Homeशहरचंद्रपूर येथील बुडो मार्शल आर्ट कराटे राज्यस्तरीय स्पर्धेत उल्हासनगरातील आयुष सुरेंद्र...

चंद्रपूर येथील बुडो मार्शल आर्ट कराटे राज्यस्तरीय स्पर्धेत उल्हासनगरातील आयुष सुरेंद्र गायकवाड ने पटकावले सुवर्णपदक

उल्हासनगर दि.२४ ( प्रमोद दळवी ):  उल्हासनगरातील कॅम्प  नंबर – ४ परिसरातील गुरुनानक शाळेतील दहावीतला विद्यार्थी आयुष सुरेंद्र गायकवाड ( १५)  याने चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या बुडो मार्शल आर्ट कराटे  राज्यस्तरीय  स्पर्धेत सुवर्णपदक पटकावल्याने त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे

आयुष सुरेंद्र गायकवाड ( १५ )  हा उल्हासनगर शहरातील कॅम्प नंबर – ४  येथील गुरुनानक शाळेतील दहावीतला विद्यार्थी आहे. अत्यंत हुशार असणाऱ्या आयुष याने शाळेतील विविध स्पर्धेत सहभाग घेऊन विविध खेळांमध्ये जवळपास दहाहून अधिक सुवर्णपदक आज पर्यत पटकावले आहेत. याशिवाय  तायक्वांडो कराटेत ब्लॅक बेल्ट असून त्याने जवळपास दहाहून अधिक सुवर्णपदक पटकावले आहेत.

नुकताच  सरदार पटेल महाविद्यालय महाराणा प्रताप चौक, चंद्रपूर येथे  बुडो मार्शल आर्ट कराटे राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत एकूण ५  जिल्ह्यातील शालेय खेळाडू सहभागी झाले होते, १९ वर्षाखालील मुलांच्या गटातून ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर शहरातील आयुष सुरेंद्र गायकवाड याने ५४ किलो  वजनी गटात या राज्यस्तरीय स्पर्धेत भाग घेऊन सुवर्णपदक पटकावले. त्याच्या या यशामुळे त्याचे उल्हासनगर शहरातून कौतुक करून सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. आयुष सुरेंद्र गायकवाड हा गुरुनानक शाळेतील विद्यार्थी असल्याने शारीरिक शिक्षण शिक्षक उदय पवार प्रशिक्षक शिहान नवीन ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली त्याची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली होती. त्याने पटकावलेल्या सुवर्णपदकाच्या अतुलनीय कामगिरीबद्दल शाळेतील सर्व शिक्षक वर्गाने त्याचे अभिनंदन केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आयपीएल: आरसीबीसाठी फिल सॉल्ट नाही कारण रजत पाटीदारने गुजरात टायटन्स विरुद्ध प्रथम क्षेत्ररक्षण निवडले...

बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर शुक्रवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा कर्णधार रजत पाटीदारने नाणेफेक जिंकून गुजरात टायटन्सविरुद्ध प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.आरसीबीला मोठा धक्का...

तुमच्या रोजच्या आहारात आवश्यक असलेले पदार्थ

शेवटी, व्हिटॅमिन बी 12 तुमची ऊर्जा, मेंदूचे कार्य आणि आरोग्यासाठी आवश्यक आहे. तुम्ही काय खात आहात याचा थोडासा विचार करणे, कमतरतेची लक्षणे जाणून घेणे...

आमदार कुमार आयलानी यांच्या नेत्र तपासणी शिबिराला नागरिकांची मोठ्या संख्येने गर्दी

उल्हासनगर दि. २४ ( प्रमोद दळवी ) : आमदार कुमार आयलानी यांनी शुक्रवारी त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात मोफत नेत्र तपासणी शिबिर, मोफत चष्मे आणि मोतीबिंदू...

परिचारिकांच्या संपाच्या तिसऱ्या दिवशी ससून रुग्णालयात रुग्णांची सेवा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली

पुणे: परिचारिकांसह सरकारी कर्मचाऱ्यांनी गुरुवारी त्यांच्या अनिश्चित महाराष्ट्र संपाच्या तिसऱ्या दिवशी प्रवेश केल्याने सरकारी ससून जनरल हॉस्पिटलमध्ये (SGH) रुग्णसेवा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे.रात्री...

महाराष्ट्र सरकार 32,679 कोटी रुपयांचे महावितरण कर्ज घेणार आहे, कृषी डीमर्जर आणि IPO योजना...

प्रातिनिधिक प्रतिमेसाठी वापरलेली प्रतिमा मुंबई: महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रिब्युशन कंपनी लिमिटेड (MSEDCL) चे 32,679 कोटी रुपयांचे कर्ज घेणे, त्याचा कृषी व्यवसाय...

error: Content is protected !!