उल्हासनगर दि. १ ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगर शहरातील मध्यवर्ती व विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांना बढती मिळाल्याने उल्हासनगर विधानसभेचे आमदार कुमार आयलानी यांनी या नवनिर्वाचित पोलीस अधिकाऱ्यांचे स्वागत करत त्यांना पुष्पगुच्छ व शाल देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या

मध्यवर्ती पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांच्या उल्हासनगर सहाय्यक पोलीस आयुक्त पदी नियुक्ती झाली आहे . तसेच मध्यवर्ती पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांची नियुक्ती झाली आहे . विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) चंद्रहार गोडसे यांची विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यातच वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती झाली आहे. या नवनिर्वाचित पोलीस अधिकाऱ्यांना बुधवारी उल्हासनगर विधानसभेचे आमदार कुमार आयलानी यांनी स्वागत करीत त्यांना शुभेच्छा दिल्या.





























