उल्हासनगर दि ३० : रैप सिंगर कुलदीपसिंग लबाना ह्यांची उल्हासनगरातील नागरी सुविधांची बिकट परिस्तिथी व प्रशासनाच्या भ्रष्ट कारभारावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या रैप साँगच्या यशाबद्दल उल्हासनगर कांग्रेस तर्फे सत्कार करण्यात आला .
उल्हासनगर शहरातील फॉरवर्ड लाईन परिसरातील एका छोट्याश्या घरात म्यूजिक स्टूडियो चालवून रैप गाणे बनवणाऱ्या कुलदेपसिंग लबाना ह्यांची उल्हासनगर कांग्रेस पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट. काही दिवसांपूर्वी कुलदीपसिंघ ह्यांनी उल्हासनगर शहरातील नागरी सुविधांचा बिकट परिस्थिती ,प्रशासनातील भ्रष्टाचार व लोक प्रतिनिधींची कार्यशैलीवर “शहर के गड्डे” हे रैप वीडियो सांग बनवले व ते प्रचंड वायरल झाले. उल्हासनगर शहरातील नागरिकाची व्यथा त्यांनी ह्या विडियोसॉंग मधून अगदी प्रभावशाली पद्धतीने मांडल्याने व त्यांच्या गाण्याला मिळालेल्या यशा बद्दल उल्हासनगर काँग्रेसच्या वतीने त्यांचे त्यांच्या स्टुडिओत जाऊन सत्कार करण्यात आले.
ह्या वेळेस जिल्हा अध्यक्ष रोहित साळवे ह्यांनी कुलदीपचे कौतुक करताना म्हणाले की अश्या जनजागृती करणाऱ्या रैप साँग मुळे तरी प्रशासनाणे लाज बाळगून रस्ते बनवावे , उल्हासनगर काँग्रेसने देखील दोन महिने पूर्वी रस्त्यांच्या दुरवस्थे वर आंदोलन केले. त्या वेळी थोडे फार रस्ते दुरुस्त करण्यात आले. परंतु एकंदरीत शहरातील रस्ते व इतर नागरी सुविधांचा बोजवारा उडालेला आहे. ह्या गाण्या मुळे नागरिकांचे व्यथा आत्ता तरी प्रशासनाच्या लक्षात येईल हे अपेक्षा आहे.
ह्या आधी देखील कुलदीपी ह्यांचे “५०० मे बिक जाओगे” हे गाणे प्रचंड वायरल झाले होते ,अश्याच प्रकारे त्यांच्या टॅलेंट मुळे ते अजून मोठे सिंगर बनतील व उल्हासनगरचे नाव रोशन करतील ही अपेक्षा केली व त्यांनी ह्या पुढे देखील त्याचे गाण्यांच्या माध्यमातून समाजसेवेचे काम सुरू ठेवावे अश्या शुभेच्छा दिल्यात. नागरिकांनी त्यांचे हे गाणे नक्की यू ट्यूब वर बघून त्याला लाइक करावे व त्यांचे यूट्यूब चैनल “कुलदीपसिंग लबाना” ला सब्सक्राइब करण्याचे आव्हान केले.ह्या वेळेस जिल्हा अध्यक्ष रोहित साळवे ह्यांच्या सोबत ब्लॉक अध्यक्ष नानिक आहुजा ,व्यापारी सेल अध्यक्ष पवन मिराने , भूषण मसाले आदी पदाधिकारी उपस्थित होते.





























