Homeशहरमुसळधार पाऊस : उल्हासनगरात नाल्यावरील पूल कोसळला, काही ठिकाणी झाडे पडली, अनेक...

मुसळधार पाऊस : उल्हासनगरात नाल्यावरील पूल कोसळला, काही ठिकाणी झाडे पडली, अनेक रस्ते पाण्याखाली,

 उल्हासनगर दि.१४ ( प्रमोद दळवी ) : गेल्या दोन दिवसापासून अतिउखाड्याने नागरिक हैराण झाले होते. उष्णतेची लाट पसरली असताना शनिवारी सायंकाळी अचानक मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे उल्हासनगर शहरातील काही रस्ते पाण्याखाली आले होते. उल्हासनगरातील कॅम्प  नंबर ५  परिसरातील गणेश नगर सेक्शन ३९ ,संतोषी माता मंदिराकडे जाणारा नाल्यावरील जुना पूल कोसळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. व्ही.टी.सी  मैदान व कुर्ला कॅम्प नंबर ३  येथे जुने झाड कोसळले, अचानक आलेल्या मुसळधार पावसामध्ये उल्हासनगर शहरात कोणती जीवित हानी झाली नसल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली आहे

उल्हासनगरात सायंकाळी अचानक विजेच्या कडकडाटसह मुसळधार पावसाने हजेरी लावली. सर्व रस्ते निर्मनुष्य झाले होते. रस्त्याच्या किनारी असणारा नाल्या तुडुंब पाण्याने वाहून ते पाणी रस्त्यावर उतरले होते. रस्त्यावर गुडघाभर पाणी साचलेले चित्र शहरात पाहायला मिळत होते. शहरातील कॅम्प  नंबर ४ परिसरातील सुभाष टेकडीतील आंबेडकर चौकात देखील रस्ता पाण्याखाली आला होता. त्यामुळे त्या ठिकाणाहून जाताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत होती. त्याच दरम्यान रात्री सव्वा आठच्या सुमारास उल्हासनगरातील कॅम्प  नंबर ५  परिसरातील गणेश नगर सेक्शन ३९ ,संतोषी माता मंदिराकडे जाणारा नाल्यावरील जुना पूल कोसळला. या नाल्यावरून परिसरातील लोक रहदारी करत होते. हा पुल तुटल्याने परिसरातील नागरिकांचा संपर्क तुटला आहे. कॅम्प  नंबर ५ परिसरातील शांती प्रकाश आश्रम रस्ता अंबरनाथ ते कल्याण रस्ता, डॉल्फिन क्लब रस्ता, गुलशन नगर रस्ता, गोल मैदान रस्ता, आधी रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले होते. या तुंबलेल्या पाण्यातूनच नागरिक आपले वाहने काढत होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नसरापूर बालिका बलात्कार-हत्या : पुणे न्यायालयाने ६५ वर्षीय वृद्धाला दोषी ठरवले, २९ जून रोजी...

आरोपी सीसीटीव्हीत कैद पुणे - जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे 1 मे रोजी तीन वर्षांच्या मुलीचे अपहरण, बलात्कार आणि खून केल्याप्रकरणी पुण्यातील विशेष...

नेमारने स्कॉटलंडविरुद्ध ऐतिहासिक पुनरागमन केल्यानंतर ब्राझीलच्या दुर्मिळ विश्वचषकात पेलेशी बरोबरी केली

मियामी गार्डन्स, फ्ला., बुधवार, 24 जून 2026 रोजी स्कॉटलंड आणि ब्राझील यांच्यातील विश्वचषक गट सी सॉकर सामन्यानंतर ब्राझीलचा नेमार (10) साजरा करत आहे....

मुंबई लोकलमध्ये हत्या: पोलिसांनी आरोपी रोशन सुवर्णाचा कसा माग काढला

मुंबई लोकल ट्रेनच्या दरवाजाच्या वादातून २१ वर्षीय तरुणाची हत्या केल्याचा आरोप मुंबई: मुसळधार पावसात रेल्वेचा दरवाजा बंद ठेवण्यावरून झालेल्या वादाने मुंबईच्या उपनगरीय रेल्वे...

अण्णा हजारे 5 जुलैच्या उपोषणावर ठाम; सीआयसीने म्हटले आहे की चर्चेची आणखी एक फेरी...

महाराष्ट्र सरकारने आरटीआयचे नवीन नियम मागे न घेतल्यास 5 जुलैपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा ज्येष्ठ कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी दिला आहे. पुणे :...

मालदीव, स्वित्झर्लंड किंवा बाली परवडत नाही? हे 6 बजेट-अनुकूल पर्याय वापरून पहा

आपल्या सर्वांनाच आपल्या स्वप्नातील गंतव्यस्थानी प्रवास करायचा आहे, परंतु काहीवेळा याचा अर्थ खिशात छिद्र पाडणे होय. मालदीव, स्वित्झर्लंड, दुबई आणि बाली सारखी ठिकाणे नेहमी...

error: Content is protected !!