Homeशहरएकाच दिवशी आठ जणांना सर्पदंश : मध्यवर्ती रुग्णालयातील डॉक्टरांच्या तत्पर उपचाराने सर्वांना...

एकाच दिवशी आठ जणांना सर्पदंश : मध्यवर्ती रुग्णालयातील डॉक्टरांच्या तत्पर उपचाराने सर्वांना मिळाले जीवदान

उल्हासनगर दि.२७ ( प्रमोद दळवी ) : पावसाळा सुरू होताच उल्हासनगर शहरातील कॅम्प नं- ५  परिसरातील विविध भागात राहणाऱ्या ८ जणांना एकाच दिवशी सर्पदश झाल्याने त्यांना उल्हासनगरातील शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सर्वांचे तत्पर उपचार केल्याने त्यांना जीवदान मिळाले आहे. डॉक्टरांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालयात एकाच दिवशी  सर्पदंश केलेले ८ रुग्ण दाखल असून त्यापैकी तीन महिला तीन पुरुष व दोन लहान मुलांचा समावेश आहे. या सगळ्यांवर तातडीने उपचार करण्यात आले. याबाबत डॉक्टरांनी माहिती दिली या रुग्णांना गोल्डन पिरेडमध्ये रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यामुळे त्यांचे प्राण वाचवणे शक्य झाले आहे. या रुग्णांना चावलेल्या सापांमध्ये विषारी , बिनविषारी अशा दोन्ही प्रकारच्या सापांचा समावेश आहे . सध्या सर्व रुग्णांची प्रकृती उत्तम आहे .सर्पदंश झाल्यानंतर त्वरित रुग्णालयात दाखल करावे असे आवाहन करण्यात आले.

पावसाळ्यात सापांच्या बिळामध्ये पाणी शिरत असल्याने साफ सुरक्षा जागेच्या शोधात बाहेर पडतात. त्यामुळे या काळात सर्पदंश घटनांमध्ये वाढ होत असल्याची माहिती सर्पमित्रांनी दिली आहे. नागरिकांनी पावसाळ्यात विशेष खबरदारी घ्यावी साप चावल्यास कोणतेही घरगुती उपाय न करता जवळच्या रुग्णालयात तातडीने जावे असे आवाहन करण्यात आले आहे. :सर्पदंश झालेले ८ रुग्ण उल्हासनगरातील कॅम्प नं- ५  परिसरातील राहणारे असल्याची माहिती उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मनोहर बनसोडे यांनी दिली

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘सिया गोयलची विग टिप्पणी, जबरदस्ती लग्न, गुप्त संबंध’: केतन अग्रवाल खून प्रकरणात ट्विस्टनंतर ट्विस्ट

पोलिसांनी केतन अग्रवालची मंगेतर, सिया गोयल (20) आणि तिचा कथित साथीदार, चेतन चौधरी (22) यांना अटक केली आहे, त्यांच्यावर 18 जून रोजी 25...

राज्यात टीईटी नकोच- शिक्षक महासंघ मुंबई व कोकण विभाग अध्यक्ष अनिल बोरनारे यांची भूमिका

उल्हासनगर दि. २७ ( प्रमोद दळवी ): टीईटीचा पेपर फुटल्याने तो रद्द झाला असून ही टी ई टी राज्यात नकोच असल्याची भूमिका शिक्षक महासंघ...

नीरज चोप्रा आशियाई खेळ 2026 मध्ये भाग घेणार, AFI ने पुष्टी केली | अधिक...

नीरज चोप्रा (इमेज क्रेडिट: एक्स) नवी दिल्ली: भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा या वर्षाच्या अखेरीस जपानमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भाग घेईल कारण तो...

शिया धार्मिकतेने आणि स्मरणाने मोहरममध्ये ‘पीडितांची संध्याकाळ’ चिन्हांकित करतात

मुंबई : मोहरमच्या १० व्या आशुरानंतर करबलाच्या शहीदांसाठी मिरवणूक, प्रार्थना आणि सार्वजनिक शोकचा दिवस शुक्रवारी संपला, शहरातील शेकडो शोककर्ते संध्याकाळी माझगाव येथील...

केतन अग्रवाल खून प्रकरण: सिया गोयलच्या आई-वडिलांनी चेतनला ओळखत असल्याचं नाकारल्यानंतर पोलिसांना ‘क्रिकेट लिंक’...

पुण्यातील व्यापारी केतन अग्रवाल यांच्या मृत्यूच्या सुरू असलेल्या तपासात मुख्य आरोपी सिया गोयल आणि सहआरोपी चेतन चौधरी हे गोयल कुटुंबीयांच्या वर्तुळाचा भाग कसे...

error: Content is protected !!