Homeशहरशशांक शेंडे साकारणार रहस्यमय मांत्रिकाची भूमिका

शशांक शेंडे साकारणार रहस्यमय मांत्रिकाची भूमिका

मुंबई दि.२७ : आपली प्रत्येक भूमिका अत्यंत प्रभावीपणे साकारत रुपेरी पडद्यावर आपली वेगळी ओळख निर्माण करणारे अभिनेता शशांक शेंडे लवकरच प्रेक्षकांसमोर नव्या आणि गूढ भूमिकेत झळकणार आहेत. त्यांच्या दमदार अभिनयामुळे प्रत्येक भूमिकेला वेगळं वजन मिळतं, आणि त्यामुळेच त्यांच्या प्रत्येक भूमिकेबद्दल रसिकांमध्ये कायमच उत्सुकता पाहायला मिळते.

‘घबाडकुंड’ या आगामी मराठी चित्रपटामध्ये शशांक शेंडे तंत्र-मंत्रात पारंगत असलेल्या सिद्धयोगी मांत्रिकाची भूमिका साकारताना दिसणार आहेत. या चित्रपटात त्यांची व्यक्तिरेखा एका मांत्रिकाची असून, मंत्र आणि तांत्रिक विद्येचा गूढ अभ्यास केलेला ‘बाबा’ अशी त्यांची ओळख आहे. चित्रपटातील त्यांच्या लूकचीही सध्या चर्चा रंगली आहे. संपूर्ण टक्कल,  कपाळावर काळा टिळा, गळ्यात माळा आणि डोळ्यातील गूढ भाव या व्यक्तिरेखेला अधिकच  भयावह बनवतात. या भूमिकेबद्दल बोलताना शशांक शेंडे म्हणतात, ‘ही भूमिका खूप वेगळी आणि आव्हानात्मक आहे. एका मांत्रिकाच्या मनोविश्वात शिरून त्याची शक्ती, त्यामागचं तत्त्वज्ञान आणि त्याचा उद्देश प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट नक्कीच खिळवून ठेवेल.’

हा रहस्यमय मांत्रिक नेमका कोण आहे? त्याच्या शक्तींचं गूढ काय आहे? आणि त्याचा खरा हेतू काय आहे? हे  पहाणं  नक्कीच औत्सुक्याचं आहे. ‘घबाडकुंड’ हा चित्रपट या सर्व प्रश्नांची उत्तरं देत प्रेक्षकांना थरारक आणि गूढ प्रवासावर घेऊन जाणार असून या चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. एक भव्य आणि रहस्यमय ‘युनिव्हर्स’ मोठ्या पडद्यावर साकारण्याचा धाडसी प्रयत्न दिग्दर्शक प्रितम एस. के. पाटील यांनी केला आहे. या अभिनव संकल्पनेला ‘आयकॉन दी स्टाईल’ संस्थेचे निर्माते डॉ. रसिक कदम यांची भक्कम साथ लाभली आहे. मराठी चित्रपटसृष्टीत नवा ट्रेंड निर्माण करण्याच्या तयारीत असलेला ‘घबाडकुंड’ येत्या १९ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भारत महिला वि बांगलादेश महिला लाइव्ह स्कोअर, महिला T20 विश्वचषक 2026: भारत बांगलादेशचा सामना...

भारत महिला वि बांगलादेश महिला लाइव्ह स्कोअर, महिला T20 विश्वचषक 2026: मधल्या फळीतील फलंदाजीतील संकटे आणि आळशी क्षेत्ररक्षणामुळे त्यांची मोहीम रुळावरून घसरण्याची भीती असताना,...

आज 2% गुंतवणुकीसह भारताची हरित ऊर्जा हवामान-प्रूफिंग भारताच्या अक्षय ऊर्जा पाइपलाइनमध्ये $28 अब्ज नुकसान...

2030 पर्यंत, भारतातील नियोजित नूतनीकरणक्षम ऊर्जा पायाभूत सुविधांपैकी जवळजवळ 90% गंभीर हवामान आव्हानांना तोंड देऊ शकतात (प्रतिनिधी प्रतिमा) हवामान धोके 90% धोक्यात...

पहा: लोहगड किल्ला ढकलण्याच्या एक दिवस आधी, सिया गोयलने मंगेतर केतन अग्रवालच्या हत्येचा ‘प्लॅन’...

एक मंगेतर आणि तिच्या प्रियकराने स्थावर मालमत्ता संचालकाच्या हत्येची बारकाईने योजना आखली. सीसीटीव्ही फुटेजने त्यांची कॅफे मीटिंग उघड केली, जिथे त्यांनी त्याला लोहगड...

पुष्कळ पालकत्व चांगल्यापेक्षा जास्त नुकसान करते: ते काय आहे आणि 5 चिन्हे तुम्ही एक...

आपल्या मुलांनी आयुष्यात यशस्वी व्हावे अशी पालकांची इच्छा असते. मग ते शैक्षणिक असो, खेळ असो किंवा दैनंदिन मूल्ये असोत. मुलांसाठी, ते पालकांच्या पाठिंब्याने आणि...

नसरापूर बालिका बलात्कार-हत्या : पुणे न्यायालयाने ६५ वर्षीय वृद्धाला दोषी ठरवले, २९ जून रोजी...

आरोपी सीसीटीव्हीत कैद पुणे - जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे 1 मे रोजी तीन वर्षांच्या मुलीचे अपहरण, बलात्कार आणि खून केल्याप्रकरणी पुण्यातील विशेष...

error: Content is protected !!