Homeशहरसुभाष टेकडीतील नागरिकांचा संताप : आंबेडकरी अस्मितेवर गदा, ५००० मते व खेळाचे...

सुभाष टेकडीतील नागरिकांचा संताप : आंबेडकरी अस्मितेवर गदा, ५००० मते व खेळाचे मैदान पुन्हा पॅनेल १८ मध्ये सामील करण्याची मागणी

उल्हासनगर दि.२६ : सुभाष टेकडी परिसरातील नागरिकांनी अन्यायकारक प्रभाग रचनेविरोधात संताप व्यक्त केला आहे. आंबेडकरी चळवळीचे बालेकिल्ले मानल्या जाणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकासह एकमेव खेळाचे मैदान आणि तब्बल ५००० मते पॅनेल क्रमांक १८ मधून जबरदस्तीने पॅनेल क्रमांक १३ मध्ये टाकण्यात आल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे लेखी निवेदन देऊन नागरिकांनी न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे.

सुभाष टेकडी हा परिसर ७० ते ८० टक्के बौद्ध समाजाचे वास्तव्य असलेला आहे. त्यामुळेच येथील प्रभाग आरक्षित ठेवला जात असे. मात्र २०१७ साली करण्यात आलेल्या प्रभाग रचनेत काही स्वार्थी राजकीय मंडळींनी जाणूनबुजून चतुर्सीमेचा घोळ घालत, सुभाष टेकडीतील खेळाचे मैदान, डॉ. आंबेडकर चौक व बुद्ध कॉलनी, ब्लॉक लाईन ते भरतनगर, पंचशील नगर, साईबाबा नगर अशा परिसरातील तब्बल ५००० मते थेट प्रभाग १३ मध्ये टाकून मागासवर्गीय आरक्षण धोक्यात आणले, असा आरोप नागरिकांनी केला आहे.

यामुळे परिसरातील लोकांचा मतदानाचा अधिकारही बाधित होत असून, दोन किलोमीटरवर असलेल्या मतदान केंद्रावर जाणे अवघड झाल्याने अनेक नागरिक मतदानापासून वंचित राहतात. परिणामी मतदानाची टक्केवारी घसरते आणि लोकशाही प्रक्रियेला धक्का बसतो, अशीही खंत व्यक्त केली गेली आहे. याविरोधात परिसरातील नागरिकांनी एकत्र येऊन हजारोंच्या संख्येने सह्या करून प्रभाग रचनेस विरोध दर्शविला आहे. अलीकडेच टाऊन हॉल येथे झालेल्या सुनावणीतही हरकती दाखल झाल्या आहेत. आता अंतिम निर्णय निवडणूक आयोगाकडून अपेक्षित आहे.

“डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक हा आंबेडकरी चळवळीचा आत्मसन्मान आहे. त्याला वेगळ्या प्रभागात ढकलणे म्हणजे आमच्या अस्मितेवर गदा आणणे आहे. हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा आणि मैदानासह सर्व ५००० मते पुन्हा पॅनेल १८ मध्ये सामील करावीत,” अशी ठाम भूमिका आयु. वामदेव भोयर, आयु. सुबोध गोंडाणे, आयु. सुरेश जगताप, आयु. आखरिखत सव्वाखंडे, आयु. मिलींद मेश्राम, आयु. वंदना इंगळे यांच्यासह परिसरातील आंबेडकराईट नागरिकांनी घेतली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बिग बँग नंतर एक अब्ज वर्षांहून कमी काळातील सर्वात आधीच्या आकाशगंगा व्यवस्थित होत्या, IUCAA...

(वर डावीकडे) संशोधनात वापरल्या गेलेल्या वैश्विक इतिहासाच्या पहिल्या अब्ज वर्षातील गोलाकार आकाशगंगांपैकी एक. (खाली डावीकडे) जवळपास 318 दशलक्ष प्रकाशवर्षे दूर असलेली लंबवर्तुळाकार आकाशगंगा....

फुटबॉल अमरत्वाचा एक विजय: फ्रान्सच्या विजयानंतर स्पेनने युरोपच्या ‘अस्पृश्य’ विक्रमाशी बरोबरी केली

मंगळवार, 14 जुलै 2026 रोजी डॅलसजवळ, टेक्सासमधील आर्लिंग्टन येथे फ्रान्स आणि स्पेन यांच्यातील विश्वचषक उपांत्य फेरीच्या फुटबॉल सामन्याच्या अगोदर मौनाच्या क्षणी स्पेनचे सदस्य...

महा मंत्रिमंडळाने महिला अल्पवयीन कैद्यांच्या पुनर्वसनासाठी आर्थिक मदत दुप्पट करून ५० हजार रुपये करण्यास...

महिला व बाल विकास विभागांतर्गत सहाय्यक अनुदान योजना राबविण्यात येत असल्याचे सरकारी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. मुंबई: सुटका झालेल्या महिला अल्पवयीन कैद्यांच्या पुनर्वसनासाठी देण्यात...

2047 पर्यंत प्रीमियर लिबरल आर्ट्स इन्स्टिट्यूट म्हणून उदयास येण्यासाठी डेक्कन कॉलेजने महत्त्वाकांक्षी सुधारणा केल्या

अध्यापन, दस्तऐवजीकरण आणि संशोधन बळकट करण्यासाठी भारताच्या ज्ञान परंपरांना आधुनिक पध्दतींसह जोडणे, उदारमतवादी कला, मानविकी आणि वारसा शिक्षणासाठी देशाचे प्रमुख गंतव्यस्थान म्हणून मजबूत...

आयलीन लॅविन: ही 101 वर्षीय पत्रकार अजूनही काम करते आणि स्वतंत्रपणे जगते. तिच्या रोजच्या...

लोक नेहमी दीर्घ आणि निरोगी आयुष्याचे रहस्य शोधत असतात. फिटनेस ट्रेंड आणि विशेष आहार हे संभाषणावर वर्चस्व गाजवत असताना, 101 वर्षीय पत्रकार...

error: Content is protected !!