उल्हासनगर दि. ५ ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील कॅम्प नंबर -५ परिसरातील भगवान हॉस्पिटलच्या सोनोग्राफी सेंटरची नोंदणी उल्हासनगर महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. मोहिनी धर्मा यांनी रद्द केली असल्याची माहिती प्रसिद्धी पत्राद्वारे दिली आहे.
उल्हासनगर वैद्यकीय आरोगय विभागा दिलेल्या माहितीनुसार उल्हासनगर महानगरपालिका कार्यक्षेत्रात भगवान हॉस्पीटल, उल्हासनगर-५ मधील सोनोग्राफी सेंटरवर दिनांक २३/०२/२०२६ रोजी वैद्यकीय आरोग्य अधिकारी तथा समुचित प्राधिकारी यांनी वैद्यकीय पथकासह आकस्मित भेट दिली होती . त्यावेळी सदर सोनोग्राफी सेटर मध्ये पीसीपीएनडीटी अॅक्ट कायदयाचा नियमभंग झाल्याचे आढळून आले होते.
हे सोनोग्राफी सेटर पीसीपीएनडीटी अॅक्ट अंतर्गत नोंदणीकृत असुन सदर सोनोग्राफी मशिनचा गैरवापर करुन उल्लघन केल्याचे निर्देशाना आलेले आहे. तसेच सदर सेंटर मध्ये अप्रशिक्षीत व्यक्ती (Unqualified person) सोनोग्राफी मशिन हाताळताना दिसुन आली आहे. सदर सोनोग्राफी सेंटर सिल करण्यात आलेले असून आरोग्य विभागाच्या निदर्शनात आलेल्या काही त्रुट्यावरून या हॉस्पिटलचे सोनोग्राफी सेंटरची नोंदणी कलम २० (२) अन्वये रद्द करण्यात आलेली आहे अशी माहिती उल्हासनगर महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. मोहिनी धर्मा यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे दिली आहे.





























