उल्हासनगर दि.१८ ( प्रमोद दळवी ) : शिवसेनेचे मुख्य नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, , व कल्याण लोकसभेचे लोकप्रिय खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली व उल्हासनगर महानगरग प्रमुख राजेंद्र चौधरी व शिवसेना विभाग प्रमुख सुनील सिंग हरपाल उर्फ कलवा यांच्या नेतृत्वाखाली व जिल्हाप्रमुख गोपाळजी लांडगे यांच्या उपस्थितीत उल्हासनगरातील कै हनुमंत म्हात्रे फाउंडेशन व एकविराआई महिला मंडळ वडोलगाव उल्हासनगर ३ येथील संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश करत शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. प्रवेश केलेल्या सर्वांचा शिवसेनेमध्ये स्वागत करण्यात आले .

महाराष्ट्रातील सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे व कल्याण लोकसभेचे कार्यसम्राट व लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे महाराष्ट्रात करीत असलेली विकास कामे पाहून शिवसेना पक्षात अनेकांनी प्रवेश केले आहेत. महाराष्ट्रात शिवसेना पक्ष मजबूत करण्यासाठी शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. उल्हासनगर देखील शिवसेना पक्ष मजबूत करण्यासाठी अनेकजण शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे पाहायला मिळत आहे .





























