Homeताज्या बातम्याआयपीएस अधिकारी देवेन भारती यांची मुंबई पोलिस आयुक्तपदी नियुक्ती

आयपीएस अधिकारी देवेन भारती यांची मुंबई पोलिस आयुक्तपदी नियुक्ती

मुंबई दि.३० : मुंबई पोलिस आयुक्तपदी  वरिष्ठ आयपीएस अधिकारी देवेन भारती यांची  नियुक्ती करण्यात आली आहे. १९९४ च्या बॅचचे देवेन भारती हे आयपीएस अधिकारी आहेत.

३० एप्रिल रोजी मुंबईचे  पोलीस आयुक्त विवेक फणसळकर निवृत्त झाले आहेत. १९८९ तुकडीचे अधिकारी असलेल्या फणसळकर यांच्यानंतर मुंबईचे पुढील पोलीस आयुक्त कोण, याची चर्चा सुरू होती. त्यानंतर गृह विभागाने देवेन भारती यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. सदानंद दाते, अर्चना त्यागी संजयकुमार वर्मा, रितेश कुमार, या वरिष्ठ अधिकारी यांच्या नावांची चर्चा असतानाच देवेन भारती यांच्याकडे मुंबई पोलीस दलाची सुत्रे सोपवण्यात आली आहेत. भारती यांच्याकडे दोन वर्षांपासून मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त हे पद देखील आहे. देवेन भारती हे महाराष्ट्रातील एक गतिमान पोलीस अधिकारी म्हणून गणले जातात.

देवेन भारती हे मुंबईचे सर्वात जास्त काळ सह पोलिस आयुक्तपदी (कायदा आणि सुव्यवस्था) आहेत. एवढेच नाही तर भारती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खूप जवळचे मानले जातात. त्यानतंर आता मुख्यमंत्र्यांनी भारतींवर मोठी जबाबदारी सोपवली आहे. देवेन भारती यांनी २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यांसह आणि पत्रकार जे डे यांच्या हत्येसह अनेक हाय-प्रोफाइल प्रकरणांचा तपास केला आहे.

दोन वर्षापूर्वी दिल्लीच्या धर्तीवर मुंबईतही विशेष पोलीस आयुक्त पदाची निर्मिती करण्यात आली होती. त्यानंतर देवेन भारती हे या मुंबई पोलीस दलातील विशेष पोलीस आयुक्तपदावर बसणारे पहिले आयपीएस अधिकारी ठरले आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ते मुंबई पोलिस दलात सहआयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) आणि एटीएस प्रमुख अशा महत्त्वाच्या पदांवर कार्यरत होते. मात्र, महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर देवेन भारती यांची वाहतूक विभागात सहआयुक्तपदी नियुक्ती केली गेली. बदलीच्या सव्वा महिन्यानंतर त्यांची अप्पर पोलिस महासंचालक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळावर नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर मुंबई पोलिस दलाच्या इतिहासात प्रथमच विशेष पोलिस आयुक्तपद निर्माण करण्यात आले त्यावर देवेन भारतींची नियुक्ती करण्यात आली आहे .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मुंबईत टरबूज खाल्ल्यानंतर एका कुटुंबातील ४ जणांचा संशयास्पद अन्नातून विषबाधा होऊन मृत्यू झाला

मुंबई: पती (40), पत्नी (35) आणि 16 आणि 13 वर्षांच्या दोन मुलींचा रविवारी संशयास्पद अन्नातून विषबाधा झाल्यामुळे चार जणांच्या कुटुंबाचा मृत्यू झाला,...

PCMC 60 कोटी बिलांची रांग: मुख्य लेखाधिकारी विभागाच्या अधिकाऱ्यांवर ठपका ठेवतात

पुणे: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या (पीसीएमसी) लेखा विभागात यावर्षी 30 मार्च रोजी 60 कोटी रुपयांची बिले मंजूर करण्यात आलेल्या अनियमिततेची गेल्या आठवड्यात चौकशी समितीने पुष्टी...

आयपीएल 2026: ‘क्रिकेट उपकरणाचा गैरवापर’ – एलएसजी विरुद्ध केकेआर सामन्यात वादग्रस्त बाद झाल्यानंतर आंक्रिश...

अंपायर्ससोबत चर्चा करताना आंगकृष्ण रघुवंशी (पीटीआय फोटो) नवी दिल्ली: कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणाऱ्या आंग्रश रघुवंशीला लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान आयपीएल आचारसंहिता मोडल्याबद्दल...

हा लहान मुलगा त्याच्या वाढदिवसाच्या केकला ‘नाही’ म्हणाला तोपर्यंत…: पुढे जे घडले ते पालकांसाठी...

मोठे झाल्यावर, आम्ही उत्सवाचे मोजमाप भव्य सजावट, उत्तम प्रकारे नियोजित कार्ये आणि पार्ट्या किंवा महागड्या भेटवस्तूंद्वारे करतो. पण लहानांसाठी, केकचा आकार किंवा...

शहरी जैवविविधतेला चालना देण्यासाठी NIBM रोड परिसरात मियावाकी जंगलाची योजना केली आहे

पुणे: दाट, स्थानिक वृक्षारोपणाद्वारे शहरी जैवविविधता बळकट करण्याच्या व्यापक प्रयत्नाचा एक भाग म्हणून पुणे वन विभाग आनंदवन फाउंडेशनच्या सहकार्याने NIBM रोडलगत एक हेक्टर जागेवर...

error: Content is protected !!