Homeशहरसौ. आरती रविंद्र भोईर यांना स्टार्टअप शिक्षा फाउंडेशनच्या वतीने मानद डॉक्टरेट प्रदान

सौ. आरती रविंद्र भोईर यांना स्टार्टअप शिक्षा फाउंडेशनच्या वतीने मानद डॉक्टरेट प्रदान

शहापूर दि .२ : स्टार्टअप शिक्षा फाउंडेशन, ऑनोरीस, कासाच्या वतीने कॉर्पोरेट मंत्रालय, भारत सरकार यांच्या मंजुरीने दिला जाणारा सन २०२५  सालाचा समाजसेवा बद्दल अतुलनीय काम केलेल्या व्यक्तींना दिला जाणारा मानद डॉक्टरेट पुरस्कार २०२५ सौ आरती रविंद्र भोईर यांना जाहिर झाला आहे, सौ. भोईर ह्या शहापूर तालुक्यातील वासिंद शहराच्या रहिवासी आहेत.३१ डिसेंबर २०२५ रोजी पुरस्कार जाहीर झाल्याची घोषणा करण्यात आली आहे.

आरती भोईर ह्या मागील पंधरा वर्षांपासून समाजसेवा करीत आहेत. महिला वर्गाला आणि विधवा महिलाना शासनाच्या वतीने विविध योजनांचा लाभ मिळवून देत आहेत. महिलाना बचत गटाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी नेहमी अग्रेसर असतात. त्या स्वतः रेल्वेच्या वन स्टेशन , वन प्रॉडक्ट या माध्यमातून बचत गटाच्या महिलांना रोजगार करण्यासाठी जागा उपलब्ध करून देत आहेत. त्यांच्या समाजसेवेची दखल घेऊन विविध संस्थानी त्यांना सन्मानित केले आहे. मागील २०२३ /२०२४  या वर्षाचा पुण्य श्र्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार देऊन वाशिंद ग्रामपंचायतीने आरती भोईर यांना सन्मानित केले आहे. महिला प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्या कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेच्या माध्यमातून सोडविण्यासाठी त्या नेहमी अग्रेसर असतात. तसेच महाराष्ट्र राज्य कास्ट्राइब कल्याण महासंघाच्या ठाणे जिल्ह्याच्या महिला जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत असून त्यांनी शासकीय, निमशासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्या अनेक समस्या सोडविल्या आहेत.

सौ. भोईर यांना मानद डॉक्टरेट पदवी मिळाल्याने कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने आणि महाराष्ट्र राज्य कास्ट्राइब कल्याण महासंघाच्या वतीने अभिनंदन करून आनंद व्यक्त केला आहे.  मला डॉक्टरेट पदवी मिळाल्याने जनतेची सेवा अधिक जोमाने करण्याची संधी मिळाली आहे, मी स्टार्टअप शिक्षा फाउंडेशन ऑनोरीस कासा, भारत सरकार यांचे आभार व्यक्त करते.  तसेच मला नेहमी सहकार्य करणारी कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेच्या आणि महाराष्ट्र राज्य कास्ट्राइब कल्याण महासंघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करते .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

फुटबॉल अमरत्वाचा एक विजय: फ्रान्सच्या विजयानंतर स्पेनने युरोपच्या ‘अस्पृश्य’ विक्रमाशी बरोबरी केली

मंगळवार, 14 जुलै 2026 रोजी डॅलसजवळ, टेक्सासमधील आर्लिंग्टन येथे फ्रान्स आणि स्पेन यांच्यातील विश्वचषक उपांत्य फेरीच्या फुटबॉल सामन्याच्या अगोदर मौनाच्या क्षणी स्पेनचे सदस्य...

महा मंत्रिमंडळाने महिला अल्पवयीन कैद्यांच्या पुनर्वसनासाठी आर्थिक मदत दुप्पट करून ५० हजार रुपये करण्यास...

महिला व बाल विकास विभागांतर्गत सहाय्यक अनुदान योजना राबविण्यात येत असल्याचे सरकारी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. मुंबई: सुटका झालेल्या महिला अल्पवयीन कैद्यांच्या पुनर्वसनासाठी देण्यात...

2047 पर्यंत प्रीमियर लिबरल आर्ट्स इन्स्टिट्यूट म्हणून उदयास येण्यासाठी डेक्कन कॉलेजने महत्त्वाकांक्षी सुधारणा केल्या

अध्यापन, दस्तऐवजीकरण आणि संशोधन बळकट करण्यासाठी भारताच्या ज्ञान परंपरांना आधुनिक पध्दतींसह जोडणे, उदारमतवादी कला, मानविकी आणि वारसा शिक्षणासाठी देशाचे प्रमुख गंतव्यस्थान म्हणून मजबूत...

आयलीन लॅविन: ही 101 वर्षीय पत्रकार अजूनही काम करते आणि स्वतंत्रपणे जगते. तिच्या रोजच्या...

लोक नेहमी दीर्घ आणि निरोगी आयुष्याचे रहस्य शोधत असतात. फिटनेस ट्रेंड आणि विशेष आहार हे संभाषणावर वर्चस्व गाजवत असताना, 101 वर्षीय पत्रकार...

कलम १५५ च्या गैरवापरप्रकरणी ६९ महसूल अधिकाऱ्यांना विभागीय चौकशीला सामोरे जावे लागणार

ही कारवाई कलम 155 च्या कथित गैरवापरावर राज्याच्या कारवाईचा एक भाग आहे, ही तरतूद महसुली नोंदींमधील कारकुनी किंवा अपघाती चुका सुधारण्यास परवानगी देते...

error: Content is protected !!