Homeशहरअंबरनाथमध्ये शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमण नियमितीकरणाबाबत उपविभागीय दंडाधिकारी यांच्या दालनात बैठक :...

अंबरनाथमध्ये शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमण नियमितीकरणाबाबत उपविभागीय दंडाधिकारी यांच्या दालनात बैठक : शासन निर्णयाचा घेण्यात आला सविस्तर आढावा

अंबरनाथ दि. २४ ( प्रमोद दळवी ) : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे तसेच कल्याण लोकसभेचे कार्यसम्राट, संसदरत्न खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार अंबरनाथ विधानसभा क्षेत्रातील शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्याच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या अध्यक्षतेखाली उपविभागीय दंडाधिकारी यांच्या दालनात ही बैठक पार पडली.

बैठकीत महाराष्ट्र शासनाने शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्यासंदर्भात जारी केलेल्या शासन निर्णयाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. विशेषतः १ जानेवारी २०११ पर्यंत अस्तित्वात असलेल्या निवासी अतिक्रमणांचे नियमानुसार नियमितीकरण करण्याच्या प्रक्रियेवर भर देण्यात आला. यावेळी अतिक्रमण नियमित करण्यासाठी आवश्यक असलेली पात्रता, जागेची कमाल मर्यादा व आकारण्यात येणारे शुल्क, अर्ज स्वीकारण्याची व पडताळणीची प्रक्रिया, जागेची मोजणी करण्याची कार्यपद्धती तसेच अर्जाचे नमुने (फॉर्म) वाटप आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी संबंधित अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांना शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार पात्र लाभार्थ्यांना न्याय मिळेल यासाठी समन्वयाने काम करण्याचे निर्देश दिले.

या बैठकीस उपनगराध्यक्ष सदाशिव पाटील, शिवसेना गटनेते रवींद्र कारंजुळे, नगरसेवक सुभाष साळुंके, कुणाल भोईर, स्वप्निल बागुल, सचिन पाटील, रोहित महाडिक, पूनम शेलार, माजी नगरसेवक संदीप लकडे, विभागप्रमुख सचिन गुडेकर, किसन गायकर, विनोद शेलार, सुधीर कन्हारे, शैलेश शिर्के, विकास कानडे, संजय जाधव, शिवाजीनगर रहिवासी संघाचे पदाधिकारी व रहिवासी तसेच संबंधित विभागातील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीमुळे अंबरनाथ विधानसभा क्षेत्रातील शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्याच्या प्रक्रियेला अधिक गती मिळणार असून, शासनाच्या निर्णयाचा लाभ पात्र नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी समन्वयाने कार्यरत राहणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

CJP च्या आज पुण्यात निषेध रॅली, काँग्रेसचा पाठिंबा

शुक्रवारी दुपारी ३ ते ७ या वेळेत निघालेली रॅली शनिवारवाड्यापासून निघून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर समारोप होईल. पुणे : नवी दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू...

१ जानेवारी २०११ पूर्वीच्या शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणांच्या नियमितीकरणासाठी ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत अर्जाची...

उल्हासनगरात नियमितीकरणाबाबत आमदार कुमार आयलानी यांच्या अध्यक्षतेखाली उपविभागीय कार्यालयात आढावा बैठक संपन्न उल्हासनगर दि. २४ ( प्रमोद दळवी )  : महाराष्ट्र शासनाच्या महसूल व...

‘मुंबई की पुलिस, दिल्ली जैसी नहीं है’: सीजेपीच्या निषेधादरम्यान पोलिस व्हॅन थांबवणारी रिया अहिर

मुंबई: “मुंबई की पोलिस, दिल्ली की पुलिस जैसी नहीं है,” रिया अहिर म्हणाली, बुधवारी मुंबईत चालत्या पोलिस व्हॅनसमोर उभी असलेली महिला, सीजेपीच्या...

माइंडफुलनेस रिट्रीट्स: माइंडफुलनेसमध्ये स्वारस्य जसजसे वाढत जाते, तसतसे आत्म-जागरूकतेच्या माघारामुळे सहभाग वाढतो | पुणे...

भावनिक तंदुरुस्ती, तणाव व्यवस्थापन आणि जागरूक जीवनाभोवती वाढणारी संभाषणे अधिक लोकांना संरचित आत्म-जागरूकता आणि ध्यान कार्यक्रम शोधण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत.गेल्या काही वर्षांमध्ये,...

कुस्तीच्या मॅट्सपासून ते अष्टकोनापर्यंत: टायरेल फॉर्च्यूनला का विश्वास आहे की त्याचे सर्वात मजबूत शस्त्र...

टायरेल फॉर्च्यूनने स्वत:ला UFC हेवीवेट रँकिंगमध्ये चढत असल्याच्या खूप आधी, त्याने आधीच कुस्ती मॅटवर प्रतिष्ठा निर्माण केली होती. कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावर दोन...

error: Content is protected !!