( प्रमोद दळवी )
उल्हासनगर दि.०१ : महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त उल्हासनगरातील सुभाष टेकडी येथे निर्माण मजदूर संघटनेच्या वतीने सुभाष टेकडी नाका कामगारांनी भव्य रॅली काढली होती. त्यावेळी कामगार एकजूटीचा विजय असो असा नारा देत कामगारांनी कामगार दिनानिमित्त एकमेकांना शुभेच्छा देत आपला आनंद व्यक्त केला.

सुभाष टेकडी कामगार अध्यक्ष रमेश आखाडे, संस्थापक अध्यक्ष मधुकांत पाथारिया, केंद्रीय अध्यक्ष दामोदर गायकवाड, केंद्रीय सचिव मदन केदारे, केंद्रीय उपाध्यक्ष नाना आहिरे, केंद्रीय महिला आघाडी अध्यक्ष लक्ष्मी नाईक, यांच्या मार्गदर्शनाखाली निर्माण मजदूर संघटनेच्या वतीने सुभाष टेकडी नाका कामगार यांनी महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त भव्य रॅली काढण्यात आली होती. ही रॅली भरत नगर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंत काढण्यात आली. त्यावेळी सर्व कामगारांनी कामगार एकताचा विजय असो, असा नारा देत महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या एकमेकांना शुभेच्छा दिल्या. त्यावेळी मा. नगरसेवक प्रशांत धांडे व कामगारांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच मा. नगरसेवक प्रशांत धांडे यांनी कामगारांना मार्गदर्शन केले.

या रॅलीमध्ये केंद्रीय उपाध्यक्ष नाना आहिरे. सुभाष टेकडी कामगार नाका अध्यक्ष रमेश आखाडे, उपाध्यक्ष राजू कदम, महिला अध्यक्ष मीनाक्षी आहिरे, प्रशांत गायकवाड, खजिनदार कैलास पळसपगार, ज्येष्ठ कामगार दिलीप शिरसाठ, सल्लागार व मार्गदर्शक नारायण आहिरे, आधी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. रॅली नंतर सर्व कामगारांना अल्प उपहार देऊन त्या ठिकाणाहून सर्व कामगार उल्हासनगरातील खेमानी येथे आयोजित करण्यात आलेल्या कामगार मेळाव्यासाठी गेले.





























