Homeशहरवीज समस्या न सोडविल्यास तीव्र आंदोलन : शिवसेनेचा महावितरण कंपनीला ईशारा

वीज समस्या न सोडविल्यास तीव्र आंदोलन : शिवसेनेचा महावितरण कंपनीला ईशारा

उल्हासनगर दि २०  : उल्हासनगर शहरातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असून वीज बिल देखील जास्त येणे व अन्य समस्या मोठ्या प्रमाणात जाणवत आहेत. या संदर्भात वीज महावितरण कंपनीने तोडगा न काढल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेनेतर्फे  महावितरण कार्यालयाचे बैठकीत देण्यात आला आहे .

शिवसेना महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी यांच्या नेतृत्वाखालील साईबाबा मंदिर येथील महावितरण कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी कल्याण तेजश्री मुख्य अभियंता विजय फुंदे, उल्हासनगरचे कार्यकारी अभियंता हरीश भराडे यांच्या सोबत वरील सर्व विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.  यावेळी नागरीकांना भेडसावत असलेल्या समस्यांबाबत लवकरात लवकर तोडगा काढण्यात यावा नाही तर शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला .

शिवसेनेच्या या भूमिकेनंतर उपस्थित महावितरणचे आधिकारी यांनी या सर्व समस्या एक महिन्यात सोडवण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी   शिवसेना महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी, उपजिल्हा प्रमुख दिलीप गायकवाड, युवासेना शहर अध्यक्ष बाळा श्रीखंडे, समाजसेवक रवि खिलनानी, उपशहर प्रमुख सुरेश सोनवणे, आदेश पाटील,विल्सन डिसोजा,तुषार बादंल अमोल सरदार,विजय पवार, कैलास म्हात्रे व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व कॅम्प नंबर एक विभागातील महिला काही प्रमाणात उपस्थित होत्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विश्वचषकातील सर्वात चर्चेत असलेला नवीन नियम मोडूनही जुड बेलिंगहॅमला का पाठवले नाही

ज्यूड बेलिंगहॅमने इंग्लंडच्या विश्वचषकाच्या ड्रॉ दरम्यान फिफाच्या नवीन नियमाबद्दल गोंधळ निर्माण केला/ प्रतिमा: एक्स इंग्लंडचा मिडफिल्डर ज्युड बेलिंगहॅम मंगळवारी घानाबरोबरच्या गोलशून्य बरोबरीच्या वेळी...

एफडीएने जेजे महानगर रक्तपेढीची तपासणी केली, चौकशीचे आदेश दिले

तक्रारीनंतर ही तपासणी करण्यात आली मुंबई: राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने (FDA) अनेक तक्रारींनंतर भायखळा येथील जेजे रुग्णालय संकुलात असलेल्या सरकारी जेजे महानगर...

प्रेयसीच्या इशाऱ्यावरून आरोपी चौधरीने लोहगड किल्ल्यावर रियाल्टरला ढकलून दिले.

पुणे : अग्रवाल यांची मंगेतर सिया गोयल हिच्यासोबत रचलेल्या योजनेनुसार 18 जून रोजी आरोपी चेतन चौधरी याने रिअल इस्टेट फर्मचे संचालक केतन...

मुंबई पाऊस अपडेट: आयएमडीने ऑरेंज अलर्ट जारी केला, उड्डाणे आणि रेल्वे सेवांना फटका; प्रवाशांनी...

मान्सून अखेर कोरड्या मुंबईत दाखल झाला आणि कसा! अलीकडील अपडेटमध्ये, मुंबईतील पावसाच्या गोंधळामुळे प्रवास विस्कळीत झाला आहे आणि ऑरेंज अलर्ट सुरू झाला...

पत्नीवर चाकूने वार करून खून केल्याप्रकरणी सफाई कामगारावर गुन्हा दाखल

पुणे : काही घरगुती वादातून मंगळवारी रात्री उशिरा राहत्या घरी 32 वर्षीय पत्नीचा खून केल्याच्या आरोपाखाली खराडी पोलिसांनी एका सफाई कामगारावर गुन्हा...

error: Content is protected !!