Homeशहरशहरातील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी ट्रॅफिक वॉर्डन व वाहतूक विभागातील कर्मचाऱ्यांनी घेतले पालिका...

शहरातील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी ट्रॅफिक वॉर्डन व वाहतूक विभागातील कर्मचाऱ्यांनी घेतले पालिका सभागृहात प्रशिक्षणाचे धडे

उल्हासनगर दि.२० : उल्हासनगर महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त यांनी दिलेल्या निर्देशानुसार उल्हासनगर महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये नियुक्त करण्यात आलेले एकूण ४५ ट्रॅफिक वार्डन व वाहतूक विभागातील कर्मचारी यांच्याकरिता वाहतूक समस्यांचे निराकरण करणे व वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी श्रीम.स्नेहा करपे, उप-आयुक्त (परिवहन) यांचे मार्गदर्शनाखाली शुक्रवारी दुपारी २:३० ते ४:३० या वेळेत महापालिका सभागृहात प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.

त्यासाठी “मानक कार्यप्रणाली” (SOP) तयार करण्यात आली असून, यामध्ये दृश्यमान फलक व सूचना लावणे, माईकद्वारे नागरिकांना जागरूक करणे, नो-पार्किंग व फूटपाथ चिन्ह स्पष्ट करणे, आपत्कालीन मार्ग मोकळे ठेवणे, तसेच बेकायदेशीर पार्किंग हाताळण्यासाठी चुकीची पार्किंग ओळखणे, फोटो घेणे, त्यामध्ये वेळ/स्थळ लिहिणे, नम्रपणे वाहन हलवण्याची विनंती करणे, पुनरावृत्ती करणाऱ्यांचा रिपोर्ट करणे, दररोजच्या कारवाईची नोंद ठेवणे, फूटपाथ, मोड रस्ते, शाळा/बाजार परिसर, कोणते वाहन कोणत्या ठिकाणी आहे ते लक्षात घेणे, अनधिकृतपणे, वाहतूकीस कोंडी करणाऱ्या वाहनाचा फोटो घेणे, वाहन न हटविणाऱ्या वाहनांवर नोटीस/दंडात्मक कारवाई करणेसाठी संबंधित विभागाकडे अहवाल पाठविणे, वाहतुकीस अडथळा करून अरेरावी करणाऱ्यांची तक्रार जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये करणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारी वाहने योग्य पध्दतीने लॉक करणे. महत्वाचे ठिकाणी AI कॅमेरे बसविणे. अशा महत्त्वाच्या सूचना सांगण्यात आल्या.

सहा. आयुक्त (परिवहन) अजय साबळे यांनी ट्रॅफिक वार्डन व वाहतूक विभागातील कर्मचारी यांचेकडून वाहतूक कोंडी दूर करण्याबाबत समस्या, कारणे व सूचना मांडण्यास सांगितल्या. त्यान्वये अनेक कर्मचाऱ्यांनी वाहतूक कोंडीबाबत मनोगत व्यक्त केले. नेमूण दिलेल्या ठिकाणी जी.पी.एस. लावणे, दंडात्मक वसुली करतानाचे फोटो ग्रुपवर टाकणे, नोडल ऑफिसर नियुक्त करून कर्मचाऱ्यांचा हजर-गैरहजरबाबतचा गोषवारा देणे, बायोमेट्रीक हजेरी घेणे, तसेच रस्त्यांवरील खड्डे, पावसात रस्त्यांवर पाणी साचण्याची ठिकाणे यांची पाहणी करून त्यांचे फोटो व्हॉटस्अप ग्रुपवर टाकण्याच सूचना संबंधितांस दिल्या, जेणेकरून त्यावर कार्यवाही करून वाहतूक समस्या सोडविणेस मदत होईल. तसेच प्रभाग समिती क्र.१ येथील वाहतूक कोंडी, फर्निचर बाजार येथील वाहतूस अडथळा ठरणारी वाहने यांचेवर दंडात्मक कारवाई करणे, शासकीय वाहने, महापालिका परिवहनच्या बसेस यांना मार्ग मोकळा करून देणे, मोठ्या रस्त्यांवरील भाजी विक्रेते, फेरिवाले हटविणे याबाबत संबंधितांस सूचना दिल्या. तसेच यापुढे वाहतूक कोंडी सोडविणेच्या कामात हयगय करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरूध्द कठोर कारवाई करण्यात येईल अशी सूचना संबंधितांस दिल्या.

उप-आयुक्त (परिवहन) श्रीम. स्नेहा करपे यांनी अधिकृत व अनधिकृत थांबे, महापालिकेची पार्किंग ठिकाणे यांच्याबाबत उपस्थित ट्रॅफिक वार्डन यांचेकडून माहिती घेतली व याबाबतच्या समस्या सोडविणे व त्यावर उपाययोजना करणे, तसेच शहाड स्टेशन येथील सेंच्युरी रेयॉन, बिर्ला गेट, शहाड रिक्षास्टॅन्ड ते महापालिका मुख्यालय येथील वाहतूक कोंडीवर कारवाई करणेसाठी जास्त वर्दळिच्यावेळी गस्त फेऱ्या वाढविणे, वाहतूक कोंडी करणाऱ्यांवर नियमीतपणे दंडात्मक कारवाई करणे, दंडात्मक कारवाई करणेबाबत ध्येय निश्चित करून जास्तीत-जास्त दंडात्मक कारवाई करणेचे निर्देश संबंधितांस निर्देश दिले.

सदर प्रशिक्षणास उप-आयुक्त (परिवहन) श्रीम. स्नेहा कर्पे, सहा. आयुक्त (परिवहन) अजय साबळे, ए.पी.आय.मनिषराजे पठाणे, डी.जी.आय एन.बी. अहिरे, कल्याण आर.टी.ओ.चे डी.वाय. अ.श्री. नलावडे, महापालिका सुरक्षा अधिकारी यशवंत सगळे, बस आगार व्यवस्थापक दत्तात्रय शिरसाठ व रमाकांत कदम तसेच भांडार विभाग प्रमुख अंकुश कदम, विधी विभाग प्रमुख राजा बुलानी, ट्रॅफिक वार्डन व वाहतूक, महापालिका वाहन विभागातील कर्मचारी उपस्थीत होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भारताच्या 2036 ऑलिम्पिक बोलीला टाइमलाइन मिळते: आयओसीने यजमान कधी निश्चित केले जाईल हे उघड...

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (IOC) अध्यक्ष कर्स्टी कोव्हेंट्री (AP फोटो) नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (IOC) सुधारित यजमान निवड प्रक्रियेला मान्यता दिल्यानंतर 2029 च्या...

मराठी भाषणामुळे लालबुंद, महासभा अध्यक्षांनी मागितली माफी | मुंबई बातम्या

मुंबई : मराठी 'अस्मिता' (अभिमान) हा निवडणुकीचा मुद्दा राहिलेल्या शहरात, विधानसभेत शोकसंदेश वाचताना अनेक मराठी शब्दांचा चुकीचा उच्चार करून स्वतःला लाजीरवाणी स्थितीत...

‘या मुलीला कधीच पाहिले नाही’: चेतनच्या वडिलांनी नकार दिला मुलाने केतन अग्रवालला लोहगडच्या कड्यावरून...

लोहगड किल्ल्यावरील पूर्वनियोजित हत्येतील आरोपीच्या वडिलांनी आपल्या मुलाचा बचाव केला आणि दावा केला की तो एक जवळचा माणूस होता आणि व्यावसायिकाच्या जीवघेण्या पडझडीत...

In a recent update, the Maharashtra Real Estate Regulatory Authority (MahaRERA) has offered significant clarity for homebuyers. प्राधिकरणाने असे मानले...

चेतनने पैसे दिले नाहीत, केतन परत आला नाही: लोहगड किल्ल्यावरील सुरक्षा रक्षक 400 फूट...

लोहगड किल्ल्यावरील सुरक्षा रक्षकाच्या (एल) खात्याने केतन अग्रवालच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या थंड घटनांवर प्रकाश टाकला आहे. पुणे: 18 जूनच्या सकाळी लोहगड किल्ल्यातील तिकीट...

error: Content is protected !!