी कॉन्ट्रॅक्टवर डोळा: हिंजवडी...

सीईओला मंगळवारी त्यांच्या नाशिकमधील आडगाव येथील निवासस्थानातून ताब्यात घेण्यात आले आणि रात्री त्यांना पुण्यात आणण्यात आले, त्यानंतर बुधवारी फसवणूक प्रकरणात त्यांना औपचारिक अटक...

error: Content is protected !!