Homeशहरसर्वोत्तम महापालिका आयुक्त म्हणून उल्हासनगर महापालिकेने पटकावला प्रथम क्रमांक

सर्वोत्तम महापालिका आयुक्त म्हणून उल्हासनगर महापालिकेने पटकावला प्रथम क्रमांक

महाराष्ट्र राज्य स्थापन दिनाचा ६६वा वर्धापन दिन उल्हासनगर महापालिकेत उत्साहाने साजरा

उल्हासनगर दि.१ : १  मे २०२५  रोजी “ महाराष्ट्र राज्य स्थापन दिनाच्या ६६ व्या वर्धापन दिन शुभारंभ “ प्रशासक तथा आयुक्त सौ.मनिषा आव्हाळे (भा.प्र.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली उल्हासनगर महापालिका मुख्यालय येथे अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला. महाराष्ट्र राज्य सरकार द्वारे १०० दिवसांची कार्यालयीन सुधारणांची विशेष मोहिम अतंर्गत सर्वोत्तम महानगरपालिका आयुक्त म्हणून प्रथम क्रमांकावर उल्हासनगर महानगरपालिकेचे नाव घोषीत करण्यात आले. महाराष्ट्रातील एकूण २९ महानगरपालिकेमधून सर्वोत्तम महानगरपालिका आयुक्त म्हणून ८६.२९ टक्के गुणासह उल्हासनगर महानगरपालिकेने प्रथम क्रमांक पटकवण्यात आला आहे .

गुरुवारी सकाळी ९ .१५  वाजता महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात प्रशासक तथा आयुक्त सौ. मनिषा आव्हाळे यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. राष्ट्रगीत व राज्यगीत झाल्यानंतर महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच त्यानंतर तंबाखू मुक्त शपथ घेण्यात आली. आमदार कुमार आयलानी यांच्या उपस्थितीत प्रशासक तथा आयुक्त सौ. मनिषा आव्हाळे यांच्या हस्ते समाज मंदिरे व्यवस्थापन प्रणालीचे शुभारंभ करण्यात आले. स्थायी समिती सभागृह येथे महाराष्ट्र राज्य सरकार द्वारे १००  दिवसांची कार्यालयीन सुधारणांची विशेष मोहीम अंतर्गत सर्वोत्तम महापालिका आयुक्त म्हणून प्रथम क्रमांक मिळवल्यामुळे प्रशासक तथा आयुक्त सौ. मनिषा आव्हाळे यांचा सत्कार करण्यात आला . त्यावेळी उपस्थित सर्वांना मिठाई देवून तोंड गोड करण्यात आले. त्यानंतर प्रशासक तथा आयुक्त यांनी सकाळी  १०.३०  वाजता पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांना संबोधित केले व महाराष्ट्र राज्य सरकार द्वारे १००  दिवसांची कार्यालयीन सुधारणांची विशेष मोहीम अंतर्गत सर्वोत्तम महापालिका आयुक्त म्हणून प्रथम क्रमांकावर उल्हासनगर महापालिकेचे नाव घोषित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

महाराष्ट्रातील एकूण २९  महापालिकेमधून सर्वोत्तम महापालिका आयुक्त म्हणून ८६.२९ टक्के  गुणासह प्रथम क्रमांक व महाराष्ट्रातील सर्व कार्यालयांमधून ८६.२९ टक्के गुणासह दुसरा क्रमांक पटकवण्यात आल्याची माहिती देण्यात आली. व पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देण्यात आली. सदर कार्यक्रमात अतिरिक्त आयुक्त किशोर गवस, उप- आयुक्त सौ, विशाखा मोटघरे, विजय खेडकर, दिपाली चौगुले आनंत जवादवार, सहा. संचालक नगररचनाकार ललित खोब्रागडे, सहा. आयुक्त तथा जनसंपर्क अधिकारी अजय साबळे, सहाय्यक आयुक्त श्रीमती मयुरी कदम, सुनील लोंढे, मुख्य लेखाअधिकारी किरण भिलारे, मुख्य लेखापरीक्षक शरद देशमुख, प्रभाग अधिकारी गणेश शिंपी, मनीष हिवरे, सौ अलका पवार, सौ सलोनी निवकर, महापालिका सचिव सौ. प्राजक्ता कुलकर्णी, मुख्य बाजार निरीक्षक विनोद केणे, मुख्य स्वच्छता निरीक्षक एकनाथ पवार, सुरक्षा अधिकारी यशवंत सगळे, कर अधिक्षक श्रीमती नीलम कदम, सिस्टीम एनालिस्ट, श्रीमती श्रद्धा बाविस्कर, क्रीडा विभाग प्रमुख शांताराम चौधरी विधी विभाग प्रमुख राजा बुलानी, भांडार विभाग प्रमुख अंकुश कदम व इतर अधिकारी कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उल्हासनगर पालिका आयुक्त विकास ढाकणे यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपसचिव पदी नियुक्ती झाल्यावर, आयुक्त पदाचा पदभार तात्कालीन अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्याकडे सोपविण्यात आला होता.त्यानंतर शासनाकडून पुणे महानगरपालिकेच्या स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांची उल्हासनगर महापालिका आयुक्त पदी नियुक्ती जाहीर केली होती.विशेष म्हणजे १९९६ साली महानगरपालिकेची स्थापना झाल्यापासून आयुक्त पदावर विराजमान होणाऱ्या मनिषा आव्हाळे ह्या पहिल्याच महिला अधिकारी ठरल्या त्यावेळी त्यांचे सर्वत्र कौतुक झाले होते. आणि आता राज्य सरकारच्या १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहीमेतील निकालात सर्वोत्तम महानगरपालिका आयुक्त म्हणून १०० पैकी ८६.२९ टक्के गुण मिळवत पहिला क्रमांक पटकावला असल्याने मनिषा आव्हाळे यांच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे उल्हासनगर महानगरपालिकेचा नावलौकिक वाढला असून त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मानहानीच्या खटल्यात मुंबईतील विकासकाला मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम दिलासा दिला आहे

एसडी कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड आणि म्हाडा पुनर्विकास प्रकल्पाला लक्ष्य करणाऱ्या कथित बदनामीकारक सोशल मीडिया पोस्ट, व्हिडिओ आणि संदेश पुढील सुनावणीपर्यंत प्रसारित करू नयेत,...

कायदेशीर नोटीस AITA आणि DLTA च्या निष्कासनासाठी कॉल करते

पुणे: अडचणीत सापडलेल्या ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (एआयटीए) आणि दिल्ली लॉन टेनिस असोसिएशनला मंगळवारी दिल्लीच्या भूमी आणि विकास अधिकारी (एल अँड डीओ)...

CWG 2026: गुलवीर सिंगने इतिहास रचला, पुरुषांच्या 10,000 मीटरमध्ये पदक जिंकणारा पहिला भारतीय ठरला

मंगळवार, 28 जुलै 2026 रोजी, ग्लासगो, स्कॉटलंड येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 10,000 मीटरच्या अंतिम फेरीत भारताच्या गुलवीर सिंगने अंतिम रेषा ओलांडून...

हेन्री फोर्ड कोट: हेन्री फोर्डचे दिवसाचे कोट: “जेव्हा सर्वकाही तुमच्या विरुद्ध चालले आहे असे...

पर्यटकांसाठी, प्रवासाची कल्पना बऱ्याचदा चित्र-परिपूर्ण किनारे, लक्झरी रिसॉर्ट्स आणि Instagram-योग्य क्षणांचा संग्रह म्हणून विकली जाते. पण उत्साही प्रवाशांसाठी, ज्यांनी पुरेसा प्रवास केला...

जपानी कंपन्या परदेशी नोकरीच्या संधींसाठी AISSMS अभियांत्रिकी विद्यार्थ्यांशी संलग्न आहेत

एआयएसएसएमएस येथे आयोजित जागतिक करिअरच्या उभारणीवर अभिमुखता कार्यक्रम पुणे : जपानमध्ये कुशल अभियंत्यांची मागणी सतत वाढत असल्याने जपानी उद्योगातील एका शिष्टमंडळाने अलीकडेच AISSMS...

error: Content is protected !!