अंबरनाथ दि. ३० ( प्रमोद दळवी ) : केंद्र आणि राज्य शासनाच्या ‘विशेष संक्षिप्त पुनरिक्षण’ (SIR) उपक्रमांतर्गत, अंबरनाथ मतदार संघातील विस्कळीत मतदार यादी सुधारण्यासाठी अंबरनाथ तहसीलदार कार्यालयात आमदार डॉ. बालाजी किणीकर यांचा पुढाकारणे महत्त्वाची बैठक पार पडली.

तहसीलदार अमित पुरी यांच्या दालनात झालेल्या बैठकीतील चर्चेत मागील निवडणुकीतील त्रुटी, मतदारांचे चुकीचे स्थलांतर, नावे गाळणे आणि इतर तांत्रिक चुकांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. लोकप्रतिनिधींच्या शंकांचे निरसन करून, एक पारदर्शक आणि दोषमुक्त मतदार यादी तयार करण्याचे नियोजन यावेळी करण्यात आले. त्यावेळी शिवसेना गटनेते रविंद्र करंजुले, मा. उपनगराध्यक्ष.अब्दुल भाई शेख, नगरसेवक सुभाष साळुंके,.कुणाल भोईर,.संदीप तेलंगे, शैलेश भोईर, सौ.रोहिणी भोईर, सौ.मोनिका रिंजड,मा. नगरसेवक रविंद्र पाटील, चंद्रकांत भोईर, डॉ. जुबेर शाहा, शहर संघटक सौ.मालतीताई पवार,विभाग प्रमुख अनिल मराठे, हनिष मेनन,सौ.शिल्पा शिंदे,तसेच इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.





























