Homeशहर"हिंद-दी-चादर” निमित्त २३ फेब्रुवारी २०२६ रोजी सामूहिक गीत गायन कार्यक्रम उत्साहात संपन्न

“हिंद-दी-चादर” निमित्त २३ फेब्रुवारी २०२६ रोजी सामूहिक गीत गायन कार्यक्रम उत्साहात संपन्न

उल्हासनगर दि.२३ : शीखांचे नववे गुरु, गुरु तेग बहादुर (हिंद-दी-चादर) यांच्या ३५० व्या शहीदी समागम निमित्त दिनांक २३ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजता कोकण विभागातील सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये सामूहिक गीत गायन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

त्या अनुषंगाने उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळांमध्येही सामूहिक गीत गायनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. विशेषतः शाळा क्र. २४ व शाळा क्र. १८ येथे महापौर सौ. अश्विनी कमलेश निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत गीत गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला.

महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. किशोर गावस यांनी समागमाच्या ऐतिहासिक व सामाजिक महत्त्वावर भाष्य केले. या सामूहिक गीत गायन उपक्रमाची नोंद “Best of India Records” या संस्थेकडून घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली तसेच या ऐतिहासिक उपक्रमाचा आपण सर्वजण अभिमानाने भाग आहोत, असेही नमूद केले.

यावेळी महापौर सौ. अश्विनी कमलेश व महानगरपालिकेचे अधिकारी यांनी संबंधित शाळांची पाहणी केली. पाहणी दरम्यान शाळेमध्ये विद्यार्थ्यांना डिजिटल स्क्रीनच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाद्वारे दिल्या जाणाऱ्या अध्यापनाचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. या उपक्रमाबाबत समाधान व्यक्त करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर होत असल्याचे नमूद करण्यात आले.

सदर कार्यक्रमास महानगरपालिकेचे उप-आयुक्त अनंत जवादवार, शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी धनगर ,सहा. आयुक्त तथा जनसंपर्क अधिकारी अजय साबळे, सहा. आयुक्त गणेश शिंपी, मनिष हिवरे, सौ. सलोनी निवकर, विद्युत विभाग प्रमुख हनुमंत खरात, अभिलेखा विभाग प्रमुख अच्युत सासे, विधी विभाग प्रमुख राजा बुलानी, मुख्य स्वच्छता निरिक्षक एकनाथ पवार, सामन्य प्रशासन विभाग प्रमुख अजित गवारी, पर्यावरण विभाग दत्तात्रय जाधव, सिस्टम अॅनलिस्ट सौ. श्रध्दा बाविस्कर उपस्थित होते. कार्यक्रम शांततेत व उत्साहात यशस्वीरीत्या पार पडला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

SBI च्या हलगर्जीपणामुळे अयोध्या राम मंदिर दान चोरी सोडणार नाही : ट्रस्टचे खजिनदार गोविंददेव...

राम मंदिर ट्रस्टच्या खजिनदाराने सुरक्षेच्या व्यवस्थेतील त्रुटींची कबुली दिली ज्यामुळे लोकांना देणगीचे पैसे काढता आले पुणे: देणगी चोरी प्रकरणानंतर स्वामी गोविंददेव गिरी महाराज...

बिग बँग नंतर एक अब्ज वर्षांहून कमी काळातील सर्वात आधीच्या आकाशगंगा व्यवस्थित होत्या, IUCAA...

(वर डावीकडे) संशोधनात वापरल्या गेलेल्या वैश्विक इतिहासाच्या पहिल्या अब्ज वर्षातील गोलाकार आकाशगंगांपैकी एक. (खाली डावीकडे) जवळपास 318 दशलक्ष प्रकाशवर्षे दूर असलेली लंबवर्तुळाकार आकाशगंगा....

फुटबॉल अमरत्वाचा एक विजय: फ्रान्सच्या विजयानंतर स्पेनने युरोपच्या ‘अस्पृश्य’ विक्रमाशी बरोबरी केली

मंगळवार, 14 जुलै 2026 रोजी डॅलसजवळ, टेक्सासमधील आर्लिंग्टन येथे फ्रान्स आणि स्पेन यांच्यातील विश्वचषक उपांत्य फेरीच्या फुटबॉल सामन्याच्या अगोदर मौनाच्या क्षणी स्पेनचे सदस्य...

महा मंत्रिमंडळाने महिला अल्पवयीन कैद्यांच्या पुनर्वसनासाठी आर्थिक मदत दुप्पट करून ५० हजार रुपये करण्यास...

महिला व बाल विकास विभागांतर्गत सहाय्यक अनुदान योजना राबविण्यात येत असल्याचे सरकारी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. मुंबई: सुटका झालेल्या महिला अल्पवयीन कैद्यांच्या पुनर्वसनासाठी देण्यात...

2047 पर्यंत प्रीमियर लिबरल आर्ट्स इन्स्टिट्यूट म्हणून उदयास येण्यासाठी डेक्कन कॉलेजने महत्त्वाकांक्षी सुधारणा केल्या

अध्यापन, दस्तऐवजीकरण आणि संशोधन बळकट करण्यासाठी भारताच्या ज्ञान परंपरांना आधुनिक पध्दतींसह जोडणे, उदारमतवादी कला, मानविकी आणि वारसा शिक्षणासाठी देशाचे प्रमुख गंतव्यस्थान म्हणून मजबूत...

error: Content is protected !!