Homeताज्या बातम्यास्वामी विवेकानंद कृतज्ञता निधी या सेवाभावी संस्थेकडून दिला जाणारा “अण्णासाहेब हजारे सामाजिक...

स्वामी विवेकानंद कृतज्ञता निधी या सेवाभावी संस्थेकडून दिला जाणारा “अण्णासाहेब हजारे सामाजिक सेवा गौरव पुरस्कार” जाहीर.

राळेगणसिद्धी  दि.२३ ( प्रमोद दळवी ) : स्वामी विवेकानंद कृतज्ञता निधी या सेवाभावी संस्थेकडून दिला जाणारा “अण्णासाहेब हजारे सामाजिक सेवा गौरव सन २०२५-२६ च्या वर्षीचे पुरस्कार महाराष्ट्रातील पाच जणांना घोषित करण्यात आला आहे. संस्थेच्या निवड समिती मार्फत दिनांक २३ मार्च २०२६ या शहिद दिनी जाहीर करण्यात आले. प्रत्यक्ष वितरण कार्यक्रम दि.१५ जून २०२६ रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत समारंभ पूर्वक, मानपत्र, सन्मानचिन्ह व पुरस्काराची रक्कम प्रदान केली जाणार असल्याची माहिती समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिली.

पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेल्यांची नावे अशी आहेत १)मा. श्री यजुर्वेंद्र महाजन- दिपस्तंभ फाऊंडेशन (मनोबल), जि. जळगाव रुपये २,००,०००/- २) मा. श्री दिपक नागरगोजे, शांतीवन प्रकल्प, आर्वी, ता. शिरूर कासार, जि. बीड. रुपये१,५०,०००/-,३)मा.श्री. शिवाजीराव डोळे, (माजी सैनिक) व्यंकटेश्वरा को- ऑपरेटिव्ह पॉवर अँड अग्रो प्रोसेसिंग लि. अंजग-वडेल ता. मालेगाव, जि. नाशिक. रुपये १,००,०००/-, ४)मा. श्री अनंत झेंडे- महामानव बाबा आमटे सेवा संस्था, चिखली, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर. रुपये १,००,०००/-, ५)मा. श्री डॉ नंदू पालवे- सेवा संकल्प प्रतिष्ठान, बेलखेड ता. चिखली, जि. बुलढाणा. रुपय  १,००,०००/-.व त्यांना, मानपत्र, सन्मानचिन्ह व पुरस्काराची रक्कम दिली जाणार आहे.

या बाबत समाजसेवक अण्णा हजारे यांनी माहिती देत सांगितले कि  मला जीवनात स्वामी विवेकानंदांच्या पुस्तकातून मानवी जीवनाचा अर्थ कळत गेला. मानव सेवा हीच इश्वर सेवा हे समजल्याने आपल्या जीवनातही जे काही कर्म करावयाचे ते निष्काम भावनेने, कुठल्याही फळाची अपेक्षा न ठेवता समाजातील दिन-दुबळे, रंजले-गांजलेले व उपेक्षित जीवन जगणाऱ्यांसाठी कार्य करायचे असा ठाम निर्णय वयाच्या १७ व्या वर्षी भर तारूण्यात घेतला. तथापि हे कार्य उपाशी पोटी हे कसे करणार? व स्वतःचा भार इतरांवर पडू नये या करिता सैन्य दलात जाण्याचा निर्णय घेतला. १९६२ साली झालेल्या चीन युद्धात सैनिकांची जीवीत हानी मोठ्या प्रमाणावर झाल्याने भारतीय सैन्य दलात १९६३ साली दाखल झालो. पुढे देश सेवा करीत असताना सन १९६५ मधील पाकिस्तानच्या आक्रमणात माझ्या बरोबरीने काम करणारे अनेक जवान शहीद झाले. सुदैवाने मी वाचलो गेलो ही इश्वराची कृपा, व पुनर्जन्म समजून पेन्शन मिळेपर्यंत देश सेवा केली. दरम्यान महात्मा गांधीजींची पुस्तके वाचत गेलो व कामाला सुरवात केली. जन्मभर अविवाहीत राहूनच हे कार्य करता येईल म्हणून आजन्म ब्रम्हचारी व्रताचे पालन केले. मंदीरात वास्तव्यास राहिलो. देश बदलायचा असेल तर देशाचा घटक गाव, गावाचा घटक कुटूंब व कुटूंबाचा घटक प्रत्येक व्यक्ती बदलल्याशिवाय देशाचा विकास साध्य होणार नाही.  या भावनेने समविचारी सहकाऱ्यांचे संघटन बांधणी करून स्वतःच्या गावातून कार्याला सुरूवात केली. गावात कार्य करताना श्रमदान, नशाबंदी, कुऱ्हाडबंदी, चराईबंदी, नसबंदी या पंचसुत्रीचा अवलंब केला. प्रसंगी राज्यात व देशातील समाजाच्या ज्वलंत प्रश्नांवर अनेक वेळा उपोषणे आणि आंदोलने करावी लागली. त्यातून देशातील जनतेला १) माहितीचा अधिकार, २)शासकीय बदल्यांचा कायदा, ३) ग्रामसभेला जादा अधिकार कायदा ४) दप्तर दिरंगाईचा कायदा ५) नागरिकांची सनद ६)जनलोकपाल कायदा ७)ग्रामरक्षक दल ८) महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक यांसारखे कायदे मिळाले. गावातील प्रत्येक समस्येवर विचार विनिमय करून त्यावर मार्ग व उपाय शोधण्यात आले. उदा. जलसंधारण, शिक्षण, पर्यावरण, पशुसंवर्धन इ. बाबींवर कार्य करण्यात आले. त्याचा लाभ गावकऱ्यांना मिळत गेला व या सर्व कार्यांचा प्रचार व प्रसार वाढत जाऊन तालुका, जिल्हा, राज्य, देश, आणि विदेशातही होत गेला.वरील कार्याची नोंद घेऊन समाजातील वेगवेगल्या स्तरातील भेटी देणारे लोक, तसेच वेगवेगळ्या संस्था, शासन, देश व परदेशातूनही पुरस्कार मिळत गेले.

समाजाकडून मिळालेली ही रक्कम समाजालाच परत करायची यासाठी सन १९९८ मध्ये स्वामी विवेकानंद कृतज्ञता निधी या संस्थेची स्थापना करून समाजामध्ये निष्काम भावनेने कार्य करणाऱ्या व्यक्ती तथा संस्था यांना प्रेरणा मिळावी म्हणून वरील संस्थेच्या माध्यमातून प्रती वर्षी हे पुरस्कार दिले जात आहेत. मिळालेल्या पुरस्कारांची एकूण रक्कम १,६७,०००००/- (एक कोटी सदुसष्ट लक्ष रू.) बँकेत कायम स्वरूपी ठेवी ठेवून त्यावर मिळणाऱ्या व्याजातून प्रती वर्षी पुरस्कार प्रदान केले जात आहेत. असे कि. बा. तथा अण्णा हजारे यांनी सांगितले .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘आता तुम्ही संजू सॅमसन आणि वैभव सूर्यवंशीप्रमाणेच केएल राहुललाही खराब करत आहात’: भारताच्या माजी...

केएल राहुल (इमेज क्रेडिट: बीसीसीआय) नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार क्रिस श्रीकांतने लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेदरम्यान केएल राहुलला सहाव्या क्रमांकावर पाठवल्याबद्दल भारतीय...

बेस्ट अपघातात ठार झालेले 65 वर्षीय शेतकरी आपल्या मुलीला भेटण्यासाठी आणि कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी...

मुंबई : मानखुर्द येथे सायन-पनवेल महामार्गावर सोमवारी बेस्टची बस रस्त्याच्या कडेला असलेल्या दुभाजकावर आदळल्याने दहा जण गंभीर जखमी झाले असून एकाचा मृत्यू...

आंतरराष्ट्रीय अभ्यास कोविड उघड झाल्यानंतर पुरवठा साखळीतील अंतर स्थानिक उपाय देते | पुणे बातम्या

पुणे : कोविड साथीच्या रोगाने जग कसे असुरक्षित आहे हे दाखवून दिल्यानंतर महाद्वीपांमध्ये पसरलेल्या प्रयोगशाळा स्थानिक पातळीवर निदान आणि संशोधनासाठी आवश्यक असलेले महत्त्वाचे जैविक...

एलोन मस्कचे कोट: इलॉन मस्कचे दिवसाचे कोट: “तुम्ही चुकीचे आहात असा दृष्टीकोन घ्यावा. तुमचे...

आत्मविश्वासासह यशाची जोड पुरेशी वैशिष्ट्यपूर्ण आहे. इलॉन मस्कचे प्रसिद्ध कोटेशन अगदी विरुद्ध आहे: "तुम्ही चुकीचे आहात असा दृष्टीकोन घ्यावा. तुमचे ध्येय कमी...

शिक्रापूर येथील गृहप्रकल्पातील चार एकर जमिनीचा लिलाव हायकोर्टाने रद्द केला; महारेरा वॉरंटच्या अंमलबजावणीतील त्रुटींसाठी...

पुणे : महारेराने 2021 मध्ये जारी केलेल्या रिकव्हरी वॉरंटच्या विरोधात शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथील ऑरा सिटी गृहनिर्माण प्रकल्पाचा एक भाग असलेल्या 4.42...

error: Content is protected !!