Homeशहररस्त्यावरील उभ्या बसला रिक्षाची धडक : काचा मानेत घुसल्याने उल्हासनगरातील रिक्षा चालकाचा...

रस्त्यावरील उभ्या बसला रिक्षाची धडक : काचा मानेत घुसल्याने उल्हासनगरातील रिक्षा चालकाचा मृत्यू

उल्हासनगर दि १७ ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगर रेल्वे स्टेशन येथून ठाकुर्लीला प्रवासी भाडे सोडून येत असताना ठाकुरली परिसरात रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या खाजगी बसला रिक्षाची धडक लागल्याने रिक्षाच्या पुढच्या काचा मानेत घुसल्याने उल्हासनगरातील रिक्षा चालकाचा मृत्यू झाल्याची दुखत घटना घडल्याने सुभाष टेकडीतील सर्व रिक्षा चालकांमध्ये दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अपघातात मयत झालेल्या त्या दुर्दैवी रिक्षा चालकाचे नाव विकास उर्फ विकी प्रेमनाथ गाडे (४५) असे आहे. ते उल्हासनगरातील सुभाष टेकडी परिसरातील साईबाबा नगर येथे राहत होते. विकास हे रिक्षा चालक होते. ते सामाजिक कार्यात अग्रेसर होते. याशिवाय दलित पॅंथरचे उल्हासनगर शहर अध्यक्ष होते. विकास यांनी गुरुवारी रात्री दीडच्या सुमारास उल्हास स्टेशन येथून ठाकुर्लीचा भाड भरलं होतं. त्या प्रवाशाला ठाकुर्लीला सोडून ते उल्हासनगरला परत येत होते. त्यावेळी त्यांच्या रिक्षात त्यांचा मित्र शैलेश हा देखील मागे बसला होता. ठाकुरली परिसरात ९५  फीट रोडवर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका खाजगी बसला त्यांच्या रिक्षाची मागून जोरात धडक बसली. त्यावेळी रिक्षाच्या पुढच्या काचा तुटून विकासच्या मानेत शिरल्या. अति रक्तस्त्राव झाल्यामुळे विकास यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात शैलेशला देखील मुका मार लागला आहे.

रिक्षा चालक विकास गाडे याचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना कळताच उल्हासनगरातील सुभाष टेकडी मधील रिक्षा चालकांमध्ये दुःखाचे वातावरण पसरले. या दुखत घटनेचा सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे . विकास गाडे यांच्या काढण्यात आलेल्या अंत्ययात्रेत विविध क्षेत्रातील मंडळी, सर्व रिक्षा चालक, विकास यांची मित्रमंडळी, नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहीद मारोतीराव दगडू जाधव रिक्षा चालक-मालक संघटनेच्या वतीने विकास यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. विकास गाडे यांच्या पश्चात त्यांची पत्नी मुले असा परिवार आहे. विकास यांचा  अचानक घडलेल्या या अपघाती निधनामुळे सुभाष टेकडीतील रिक्षा चालकांमध्ये दुःख व्यक्त करण्यात येत आहे. विकास हे सुभाष टेकडीतील जुने जाणते रिक्षा चालक होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मुंबई उच्च न्यायालयातील वकिलाची चाकूने भोसकून हत्या, ट्रान्सजेंडरसह ३ जणांना अटक

छत्रपती संभाजीनगर येथील बीड बायपास रोडवर मुंबई उच्च न्यायालयाच्या वकिलाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली (प्रतिनिधी एआय इमेज) छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर येथील...

TCS नाशिक प्रकरणः फरार महिला कर्मचाऱ्याचा शोध सुरू; नाशिकचे पोलिस मुंबईत पोहोचले, पतीची चौकशी

मुंबई : नाशिकमध्ये दाखल झालेल्या टीसीएस छळवणूक आणि कथित धर्मांतर प्रकरणातील आरोपी फरार महिला कर्मचाऱ्याच्या शोधात नाशिक गुन्हे शाखेचे पथक शुक्रवारी मुंब्रा...

कॉसमॉस बँकेच्या माजी अध्यक्षांचे निधन | पुणे बातम्या

पुणे : कॉसमॉस कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचे ​​माजी अध्यक्ष मुकुंद अभ्यंकर यांचे गुरुवारी निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. त्यांना 1978 मध्ये बँकेच्या...

‘हे एक गाव घेते’: एरिन राउटलिफ एकटेपणा, निष्ठा आणि दुहेरी खेळाडू म्हणून जीवनावर

एरिन राउटलिफ (एल) आणि गॅब्रिएला डॅब्रोव्स्की (आर) यांनी 2024 मध्ये यूएस ओपन महिला दुहेरीचे दोन विजेतेपद आणि वर्षअखेरीस डब्ल्यूटीए फायनल्स जिंकले. (एएफपी) नवी...

जागतिक स्कायलाइन्सवर वर्चस्व गाजवणारे आणि लक्झरी रिअल इस्टेटची पुन्हा व्याख्या करणारे टॉप 5 आयकॉनिक...

23 मरिना हे दुबई मरीना मधील निवासी गगनचुंबी इमारत आहे आणि ती मध्य पूर्वेतील सर्वात उंच निवासी इमारतींपैकी एक आहे. टॉवर त्याच्या लक्झरी अपार्टमेंट्स,...

error: Content is protected !!