Homeशहर१ जानेवारी २०११ पूर्वीच्या शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणांच्या नियमितीकरणासाठी ३१ डिसेंबर २०२६...

१ जानेवारी २०११ पूर्वीच्या शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणांच्या नियमितीकरणासाठी ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत अर्जाची संधी

  • उल्हासनगरात नियमितीकरणाबाबत आमदार कुमार आयलानी यांच्या अध्यक्षतेखाली उपविभागीय कार्यालयात आढावा बैठक संपन्न

उल्हासनगर दि. २४ ( प्रमोद दळवी )  : महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने शासकीय जमिनीवरील १ जानेवारी २०११ पर्यंत झालेल्या निवासी अतिक्रमणांच्या नियमितीकरणासाठी जारी केलेल्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने उल्हासनगर उपविभागीय कार्यालयात विधानसभा क्षेत्रस्तरीय आढावा समितीची बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी आमदार कुमार आयलानी होते.

या बैठकीला तहसीलदार, नगर भूमापन अधिकारी, उल्हासनगर महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त, महावितरणचे उपअभियंता तसेच उपविभागीय अधिकारी (सदस्य सचिव) उपस्थित होते. शासन निर्णयातील विविध तरतुदींचा सविस्तर आढावा घेऊन नियमितीकरणाची प्रक्रिया अधिक प्रभावीपणे राबविण्याबाबत चर्चा करण्यात आली. बैठकीत स्पष्ट करण्यात आले की, केवळ राहण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या निवासी अतिक्रमणांनाच नियमितीकरणाचा लाभ मिळणार असून आरक्षित जमिनीवरील बांधकामे या योजनेस पात्र ठरणार नाहीत. तसेच १ जानेवारी २०११ किंवा त्यापूर्वीची अतिक्रमणेच ग्राह्य धरली जाणार आहेत. दुकाने, गोदामे, हॉटेल किंवा इतर व्यावसायिक अतिक्रमणांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

अतिक्रमणाचा पुरावा म्हणून मतदार यादी, वीज बिल, कर पावती, शासकीय कागदपत्रे किंवा अन्य मान्य अभिलेख सादर करणे आवश्यक राहील. एका कुटुंबाला या योजनेचा लाभ केवळ एकदाच मिळणार आहे. शासन निर्णयानुसार ५०० चौरस फूटपर्यंतच्या निवासी अतिक्रमणांचे नियमितीकरण पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहे. ५०० ते १५०० चौरस फूट क्षेत्रासाठी निर्धारित मूल्याच्या १० टक्के शुल्काची आकारणी केली जाईल. मात्र १५०० चौरस फूटांपेक्षा अधिक क्षेत्रफळावरील अतिक्रमणे नियमित केली जाणार नाहीत. नियमित झालेल्या जमिनीचे हस्तांतरण (विक्री, दान किंवा अन्य प्रकारे) पुढील पाच वर्षांपर्यंत करता येणार नाही. या नियमाचे उल्लंघन झाल्यास संबंधित मालमत्ता शासनाच्या ताब्यात जाईल. तसेच सार्वजनिक उपयोगाची जमीन, रस्ते, नाले, नद्या, वनजमीन, रेल्वेची जागा, राष्ट्रीय व राज्य महामार्गांवरील अतिक्रमणांना नियमितीकरणाचा लाभ मिळणार नसल्याचेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

नागरिकांनी निश्चित मुदतीत संबंधित प्राधिकरणाकडे अर्ज सादर करणे बंधनकारक असून अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे आणि शपथपत्र जोडणे आवश्यक राहील. अर्ज प्राप्त झाल्यानंतर संबंधित जागेचे निःशुल्क सर्वेक्षण करून प्रत्यक्ष क्षेत्रफळ निश्चित केले जाईल. त्यानंतर जिल्हास्तरीय समिती अर्जांची छाननी करून अंतिम निर्णय घेणार आहे. नियमितीकरणानंतर संबंधित जमिनीचा वापर केवळ निवासी उद्देशासाठीच करता येईल.बैठकीत नागरिकांना ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत नियमितीकरणासाठी अर्ज करता येणार असल्याची माहिती देण्यात आली. घराचे मोजमाप (सर्वे) पूर्णपणे निःशुल्क करण्यात येणार असून अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे आणि इतर मार्गदर्शनासाठी उल्हासनगर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती कार्यालयांमध्ये वन विंडो सुविधा केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी आमदार कुमार आयलानी यांनी शासनाच्या या निर्णयाचा जास्तीत जास्त पात्र नागरिकांनी लाभ घ्यावा, वेळेत अर्ज सादर करावेत आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून नियमितीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

CJP च्या आज पुण्यात निषेध रॅली, काँग्रेसचा पाठिंबा

शुक्रवारी दुपारी ३ ते ७ या वेळेत निघालेली रॅली शनिवारवाड्यापासून निघून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर समारोप होईल. पुणे : नवी दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू...

अंबरनाथमध्ये शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमण नियमितीकरणाबाबत उपविभागीय दंडाधिकारी यांच्या दालनात बैठक : शासन निर्णयाचा...

अंबरनाथ दि. २४ ( प्रमोद दळवी ) : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे तसेच कल्याण लोकसभेचे कार्यसम्राट, संसदरत्न खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार...

‘मुंबई की पुलिस, दिल्ली जैसी नहीं है’: सीजेपीच्या निषेधादरम्यान पोलिस व्हॅन थांबवणारी रिया अहिर

मुंबई: “मुंबई की पोलिस, दिल्ली की पुलिस जैसी नहीं है,” रिया अहिर म्हणाली, बुधवारी मुंबईत चालत्या पोलिस व्हॅनसमोर उभी असलेली महिला, सीजेपीच्या...

माइंडफुलनेस रिट्रीट्स: माइंडफुलनेसमध्ये स्वारस्य जसजसे वाढत जाते, तसतसे आत्म-जागरूकतेच्या माघारामुळे सहभाग वाढतो | पुणे...

भावनिक तंदुरुस्ती, तणाव व्यवस्थापन आणि जागरूक जीवनाभोवती वाढणारी संभाषणे अधिक लोकांना संरचित आत्म-जागरूकता आणि ध्यान कार्यक्रम शोधण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत.गेल्या काही वर्षांमध्ये,...

कुस्तीच्या मॅट्सपासून ते अष्टकोनापर्यंत: टायरेल फॉर्च्यूनला का विश्वास आहे की त्याचे सर्वात मजबूत शस्त्र...

टायरेल फॉर्च्यूनने स्वत:ला UFC हेवीवेट रँकिंगमध्ये चढत असल्याच्या खूप आधी, त्याने आधीच कुस्ती मॅटवर प्रतिष्ठा निर्माण केली होती. कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावर दोन...

error: Content is protected !!