Homeशहरसिने-नाट्य सांस्कृतिक गुढी चा पहिलावहिला कलावंत मेळावा दिमाखात संपन्न.

सिने-नाट्य सांस्कृतिक गुढी चा पहिलावहिला कलावंत मेळावा दिमाखात संपन्न.

मुंबई दि. ७ : नुकताच सिने-नाट्य सांस्कृतिक गुढी चा पहिलावहिला कलावंत मेळावा राशी स्टुडिओ, माने वखार, करीरोड, मुंबई १२ . या ठिकाणी प्रसिद्ध सिने-नाट्य कलावंत, दिग्दर्शक, तंत्रज्ञ, निर्माते यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

हा मेळावा एकत्रितरीत्या साजरा करण्यामागे उद्देश एवढाच होता कीं तळागाळातील सर्व कलावंतांनी एकत्र यावे, विचारांची देवाणघेवाण व्हावी, त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा शिवाय एकमेकांच्या भेटीगाठी होऊन कामासंदर्भात चर्चा होईल आणि प्रत्येक कलावंताला त्याच्या हाताला काम मिळेल. या मेळाव्याचे आयोजन सर्वश्री दिलीप दळवी, डॉ.किशोर खुशाले, अनिल सुतार, महेश्वर तेटांबे, शीतल माने-शेळके आणि सिद्धी कामथ यांनी केले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणुन महाराष्ट्र बाजारपेठ चे संस्थापक,अध्यक्ष डॉ.कौतिक दांडगे, प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक सदानंद राणे, प्रसिद्ध हास्य अभिनेते कांचन पगारे आदी मान्यवर उपस्थित होते.

या मेळाव्यात अनेक कलावंतांनी सहभाग घेऊन आपली कला सादर केली त्यात प्रामुख्याने लावणी नृत्य, एकपात्री अभिनय, नाट्य प्रवेश, कराओके गायन आणि खास करून प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक अनिल सुतार यांनी स्व.शाहीर दादा कोंडके यांच्या गीतांवर केलेलं नृत्य आणि प्रसिद्ध वादक कलावंत डॉ.किशोर खुशाले यांनी काही निवडक वाद्यांची माहिती आपल्या कल्पकतेने मांडून रसिकांची वाहवा मिळवली. प्रसिद्ध अभिनेत्री सिद्धी कामथ यांनी या संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आपल्या मधाळ आणि रसाळ वाणीने करून रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. आणि महेश्वर भिकाजी तेटांबे यांनी जमलेल्या सर्व कलावंत, अतिथी यांचे आभार मानले. हा पहिलावहिला कलावंत यशस्वी करण्यासाठी सिद्धी कामथ आणि शीतल माने-शेळके यांनी विशेष मेहनत घेतली. त्याचप्रमाणे या मेळाव्यासाठी सर्वश्री.अरविंद घेवडे, प्रमोद मोहिते, आबा पेडणेकर, शंकर पिसाळ, अविनाश राऊत, उदय साटम यांनी सर्वतोपरी सहकार्य केलं. अशा तऱ्हेने कलावंतांच्या उत्साहात पहिलावहिला कलावंत मेळावा जोशात आणि दिमाखात संपन्न झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मुंबईत फेरीवाल्याचा भोसकून खून, अटक

मुंबई: मृत व्यक्तीने आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर सार्वजनिकरित्या बदनामी केल्याच्या संशयावरून शनिवारी एका 42 वर्षीय भाजी विक्रेत्याला 31 वर्षीय फेरीवाल्याचा भोसकून खून केल्याच्या...

77 लीटर चांदी, कृत्रिम दागिन्यांची चोरी करताना 4 पकडले

पुणे : पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेने 23 एप्रिल रोजी चाकण येथील दागिन्यांच्या शोरूममधून 77.22 लाख रुपयांच्या चांदीच्या आणि इमिटेशन ज्वेलरीच्या चोरीप्रकरणी पाच संशयितांना अटक...

‘तू एक जादूगार आहेस’: ऐतिहासिक टप्पा पार केल्यानंतर शाहरुख खानची सुनील नरीन यांना भावनिक...

KKR स्टार सुनील नरेनसोबत शाहरुख खान. (फोटो क्रेडिट: एसआरकेची एक्स पोस्ट) नवी दिल्ली: कोलकाता नाईट रायडर्सचा सह-मालक शाहरुख खान याने सोशल मीडियावर...

“लोग क्या कहेंगे”: सामाजिक दबाव भारतीय मुलांना कसा आकार देतो

"लोग क्या कहेंगे" हे चिंतेसारखे वाटते, परंतु मुलांसाठी ते अनेकदा पाळत ठेवते. हे त्यांना शिकवते की कौटुंबिक प्रतिमा भावनिक प्रामाणिकपणापेक्षा अधिक महत्त्वाची असते. ते...

महाराष्ट्र जनगणना 2027: डेटा गोपनीय, घरोघरी पडताळणी अनिवार्य, अधिकारी म्हणतात

पुणे: 2027 च्या जनगणनेसाठी स्वयं-गणना शुक्रवारी राज्यभरात सुरू झाली आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, अचूकता आणि गोपनीयतेची खात्री करून डेटा संरक्षण आणि...

error: Content is protected !!