उल्हासनगर दि. ३१ ( प्रमोद दळवी ) : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री. एकनाथ शिंदे यांच्या आशीर्वादाने शिवसेना गटनेते अरुण लीलाबाई लक्ष्मण आशान यांच्या उल्हासनगर महानगरपालिका येथील गटनेता कॅबिनचे शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्या शुभहस्ते भव्य उद्घाटन संपन्न झाले. त्यावेळी महापौर सौ. अश्विनी कमलेश निकम यांच्या उपस्थितीत हा सोहळा उत्साहात पार पडला.

जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी, विकासकामांना गती देण्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेसाठी हे गटनेता कॅबिन सदैव कटिबद्ध राहील, असा दृढ विश्वास यावेळी शिवसेना गटनेते अरुण लीलाबाई लक्ष्मण आशान यांनी व्यक्त केला. “जनतेची सेवा हीच खरी प्राथमिकता” या ध्येयाने प्रेरित होऊन पुढील काळात अधिक वेगाने विकासकामे राबवण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
याप्रसंगी उपमहापौर अमर लुंड, माजी आमदार सुरेश (पप्पू) कलानी , माजी महापौर श्रीमती लीलाबाई लक्ष्मण आशान, शिवसेना महानगर प्रमुख/नगरसेवक राजेंद्र चौधरी, राजेंद्रसिंग भुल्लर महाराज, भा.ज.पा गटनेता/नगरसेवक राजेश वधारिया, जमनु पुरसवानी, कुलवंत सिंग (बिट्टू भाई), नानासाहेब बागुल, राजेश चानपूर,. प्रदीप गोडसे,.मनोज लासी, नगरसेविका श्रीमती कांता पवार, सौ. साक्षी संदीप सुर्वे, सौ. संगिता नितीन सपकाळे, श्रीमती सीमा कलानी, सौ. पूजा सचिन भोईर तसेच पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.
.





























