Homeशहरउल्हासनगरात वकील महिलेची इमारतीच्या टेरेसवरून उडी घेऊन आत्महत्या

उल्हासनगरात वकील महिलेची इमारतीच्या टेरेसवरून उडी घेऊन आत्महत्या

उल्हासनगर दि.२८ ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगरातील विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणाऱ्या एका वकील महिलेने इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केल्याची खळबजेनक घटना घडली आहे.

आत्महत्या केलेल्या त्या वकील महिलेचे नाव सरिता खानचंदानी असे आहे. त्या उल्हासनगरातील कॅम्प  नंबर – ४  परिसरातील रोमा अपार्टमेंट मध्ये राहत होत्या. त्या हिराली फाउंडेशनच्या अध्यक्ष व एक नावाजलेल्या वकील होत्या. गुरुवारी सकाळी साडेअकरा ते बाराच्या दरम्यान रोमा अपार्टमेंटच्या सातव्या मजल्यावरील टेरेसवर त्या गेल्या. त्यांनी टेरेसवरील ग्रील वर बसून सर्वप्रथम आकाशाकडे बघून नमस्कार केला. त्यानंतर त्यांनी त्या ठिकाणाहून खाली उडी मारली. हा धक्कादायक प्रकार त्या ठिकाणी घडतात या घटनेची खबर विठ्ठलवाडी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेऊन त्वरित जखमी अवस्थेत पडलेल्या सरिता खानचंदानी यांना जवळच्या बालाजी रुग्णालयात दाखल केले. पण त्यांचे प्रकृती खूपच गंभीर असल्याने उल्हासनगरातील कॅप नंबर तीन परिसरातील मॅक्सी लाइफ रुग्णालयात हालवण्यात आले. त्यांचे प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी डोंबिवलीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले असल्याचे सांगण्यात आले आहे. सरिता खानचंदानी यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून याप्रकरणी विठ्ठलाची पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सरिता खानचंदानी यांनी आत्महत्या का केली असा प्रश्न उल्हासनगरवाशांना पडला आहे.या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

याच रोमा अपार्टमेंटच्या टेरेसवरून ॲड. सरिता खानचंदानी यांनी आत्महत्या केली

ॲड. सरिता खानचंदानी या हिराली हिराली फाउंडेशनच्या संस्थापक होत्या. त्यांनी ध्वनी प्रदूषणाविरोधात दीर्घकाळ कायदेशीर लढा दिला. शहरात रात्री उशिरापर्यंत वाजणारे डीजे मिरवणुकांमध्ये नियमबाह्य डेसिमल आवाज यामुळे होणारे ध्वनी प्रदूषण या विरोधात त्यांनी न्यायालयीन कारवाई केली आहे. त्यांच्या पुढाकारामुळे शहरातील ध्वनी प्रदूषण कमी करण्यात मोठा यश मिळालं तसेच त्यांनी वालधनी नदी प्रदूषण विरोधातही अनेक याचिका दाखल करून नागरिकांना स्वच्छ पर्यावरण मिळाव यासाठी प्रयत्न केले. पर्यावरण प्रेमी असलेल्या सरिता खानचंदानी यांच्या जाण्यामुळे त्यांच्या चाहत्यांवर दुःखाचा डोंगर कोसळले आहे.

ॲड. जय गायकवाड यांनी या घटनेबाबत सांगितले ही घटना अत्यंत दुखद आहे. आम्ही खानचंदानी परिवाराच्या दुःखात सहभागी आहोत. तरी सर्व नागरिकांना आव्हान आहे की भविष्यात कितीही त्रास, कितीही अडचणी आल्या तरी अशा भूमिका घेऊ नका, मला किंवा संघटनेला संपर्क करा, आपण एकत्रितपणे मार्ग काढू, आम्ही सोबत आहोत, मदत करू पण एक गोष्ट लक्षात ठेवा जीव देऊ नका. आपण लढा द्यायचा आहे, हार मानायची नाही.असे ते म्हाणाले

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कोल्ड्रिंक, चहा ,कॉफी व पेढ्यांमध्ये गुंगीच्या औषध मिसळून लुटमारी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांवर विठ्ठलवाडी...

उल्हासनगर दि.१९ ( प्रमोद दळवी ) : कोल्ड्रिंक चहा कॉफी व पेढ्यामध्ये गुंगीचे औषध मिसळून नागरिकांना बेशुद्ध करून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन व रोख...

ऋषभ पंतने कसोटी उपकर्णधारपद गमावले, प्रिन्स यादवला ODI कॉल-अप – अफगाणिस्तान मालिकेसाठी भारताच्या संघाच्या...

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मंगळवारी भारतामध्ये जून महिन्यात खेळल्या जाणाऱ्या अफगाणिस्तान विरुद्ध एकदिवसीय कसोटी आणि तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी...

नागरिक चळवळीने 300 आठवड्यांत महाराष्ट्रातील खारफुटीतून 1,200 टन कचरा साफ केला

कोविड-19 लॉकडाऊन दरम्यान तीन नागरिकांपासून जे सुरू झाले ते महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या समुदायाच्या नेतृत्वाखालील पर्यावरण चळवळीत बहरले आहे. मॅन्ग्रोव्ह क्लीनअप ड्राइव्हने अलीकडेच सलग...

कोरेगाव पार्क येथे वकिलाने कारमध्ये विनयभंग केल्याची तक्रार केल्यानंतर चार जणांना अटक

पुणे : एका वकिलाने सोमवारी सकाळी पोलिसात तक्रार दाखल केली की, रविवारी रात्री 11.30 च्या सुमारास कोरेगाव पार्कमध्ये एका कारमध्ये त्यांच्या दोन...

“जो माणूस प्रश्न विचारतो तो एक मिनिटासाठी मूर्ख असतो, जो माणूस विचारत नाही तो...

कन्फ्यूशियस (प्रतिमा: विकिपीडिया) असे काही कोट आहेत जे शतकानुशतके जिवंत राहतात कारण ते अनुभवांबद्दल बोलतात जे खरोखर कधीच अदृश्य होत नाहीत. माणूस तंत्रज्ञान...

error: Content is protected !!