Homeशहरआसनगाव स्थानकाचा २०२६ मध्ये संपूर्ण कायापालट होणार

आसनगाव स्थानकाचा २०२६ मध्ये संपूर्ण कायापालट होणार

आसनगाव दि.१६ : आसनगाव येथे सुरू असलेली कामे संथगतीने होत असल्याच्या तक्रारी संघटनेकडे आल्या होत्या, त्याअनुषंगाने संबंधित अधिकाऱ्यांना सोबत पाहणी करण्यात आली, पाहणी करतांना सोबत आसनगाव स्टेशन मास्तर सुहास मणियार, रेल्वेचे iow चे सिनियर सेक्शन इंजिनियर आशिष दुबे , ठेकेदारांचे इंजिनियर तसेच कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजेश घनघाव, प्रसिद्धी प्रमुख दिपक सपकाळे हे उपस्थित होते. आसनगाव हे शहापूर तालुक्यातील एक मोठे स्थानक आहे, मागील पाच वर्षापूर्वी आसनगाव स्थानकाचा हरित स्थानकात नोंद करण्यात आली आहे. यामुळे विद्युत पुरवठा साठी होणारा खर्च निम्यावर आणण्यात आला आहे .तसेच कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेने  लोहमार्ग पोलीस आयुक्त आणि गृह विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडे आठ वर्षे पाठपुरावा करून नुकतेच १५ ऑगस्ट २०२५ रोजी आसनगाव येथे नवीन पोलिस स्टेशन सुरू करण्यात आले असून येथे एकूण ५८ पोलिस अधिकारी आणि कर्मचारी प्रवाशांच्या सेवेसाठी तैनात करण्यात आले आहेत.

आसनगाव  स्थानकातून आजमितीस सुमारे ७५ हजार प्रवाशी रोज प्रवास करीत आहेत. त्यातून रोज सुमारे तीन लाख रुपये उत्पन्न मिळत असल्याचे दिसून आले आहे. कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेच्या पाठपुराव्याने या स्थानकाचा कायापालट  होत आहे. या ठिकाणी एक आयलंड प्लॅटफॉर्म आणि एक होम प्लॅटफॉर्म असे एकूण दोन प्लॅटफॉर्म, तसेच पूर्व आणि पश्चिम दिशेला जोडणारा बारा मीटरचा ब्रीज, एक मोठे शौचालय, दोन्ही बाजूला सरकते जिने, तसेच पश्चिमेला अभिनव विद्यालयापर्यंत रस्ता तयार करून देण्यात यावा यासाठी संघटनेच्या वतीने आग्रह धरण्यात आला आहे. हि सर्व कामे ३१  मार्च २०२६  पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी पाहणी दरम्यान सांगितले आहे. ज्या ठिकाणी काम करण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या. ती सर्व ठिकाणी पाहण्यात आली.  रेल्वे प्रवाशांना प्रवासादरम्यान अडचणीचे असलेली रोजच ट्रॅफिक जाम होत असल्याने पूर्वेकडील अनधिकृत टपऱ्या आणि दुकाने गुरुवारी हटविण्यात येणार आहेत. तब्बल दिड तास हा पाहणी दौरा सुरू होता. सदरची विकास कामे सुरू असून प्रवाशांनी तसेच स्थानिकांनी कुठलाही अडथळा निर्माण करु नये असे संघटनेचे अध्यक्ष राजेश घनघाव यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

NRI ने 5 गोष्टी उघड केल्या आहेत ज्या तिला भारतात काम करण्याबद्दल कोणीही इशारा...

सोशल मीडिया अनेकदा दैनंदिन अनुभवांना मोठ्या संभाषणांमध्ये रूपांतरित करतो आणि यावेळी, भारतीय कार्यालयांमधील जीवनावर प्रकाश टाकला जातो. भारतात परतल्यानंतर कामाच्या संस्कृतीशी जुळवून...

ठाणे जिल्ह्यात स्मार्ट शाळा, ग्रामीण भागात एकात्मिक घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला गती

- दिशा समितीच्या बैठकीत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे निर्देश ठाणे दि. १७ : - ठाणे जिल्ह्यातील शासकीय शाळांचे आधुनिकीकरण, ग्रामीण व शहरी भागातील घनकचरा...

जन्म-मृत्यू प्रमाणपत्रासाठी नागरिकांची वणवण; प्रक्रिया सुलभ करण्याची मनसेची मागणी

उल्हासनगर दि. १७ ( प्रमोद दळवी ) : शासनाच्या नव्या आदेशानुसार जन्म व मृत्यू प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेत करण्यात आलेल्या बदलांमुळे ठाणे जिल्ह्यातील नागरिकांना मोठ्या...

पडणारी झाडे, अयशस्वी यंत्रणा पुणे आणि पिंपरी चिंचवडला त्रास देत आहे पुणे बातम्या

पुणे: जुलै महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या अल्पशा पण दमदार पावसाने यंदाच्या पावसाळ्यात नेहमीच्याच कहर केला. शहराने पूरग्रस्त परिसर, जलमय महामार्ग, तुटलेले रस्ते, पाण्याखाली...

उल्हासनगर महापालिकेच्या महासभेत पाच पूरक विषयांचा समावेश; मॅन्युअल निविदा, पीएम आवास, विकास आराखडा व...

उल्हासनगर दि. १७  ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगर महानगरपालिकेच्या सोमवार, दि. २० जुलै २०२६ रोजी होणाऱ्या महासभेच्या कामकाजात पाच महत्त्वाच्या पूरक प्रस्तावांचा समावेश...

error: Content is protected !!