Homeशहरउल्हासनगर महानगरपालिकेत प्रजासत्ताक दिनाचा ७७ वा वर्धापन दिन समारंभ उत्साहात साजरा

उल्हासनगर महानगरपालिकेत प्रजासत्ताक दिनाचा ७७ वा वर्धापन दिन समारंभ उत्साहात साजरा

उल्हासनगर दि २६ : भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७७ वा वर्धापन दिन उल्हासनगर महानगरपालिकेत मोठ्या उत्साहात आणि देशप्रेमी वातावरणात साजरा करण्यात आला. सोमवार, २६  जानेवारी २०२६  रोजी सकाळी ८.१५  वाजता महानगरपालिकेच्या प्रांगणात अतिरिक्त आयुक्त डॉ. धीरज चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. राष्ट्रध्वजाला मानवंदना दिल्यानंतर महापालिकेतील महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

समारंभाच्या प्रारंभी भास्कर शिंदे (समग्र शिक्षण) यांनी उपस्थित सर्व मान्यवर, स्वातंत्र्य सैनिक, नव्याने निवडून आलेले महापालिका सदस्य, अतिरिक्त आयुक्त, उपआयुक्त, सहायक आयुक्त, विभागप्रमुख, सुरक्षा कर्मचारी, अग्निशमन विभागाचे कर्मचारी तसेच कार्यक्रमाच्या तयारीत सहभागी असलेले स्वच्छता, विद्युत, भांडार विभाग, जनसंपर्क विभागातील कर्मचारी, शाळेतील शिक्षक-विद्यार्थी व महापालिकेतील सर्व अधिकारी-कर्मचारी यांचे मनःपूर्वक आभार मानले.

ध्वजारोहणानंतर उल्हासनगर महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्याने उपस्थितांची मने जिंकली.महापालिका शाळा क्र.१७ च्या विद्यार्थ्यांनी “देस रंगीला-रंगीला” या गीतावर देशभक्तीपर नृत्य सादर केले. महापालिका शाळा क्र.२५ च्या विद्यार्थ्यांनी तायक्वांदो मार्शल आर्टचे संगीतबद्ध सादरीकरण केले. महापालिका शाळा क्र.२९ च्या विद्यार्थ्यांनी डंबेल्सवर विविध शारीरिक कसरती सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.

याप्रसंगी बोलताना अतिरिक्त आयुक्त डॉ. धीरज चव्हाण यांनी महापालिका प्रशासनाने गेल्या १००  व १५०  दिवसांत पूर्ण केलेल्या विशेष विकासकामांची आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची माहिती दिली. नवनिर्वाचित महापालिका सदस्य जमनु पुरस्वानी यांनी शहर आणि देशहितासाठी सर्वांनी सजग व कर्तव्यनिष्ठ राहण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमात समाजातील विविध क्षेत्रांतील व्यक्तींचा आणि संस्थांचा गौरव करण्यात आला. स्वातंत्र्य सैनिक सन्मान : स्वातंत्र्य सैनिक हरिश्चंद्र जोशी यांचे नातू कल्पेश जोशी आणि गोवा मुक्ती संग्रामातील सेनानी अनाथबंधू चक्रवर्ती यांच्या कन्या श्रीम. मिता विश्वास यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सामाजिक गौरव : डॉ. बाबासाहेब आंबेडर समाज भूषण पुरस्कार (दलित मित्र) राजू तेलकर व सौ. बेबी तेलकर यांचा उपआयुक्त श्रीम. विशाखा मोटघरे यांच्या हस्ते सत्कार झाला. आरोग्य सेवा : क्षयरुग्णांना दत्तक घेऊन पोषण आहार पुरवल्याबद्दल ग्रासीम इंडस्ट्रीज (सेंच्युरी रेयॉन) आणि जीवदया संस्थेला विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

प्रजासत्ताक दिनानिमित्त उपस्थित सर्व मान्यवर, अधिकारी-कर्मचारी व शाळेतील शिक्षक-विद्यार्थ्यांसाठी चहा, पाणी व नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती. अल्पोपहारानंतर मान्यवरांनी व महापालिका अधिकारी/कर्मचाऱ्यांनी गोल मैदान, उल्हासनगर-१ येथे जाऊन तेथील ११०  फूट उंच राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.

सदर समारंभास महापालिका अतिरिक्त आयुक्त डॉ. किशोर गवस व डॉ. धीरज चव्हाण, उपआयुक्त श्रीमती विशाखा मोटघरे व डॉ. दिपाली चौगले, श्रीमती स्नेहा करपे, मुख्य लेखाधिकारी. किरण भिलारे, लेखा अधिकारी संजय वायदंडे, उपमुख्य लेखा अधिकारी विलास नागदिवे, सहायक आयुक्त गणेश शिंपी. विशाल कदम, श्रीमती अलका पवार, भांडार विभाग प्रमुख अंकुश कदम, सुरक्षा विभाग प्रमुख. यशवंत सगळे, अग्निशमन अधिकारी सुरेश बोंबे, माहिती तंत्रज्ञान विभागाच्या सिस्टीम अॅनालिस्ट श्रीमती श्रद्धा बाविस्कर, विधी विभाग प्रमुख. राजा बुलानी, वाहन विभाग प्रमुख विनोद कणे, उपअभियंता (विद्युत) महेंद्र धिंडे तसेच महापालिका सदस्य जमनु पुरस्वानी,. महेश सुखरामनी, श्रीमती प्रीती माखिजा, श्रीमती शोभा जाधव,. राजू गोपलानी, विपूल मयेकर, श्रीमती रत्नमाला दुर्गे यांच्यासह इतर महापालिका अधिकारी-कर्मचारी व महापालिका शाळा क्र. १७ , २५  व २९ चे शिक्षक/विद्यार्थी व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन समग्र शिक्षा अभियानाचे साधन व्यक्ती, भास्कर शिंदे यांनी केले. भांडार विभाग व जनसंपर्क विभागाने कार्यक्रमाच्या सर्व नियोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या कल्याण जिल्हा कक्ष प्रमुखपदी सौ. मीना (ताई) सोंडे यांची नियुक्ती

उल्हासनगर दि १६ ( प्रमोद दळवी )  : वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या कल्याण जिल्हा (उल्हासनगर व अंबरनाथ) कक्ष प्रमुखपदी सौ. मीना...

विठ्ठलवाडी रेल्वे ट्रॅकजवळ गांजा विक्री करणाऱ्यावर पोलिसांची झडप; ५३० ग्रॅम गांजा जप्त

उल्हासनगर दि. १६ ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगर शहरातील कॅम्प क्रमांक-३ परिसरातील विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकाजवळील गोपाळ समाज परिसरात रेल्वे ट्रॅकच्या कडेला एक इसम...

शाळा सुरू झाल्यानंतर महिन्याभरात शिक्षण पुरवठ्यासाठी दिलेला निधी | पुणे बातम्या

विद्यार्थ्यांना त्यांचे शैक्षणिक साहित्य वेळेवर मिळावे यासाठी नागरी संस्था प्रयत्न करत आहे पुणे : पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतर महिनाभरानंतर शैक्षणिक...

विराट कोहलीने मोडला रिकी पाँटिंगचा विक्रम, सर्वकालीन टॉप-फाइव्ह एलिट यादीत प्रवेश | क्रिकेट बातम्या

भारताचा विराट कोहली (ANI फोटो) विराट कोहलीने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याच्या चमकदार कारकिर्दीत आणखी एक मैलाचा दगड जोडला आणि ऑस्ट्रेलियन महान रिकी...

NITI आयोगाच्या अहवालात व्यापक पर्यटन सुधारणांची अपेक्षा आहे; हॉटेलची वाढ मंदावणारी नियामक अडथळे |...

नवीन NITI आयोग अहवाल हॉटेल प्रकल्प आणि पर्यटन वाढीला गती देण्यासाठी जलद मंजूरी आणि सोप्या नियमांची शिफारस करतो (प्रतिनिधित्वात्मक हेतूंसाठी AI-व्युत्पन्न केलेली प्रतिमा)...

error: Content is protected !!