Homeशहरसराईत गुन्हेगारांवर झडप : ५८ मोटरसायकली / स्कूटर हस्तगत : ४१...

सराईत गुन्हेगारांवर झडप : ५८ मोटरसायकली / स्कूटर हस्तगत : ४१ गुन्हे उघडकीस : गुन्हे शाखा घटक – २ भिवंडी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

भिवंडी दि. ३० ( प्रमोद दळवी ) : भिवंडी गुन्हे शाखा घटक -२ भिवंडीच्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोटरसायकली चोरी करण्यात पटाईत असणाऱ्या सराईत गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांना अटक करून त्यांच्याकडून ५८ मोटरसायकली/स्कूटर सुमारे १०  लाख ६०  हजार रुपये किमतीच्या हस्तगत केल्या असून त्यांच्याकडून जवळपास मोटरसायकल चोरीचे एकूण ४१  गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे

ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात मोटरसायकल चोरीच्या घटना वारंवार घडत होत्या. या मोटरसायकल चोर टोळीचा शोध घेण्यासाठी व घटनांना आळा घालण्यासाठी ठाणे पोलीस आयुक्तालय मार्फत सर्व पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने गुन्हे शाखा घटक – २  भिवंडीचे पोलीस अधिकारी व कर्मचारी मोटरसायकल चोरट्यांचा शोध घेत तपास करीत होते.

गुन्हे शाखा घटक -२  भिवंडी येथील येथील पोहवा / ८३८ साबीर शेख यांना मोटर सायकल चोरट्यांबाबत गुप्त माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखा घटक -२  भिवंडीचे पोलीस अधिकारी व कर्मचारी या  पथकाने सराईत गुन्हेगार/आरोपी १) गणेश उर्फ गणु राजु मोरे वय २१ वर्षे, रा. सेकंड पॉकेट, म्हाडा कॉलणी, खोणी गाव, डोंबिवली व २) साहेबअली उर्फ छोटु सुलतानअली शेख वय १९ वर्षे, रा. ताडाळी, कामतघर, भिवंडी यांना मोठ्या शिताफीने सापळा रचून ताब्यात घेतले. त्या दोघांकडे मोटरसायकल चोरीच्या संदर्भात पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्यांनी ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतून जवळपास ५८  मोटरसायकल /स्कूटर चोरी केले असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांनी उघडकीस आणली.

पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीच्या त्या ५८  मोटरसायकली/ स्कूटर सुमारे १० लाख ६०  हजार रुपये किमतीच्या हस्तगत करण्यात यश आले आहे. याशिवाय त्या दोघांकडे अधिक चौकशी पोलिसांनी केली असता त्यांच्याविरुद्ध मोटरसायकल चोरीचे ४१ गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल दाखल असल्याचे समजले. त्यात नारपोली पोलीस ठाण्यात – २६ , भिवंडी शहर पोलीस ठाण्यात  – २ , शांतीनगर पोलीस ठाण्यात – २ , निजामपुरा पोलीस ठाण्यात -१ , बाजारपेठ पोलीस ठाण्यात -३ , बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात – १ ,वर्तक नगर पोलीस ठाण्यात -२ , नौपाडा पोलीस ठाण्यात – २ , भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात – २  असे ४१  मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे उघडकीस आले आहे.

या मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकामी. डॉ. पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, ठाणे, अमरसिंह जाधव  पोलीस उप आयुक्त, गुन्हे, ठाणे, व शेखर बागडे, सहा. पो. आयुक्त गुन्हे शोध १, ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, घटक २ भिवंडीचे वपोनि शितल राऊत, सपोनि श्रीराज माळी, सपोनि मिथुन भोईर, पोउनि रविंद्र बी. पाटील, पोउनि रामचंद्र जाधव, पोउनि राजेश शिंदे, सपोउनि सुधाकर चौधरी, सपोउनि सुनिल साळुंखे, पोहवा/४४९० निलेश बोरसे, पोहवा / ८३८ साबिर शेख, पोहवा/६९७३ सुदेश घाग, पोहवा/२०७६ प्रशांत राणे, पोहवा / ४७४६ प्रकाश पाटील, पोहवा /१३७४ शशिकांत यादव, पोहवा/४३७७राजेश गावडे, पोहवा/६९६० वसंत चौरे, पोहवा /१९१९ रंगनाथ पाटील, पोहवा/२८१९ वामन भोईर, पोहवा/५७३४ किशोर थोरात, पोहवा/४६३३ शिवाजी मुर्तडक, पोशि/१९९७ अमोल इंगळे, पोशि/७७०० विजय कुंभार, पोशि/७६८९ भावेश घरत, पोशि/१७४७ नितीन नंदीवाले, पोशि/६२८३ सर्फराज तडवी, पोशि/३७२८ संजय चव्हाण, चापोशि/२०९३ रविंद्र साळुंखे व मपोहवा /६८३३ माया डोंगरे, मपोहवा/६७४० अनुष्का पाटील, मपोहवा/६८०० दक्षता सुतार, मपोहवा / ७४९४ सायली गंभेरा यांनी ही धडाकेबाज कामगिरी केली. पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उल्हासनगर शहरातील विकास कामासंदर्भात आमदार कार्यालयात विविध विभागांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

आमदार कुमार आयलानी यांनी विकास कामांचा आढावा घेत दिल्या महत्त्वाच्या सूचना उल्हासनगर दि .१८ ( प्रमोद दळवी ) : आमदार कुमार आयलानी यांनी शहरातील...

8 व्या CPC पॅनेलने अपंगत्व पेन्शन कराच्या रांगेत जखमी सैनिकांची भेट घेतली

अध्यक्ष न्यायमूर्ती (निवृत्त) रंजना प्रकाश देसाई यांच्या नेतृत्वाखाली 8व्या केंद्रीय वेतन आयोग समितीच्या शिष्टमंडळाने एनडीएला भेट दिली. पुणे : न्यायमूर्ती (निवृत्त) रंजना प्रकाश...

आंतरराष्ट्रीय योगा दिन उत्साहात साजरा करण्यासाठी आमदार कुमार आयलानी यांनी घेतली ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या...

उल्हासनगर दि. १८ ( प्रमोद दळवी ) : २१ जून रोजी होणारा आंतरराष्ट्रीय योग दिन भव्य आणि यशस्वीपणे साजरा करण्यासाठी उल्हासनगरमधील विविध ज्येष्ठ नागरिक...

‘आमच्या मोहिमेला कशामुळे अडचणीत आणण्यात आले…’- सलग सहाव्या पराभवानंतर पीबीकेएस प्रशिक्षकाचा प्रामाणिक प्रवेश

धर्मशाला येथील HPCA क्रिकेट स्टेडियमवर दुपारच्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) कडून पराभव पत्करावा लागल्यानंतर पंजाब किंग्ज (PBKS) ने त्यांचे पूर्ण लक्ष...

मुंबईतील ७९ नगरसेवकांना राजकीय वारसदार म्हणून निवडणूक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे, माजी नगरसेवकांनी...

BMC मतदान" decoding="async" fetchpriority="high"/> मुंबई: माजी बीएमसी नगरसेवक, शिवसेनेच्या विद्यमान खासदाराची मुलगी आणि नुकत्याच झालेल्या बीएमसी निवडणुकीत पराभूत झालेल्या भाजप पक्षाच्या कार्यकर्त्याचा सात...

error: Content is protected !!