Homeशहरबदलापूर पुर्व येथील सोनार यांची दागिन्यांची फसवणूक करून अपहार करणाऱ्या आरोपीस गुन्हे...

बदलापूर पुर्व येथील सोनार यांची दागिन्यांची फसवणूक करून अपहार करणाऱ्या आरोपीस गुन्हे शाखा घटक – ४ कडून अटक :१ कोटी १२ लाख ४२ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत

उल्हासनगर दि. १४ ( प्रमोद दळवी )  : बदलापूर पूर्व परिसरातील आपटेवाडी रोड येथील मोरया ज्वेलर्स तसेच त्यांच्याकडे दागिने घेऊन आलेल्या ग्राहकांची फसवणूक करून दागिन्यांचा अपहार करणाऱ्या फरार आरोपीस गुन्हे शाखा, घटक-४, उल्हासनगरच्या पथकाने अहिल्यानगर येथून अटक केली आहे. रोहित मल्हारी आंधळे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३३८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३१८(४), ३१६(२) व ३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी रोहित आंधळे याने मोरया ज्वेलर्सचे मालक तसेच त्यांच्याकडे आलेल्या ग्राहकांचा विश्वास संपादन केला. या विश्वासाचा गैरफायदा घेत त्याने सोन्याचे दागिने स्वतःकडे घेतले आणि त्यांचा अपहार केल्याचा आरोप आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाला होता. दरम्यान, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखा, घटक-४, उल्हासनगरकडून या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू होता. तपासादरम्यान गुन्ह्यातील फरार आरोपी अहिल्यानगर येथे लपून बसल्याची गोपनीय माहिती पोलीस हवालदार मंगेश जाधव यांना मिळाली. या माहितीच्या आधारे वरिष्ठांच्या आदेशाने गुन्हे शाखेचे पथक अहिल्यानगर येथे रवाना करण्यात आले.पथकाने अहिल्यानगर परिसरात आरोपीचा शोध घेतला असता रोहित मल्हारी आंधळे हा पोलिसांच्या हाती लागला. त्यास ताब्यात घेऊन दि. २९ जुलै २०२६ रोजी अटक करण्यात आली.

अटकेनंतर आरोपीकडे पोलिसांनी अधिक तपास केला असता, त्याने फिर्यादी तसेच त्यांच्या ग्राहकांकडील दागिने फसवणूक करून घेतल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यास दि. १० ऑगस्ट २०२६ पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली होती.पोलीस कोठडीदरम्यान आरोपी रोहित मल्हारी आंधळे याच्याकडून पोलिसांनी मोठी कारवाई करत फसवणुकीतील १ कोटी १२ लाख ४२ हजार २८३ रुपये किमतीचे तब्बल ८६५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. या कारवाईमुळे दागिने फसवणूक प्रकरणातील महत्त्वाचा पुरावा पोलिसांच्या हाती लागला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीरंग गोसावी गुन्हे शाखा घटक-४, उल्हासनगर हे करीत आहेत.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली उल्लेखनीय कामगिरी

ही कारवाई डॉ. पंजाबराव उगले, पोलीस सहआयुक्त (गुन्हे), अमरसिंह जाधव, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) आणि शेखर बागडे, सहाय्यक पोलीस आयुक्त (शोध-१) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश गज्जल, सपोनि श्रीरंग गोसावी, पोउनि अशोक पवार, सपोउनि बबन बांडे, पोहवा गणेश गावडे, पोहवा राजेंद्र थोरवे, पोहवा मंगेश जाधव, पोहवा योगेश वाघ, पोहवा अशोक थोरवे, पोहवा प्रकाश पाटील, पोहवा रितेश वंजारी, पोहवा सतीश सपकाळे, पोहवा अमर कदम, पोहवा चंद्रकांत सावंत, पोहवा सुरेश जाधव, पोहवा शेखर भावेकर, पोहवा मिलिंद हिंदूराव, पोहवा किशोर पाटील, पोशि विक्रम जाधव, पोशि बाबूलाल जाधव, पोशि प्रसाद तोंडलीकर, पोशि संजय शेरमाळे, पोशि रेवणनाथ शेकडे, पोशि रामदास उगले, मपोहवा मिनाक्षी खेडेकर, मपोना कुसुम शिंदे आणि मपोशि मनोरमा सावळे यांचा समावेश असलेल्या पोलीस पथकाने ही कामगिरी बजावली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

हर घर तिरंगा २०२६’ मोहिमेत फाळणी दिवस प्रदर्शन व कँडल मार्चचे आयोजन

उल्हासनगर दि. १४ ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगर महानगरपालिकेच्या वतीने ‘हर घर तिरंगा २०२६’ मोहिमेअंतर्गत शुक्रवार, दि. १४ ऑगस्ट २०२६ रोजी सिंधू भवन,...

उल्हासनगर महानगरपालिकेचे मा. सचिव प्रकाश कुकरेजा यांना वाढदिवसानिमित्त राजेंद्रसिंह भुल्लर (महाराज) यांनी दिल्या शुभेच्छा

उल्हासनगर दि. १३ ( प्रमोद दळवी )  : प्रजा कृपा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच उल्हासनगर महानगरपालिकेचे मा. सचिव प्रकाश कुकरेजा यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना शहरप्रमुख...

मध्यवर्ती रुग्णालयात पहिली एंडोस्कोपिक सेप्टोप्लास्टी शस्त्रक्रिया यशस्वी : उल्हासनगरच्या आरोग्यसेवेत अत्याधुनिक सुविधेची भर

उल्हासनगर दि. १३ ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयातील वैद्यकीय सेवांच्या दृष्टीने एक महत्त्वाचा आणि अभिमानास्पद टप्पा गाठण्यात आला आहे. शासकीय वैद्यकीय...

‘हर घर तिरंगा २०२६’ अभियानांतर्गत उल्हासनगरमध्ये भव्य बाईक रॅली : राष्ट्रभावनेचा जागर

उल्हासनगर दि. १३ ( प्रमोद दळवी ) : ‘हर घर तिरंगा २०२६’ अभियानांतर्गत नागरिकांमध्ये राष्ट्रभावना निर्माण व्हावी, देशप्रेमाची भावना वृद्धिंगत व्हावी तसेच राष्ट्रीय ध्वजाबद्दल...

एक हात मदतीचा सामाजिक संस्थेच्या मागणीला यश ; महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना लवकरच गणवेश व...

उल्हासनगर दि.१३ ( प्रमोद दळवी )  : शाळा सुरू होऊन जवळपास दीड महिना उलटूनही उल्हासनगर महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना अद्याप गणवेश व आवश्यक शैक्षणिक साहित्य...

error: Content is protected !!