मुंबई दि. ४ ( प्रमोद दळवी ) : मुंबईतील बोरिवली परिसरातील गोराई बस डेपोमध्ये दोन मोठे अजगर दिसल्याने एकच गोंधळ उडाला. माहिती मिळताच वन विभागाचे पथक आणि सर्प निरीक्षक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी दोन्ही मोठ्या अजगरांना सुरक्षितपणे वाचवले.

गोराई बस डेपो परिसरातील कर्मचाऱ्यांना दोन मोठे अजगर फिरताना दिसले. त्यांनी त्यांनी त्वरित या दोन भल्या मोठ्या अजगरा बाबत स्थानिक वन्यजीव बचाव पथकाला तात्काळ माहिती देण्यात आली. पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी अतिशय काळजीपूर्वक दोन्ही अजगरांना सुरक्षितपणे पकडले. बचाव पथकाने सापांना इजा न करता पकडण्यासाठी लोकांना अंतर राखण्याचे आवाहन केले. वन्यजीव तज्ञांच्या मते, मुंबईतील अनेक भागात जंगले आणि हिरवळीच्या जवळ असल्याने, अजगरांसारखे मोठे साप कधीकधी दाटीवाटीच्या भागात दिसतात. बचाव पथकाने दोन्ही अजगरांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले आणि नंतर त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.





























