- कल्याण लोकसभा – शिवसेना आढावा व मार्गदर्शन बैठक संपन्न
डोंबिवली दि २ : कल्याण लोकसभा मतदारसंघात नुकताच डोंबिवली (पूर्व) येथे उपमुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार झालेली शिवसेनेची आढावा व मार्गदर्शन बैठक ही संघटनेच्या बळकटीकरणासाठी एक महत्वपूर्ण पर्व ठरली आहे. मंत्री श्री. भरत सेठ गोगावले यांनी यावेळी स्पष्ट सांगितले की, “शिवसेना पक्षासाठी सर्वांनी आपले वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवून, एकसंघ आणि समन्वयाने काम करणे ही काळाची गरज आहे. पक्ष म्हणजे केवळ बॅनर नाही, तर तो एक विचार आहे.” असे सांगितले.

यावेळी प्रमुख मार्गदर्शन मंत्री श्री.भरत सेठ गोगावले आणि जिल्हाप्रमुख श्री.गोपाळ लांडगे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत विविध संघटनात्मक मुद्द्यांवर विचारमंथन करण्यात आले. स्थानिक पातळीवरील अडथळे, विकास प्रकल्पांची सद्यस्थिती आणि आगामी विधानसभा निवडणुकांची रणनिती यावर सखोल चर्चा झाली.

या बैठकीत पक्षातील पदाधिकाऱ्यांमधील संवाद आणि एकात्मता वाढवणे, स्थानीक विकास प्रकल्पांची अंमलबजावणी अधिक गतीने करणे,कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणासाठी विस्तृत कार्यक्रम राबवणे, रमाकांत रिक्षा चालक-मालक संघटनेचे निवेदन आणि त्यावर तत्काळ कारवाईचे आश्वासन,आगामी निवडणुकांसाठी बुथ पातळीवरील संघटन व्यवस्था अधिक मजबूत करणे या प्रमुख मुद्यांवर चर्चा करण्यात आली .

रमाकांत चव्हाण रिक्षा चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष श्री हरजिंदरसिंह भुल्लर यांचा कडून मांडलेली मागणी अधिवेशनात मांडण्यात येईल, असे मंत्री भरत सेठ गोगावले यांनी ठामपणे जाहीर केले आणि संबंधित प्रश्नांचे तात्काळ निवारण करण्याचे आश्वासन दिले.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने रखडलेल्या अनेक प्रकल्पांना नवजीवन दिले आहे. पूर्वीच्या काँग्रेस राजवटीत ज्या संकल्पनांना फक्त कागदावरच ठेवले गेले, त्या संकल्पना आजच्या सरकारने प्रत्यक्ष अंमलात आणल्या आहेत.. नागरी पायाभूत सुविधा, वाहतूक सुधारणा, सार्वजनिक वाहने, आणि नागरी आरोग्य यासारख्या क्षेत्रांतील प्रगती हे या सरकारच्या कृतिशीलतेचे स्पष्ट दर्शन आहे. असे मंत्री भरत सेठ गोगावले म्हणाले.

या बैठकीत आमदार बालाजी किणीकर, उपजिल्हाप्रमुख अरुण आशान, दिलीप गायकवाड , महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी. शहरप्रमुख राजेंद्रसिंह भुल्लर (महाराज), ,महिला शहर संघटक सौ.मनीषा भानुशाली, कल्याण युवासेना लोकसभा सचिव व रमाकांत चव्हाण रिक्षा चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष हरजिंदरसिंह उर्फ ( विक्की ) भुल्लर, उपशहर प्रमुख सुरेश सोनवणे, जयकुमार केनी, गजानन बामणकर ,जितू उपाध्याय, युवासेना शहर अधिकारी बाळा श्रीखंडे,विभाग प्रमुख प्रमोद पांडेय ,ज्ञानेश्वर मरसाळे अधि उपस्तीत होते .





























