Homeशहरराज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त उल्हासनगर मनसे तर्फे अनेक लोकपयोगी कार्यक्रमांचे आयोजन

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त उल्हासनगर मनसे तर्फे अनेक लोकपयोगी कार्यक्रमांचे आयोजन

  • उल्हासनगर शहरातील अनेक चौका-चौकांमध्ये लाडू वाटून लाडक्या नेत्याचा वाढदिवस साजरा…
  • राज-उद्धव यांनी एकत्र यावे या वाढदिवसाच्या निमित्ताने जनसामान्यांकडून सदिच्छा…

उल्हासनगर दि १४ :  महाराष्ट्राचा बुलंद आवाज राज साहेब ठाकरे यांचा ५७वा वाढदिवस महाराष्ट्र सैनिकांकडून संपूर्ण महाराष्ट्रभर मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येतोय.त्याच अनुषंगाने उल्हासनगर मनसे तर्फे आपल्या लाडक्या नेत्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनेक लोकपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मनसेचे विभाग अध्यक्ष कैलास घोरपडे यांच्या प्रभागात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे शहर अध्यक्ष काळु थोरात आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून शहाड स्टेशन परिसर, डी-मार्ट चौक, १ नंबर बस स्थानक परिसर तसेच शहरातील चौका-चौकांमध्ये लाडू वाटप करून आपल्या लाडक्या नेत्याचा वाढदिवस मोठ्या आनंदात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला.

राज साहेब-उद्धव साहेब यांनी एकत्र यावे आणि मराठी जणांचे,महाराष्ट्राचे नेतृत्व करावे अश्या भावना यावेळी लोकांनी बोलून दाखवल्या तसेच ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन अराजकतेकडे चाललेला आपला पूरोगामी महाराष्ट्र पूर्वपदावर आणावा या वाढदिवसाच्या सदिच्छा दिल्या.यावेळी मनसेचे महानगर संघटक मैनुद्दीन शेख, वाहतूक सेनेचे शहर संघटक काळु थोरात, विभाग अध्यक्ष कैलास घोरपडे, कैलास वाघ, उप-विभाग अध्यक्ष गोरख उदार, शाखा अध्यक्ष दीपेश धारिवाल, जगदीश माने, रोहित सिंग, संतोष शर्मा, अमित मिश्रा तसेच महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भारत महिला वि बांगलादेश महिला लाइव्ह स्कोअर, महिला T20 विश्वचषक 2026: भारत बांगलादेशचा सामना...

भारत महिला वि बांगलादेश महिला लाइव्ह स्कोअर, महिला T20 विश्वचषक 2026: मधल्या फळीतील फलंदाजीतील संकटे आणि आळशी क्षेत्ररक्षणामुळे त्यांची मोहीम रुळावरून घसरण्याची भीती असताना,...

आज 2% गुंतवणुकीसह भारताची हरित ऊर्जा हवामान-प्रूफिंग भारताच्या अक्षय ऊर्जा पाइपलाइनमध्ये $28 अब्ज नुकसान...

2030 पर्यंत, भारतातील नियोजित नूतनीकरणक्षम ऊर्जा पायाभूत सुविधांपैकी जवळजवळ 90% गंभीर हवामान आव्हानांना तोंड देऊ शकतात (प्रतिनिधी प्रतिमा) हवामान धोके 90% धोक्यात...

पहा: लोहगड किल्ला ढकलण्याच्या एक दिवस आधी, सिया गोयलने मंगेतर केतन अग्रवालच्या हत्येचा ‘प्लॅन’...

एक मंगेतर आणि तिच्या प्रियकराने स्थावर मालमत्ता संचालकाच्या हत्येची बारकाईने योजना आखली. सीसीटीव्ही फुटेजने त्यांची कॅफे मीटिंग उघड केली, जिथे त्यांनी त्याला लोहगड...

पुष्कळ पालकत्व चांगल्यापेक्षा जास्त नुकसान करते: ते काय आहे आणि 5 चिन्हे तुम्ही एक...

आपल्या मुलांनी आयुष्यात यशस्वी व्हावे अशी पालकांची इच्छा असते. मग ते शैक्षणिक असो, खेळ असो किंवा दैनंदिन मूल्ये असोत. मुलांसाठी, ते पालकांच्या पाठिंब्याने आणि...

नसरापूर बालिका बलात्कार-हत्या : पुणे न्यायालयाने ६५ वर्षीय वृद्धाला दोषी ठरवले, २९ जून रोजी...

आरोपी सीसीटीव्हीत कैद पुणे - जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे 1 मे रोजी तीन वर्षांच्या मुलीचे अपहरण, बलात्कार आणि खून केल्याप्रकरणी पुण्यातील विशेष...

error: Content is protected !!