Homeशहरठाणे जिल्ह्यात आठवडाभरात ८३८ मिमी पाऊस; बारवी धरणातील पाणीसाठा ३६ टक्क्यांवर

ठाणे जिल्ह्यात आठवडाभरात ८३८ मिमी पाऊस; बारवी धरणातील पाणीसाठा ३६ टक्क्यांवर

ठाणे दि. ७ ( प्रमोद दळवी ) : ठाणे जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून समाधानकारक पाऊस सुरू असून नद्या आणि धरणांतील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. मागील आठवड्यात जिल्ह्यात सरासरी ८३८ मिमी पावसाची नोंद झाली असून, सर्वाधिक पाऊस ठाणे तालुक्यात झाला आहे. दरम्यान, ठाणे जिल्ह्याची तहान भागविणाऱ्या बारवी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणातील पाणीसाठा वाढून ३६ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे आगामी काळात पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने दिलासादायक परिस्थिती निर्माण होत असल्याचे चित्र आहे.

अहवालानुसार, ठाणे तालुक्यात सर्वाधिक १९६ मिमी एकूण पर्जन्यमान नोंदविण्यात आले असून त्यानंतर भिवंडीमध्ये ८२७ मिमी, उल्हासनगरमध्ये ७१२ मिमी, अंबरनाथमध्ये ८६९ मिमी, कल्याणमध्ये ६५५ मिमी, मुरबाडमध्ये ८४३ मिमी आणि शहापूरमध्ये ६३७ मिमी एकूण पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील एकूण सरासरी पर्जन्यमान ८३८.६३ मिमी इतके झाले असून, ते वार्षिक सरासरीच्या ३१.०६ टक्के आहे.

उल्हास नदीची पाणीपातळी वाढली; मात्र सध्या धोका कमी

सततच्या पावसामुळे उल्हास नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. मात्र काल रात्रीपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याने नदी अद्याप इशारा पातळीच्या खाली वाहत असल्याने सध्या तातडीचा पूरधोका नसल्याचे दिसत आहे.

नोंदविण्यात आलेल्या पाणीपातळ्या पुढीलप्रमाणे आहेत:

  • मोहने येथे उल्हास नदी – ८.८० मीटर
  • जांभुळपाडा येथे उल्हास नदी – १२.७० मीटर
  • बदलापूर येथे उल्हास नदी – १५.३० मीटर
  • कल्याणजवळील टिटवाळा येथे काळू नदी – १०१.७० मीटर
  • शहापूर तालुक्यातील भातसा नदी – ३३.२० मीटर

या सर्व ठिकाणी नदीची पाणीपातळी अद्याप इशारा पातळीच्या खाली असून परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र पुढील पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून नदीपात्रांवर सतत लक्ष ठेवले जात आहे. आठवडाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ठाणे जिल्ह्यातील प्रमुख धरणांतील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. अद्याप धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली नसली, तरी पावसाचा जोर कायम राहिल्यास ती लवकरच भरू शकतात.

धरणनिहाय सध्याचा पाणीसाठा:

  • बारवी धरण – ३६ %
  • भातसा धरण – ४२.५४%
  • तानसा धरण – ४२.८५%
  • मोडकसागर धरण – ५२.२२%

दरम्यान, भारतीय हवामान विभागाने ठाणे जिल्ह्यासाठी आजही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा कायम ठेवला आहे. नागरिकांनी नदीकाठ, धबधबे आणि सखल भागात जाणे टाळावे तसेच प्रशासनाने जारी केलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘सुरक्षा नेहमीच चिंतेची बाब’: बांगलादेश भारताच्या संभाव्य T20I दौऱ्यासाठी सुरक्षा उपाय वाढवण्यास तयार आहे

बीसीबी भारताच्या बांगलादेश दौऱ्यासाठी 'सुरक्षा वाढवण्यास' तयार आहे (प्रतिमा: क्रिकइन्फो) बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) सप्टेंबरमध्ये भारताच्या नियोजित व्हाईट-बॉल दौऱ्यासाठी उच्च-स्तरीय सुरक्षा प्रदान करण्याच्या...

मुंबईला पुरवठा करणाऱ्या तलावांमधील पाणीसाठा एका दिवसापूर्वी 17% वरून 28.9% पर्यंत वाढला | मुंबई...

मुंबई: सध्या सुरू असलेल्या ओल्या पावसामुळे मुंबईला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या सात तलावांमधील पाणीसाठ्यात या पावसाळ्यात सर्वाधिक वाढ झाली आहे.मंगळवार, 7 जुलै...

एकाशी निगडीत, दुसऱ्याशी लग्न: सिया गोयलचे अंतिम ‘दुहेरी आयुष्य’ केतन अग्रवाल खून प्रकरणाचा तपास...

मंगेतर केतन अग्रवालच्या हत्येचा आरोप असलेली सिया गोयल ही कथितपणे दुहेरी जीवन जगत होती कारण पोलिस तपासात गुप्त विवाह केल्याचा दावा केला आहे....

दिवसा फायटर, रात्री सुरक्षा रक्षक: भेटा विक्की सिंग टॉमक्याल, MMA फायटर जो अगदी कमीत...

व्यावसायिक रिंगमध्ये लाथ मारण्यासाठी ताकद निर्माण करण्यासाठी विक्की सिंग टॉमक्याल सिलिंडरला उशी बांधतो तेव्हा तो कमतरतांवर नाही तर त्याच्या एमएमएच्या स्वप्नाचा पाठलाग...

उल्हासनगरात पूर्व वैमनस्यातून तरुणाची धारदार चाकूने सपासप वार करून निर्घृण हत्या : मारेकरी अटकेत

उल्हासनगर दि. ७ ( प्रमोद दळवी ) : मागील भांडणाचे व एकमेकांच्या विरोधात केलेल्या केसच्या वादातून मनात राग धरून तरुणाला भर रस्त्यात अडवून त्याच्यावर...

error: Content is protected !!