Homeशहरमुरबाडमध्ये ४ सप्टेंबरला ओबीसी समाजाचे तहसिल कार्यालयासमोर साखळी उपोषण

मुरबाडमध्ये ४ सप्टेंबरला ओबीसी समाजाचे तहसिल कार्यालयासमोर साखळी उपोषण

मुरबाड दि.२ (सतिशचंद्र घरत)  : गेल्या २९ ऑगस्ट पासून मुंबई आझाद मैदानात मराठा समाजाचे जोरदार उपोषण सुरु असून सरकारवर दबाव टाकून ओबीसी आरक्षणातून मराठ्यांचा सरसकट समावेश करून घेण्याची  व ओबीसी प्रमाणपत्र देण्याची चुकीची मागणि होत आहे. असे झाल्यास हा ओबीसी समाजावर अन्याय होईल या अन्याय विरोधात ओबीसी समाज हि आक्रमक होताना दिसत आहे. समाजाच्या विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालय मुरबाड येथे ४ सप्टेंबर २०२५ रोजी साखळी उपोषण व आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. ठाणे जिल्ह्यातील विविध ओबीसी संघटनांच्यावतीने हे आंदोलन होणार असून, यावेळी तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन सादर केले जाणार आहे.

या आंदोलनाची रूपरेषा निश्चित करण्यासाठी तालुक्यातील सर्व ओबीसी समाजातील घटकांच्या प्रमुखांची बैठक एक सप्टेंबर रोजी कुणबी भवन येथे संपन्न झाली. यावेळी आंदोलनाचे नियोजन, साखळी उपोषणासाठी आवश्यक तयारी तसेच प्रशासनाशी संपर्क याबाबत चर्चा करण्यात आली असून साखळी उपोषणाचे निवेदन आज ओबीसी बांधवांच्या  वतीने मुरबाड तहसीलदारांना देण्यात आले.

ओबीसी समाजातील सर्व संघटना, व समाजबांधव यांनी नियोजित आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सर्व ओबीसी समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.आंदोलनाचे निवेदन देण्यासाठी मुरबाड तालुका कुणबी समाज संघटनेचे तालुका अध्यक्ष गणपत विशे,राष्ट्रीय ओबीसी महासंघ ठाणे ग्रामीण अध्यक्ष प्रकाश पवार, उमेश पाटिल,ओबीसी उपोषणकर्ते शंकर वडवले, सोपान गोल्हे, नितीन राणे, यशवंत जाधव, पत्रकार श्याम राऊत उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

फुटबॉल अमरत्वाचा एक विजय: फ्रान्सच्या विजयानंतर स्पेनने युरोपच्या ‘अस्पृश्य’ विक्रमाशी बरोबरी केली

मंगळवार, 14 जुलै 2026 रोजी डॅलसजवळ, टेक्सासमधील आर्लिंग्टन येथे फ्रान्स आणि स्पेन यांच्यातील विश्वचषक उपांत्य फेरीच्या फुटबॉल सामन्याच्या अगोदर मौनाच्या क्षणी स्पेनचे सदस्य...

महा मंत्रिमंडळाने महिला अल्पवयीन कैद्यांच्या पुनर्वसनासाठी आर्थिक मदत दुप्पट करून ५० हजार रुपये करण्यास...

महिला व बाल विकास विभागांतर्गत सहाय्यक अनुदान योजना राबविण्यात येत असल्याचे सरकारी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. मुंबई: सुटका झालेल्या महिला अल्पवयीन कैद्यांच्या पुनर्वसनासाठी देण्यात...

2047 पर्यंत प्रीमियर लिबरल आर्ट्स इन्स्टिट्यूट म्हणून उदयास येण्यासाठी डेक्कन कॉलेजने महत्त्वाकांक्षी सुधारणा केल्या

अध्यापन, दस्तऐवजीकरण आणि संशोधन बळकट करण्यासाठी भारताच्या ज्ञान परंपरांना आधुनिक पध्दतींसह जोडणे, उदारमतवादी कला, मानविकी आणि वारसा शिक्षणासाठी देशाचे प्रमुख गंतव्यस्थान म्हणून मजबूत...

आयलीन लॅविन: ही 101 वर्षीय पत्रकार अजूनही काम करते आणि स्वतंत्रपणे जगते. तिच्या रोजच्या...

लोक नेहमी दीर्घ आणि निरोगी आयुष्याचे रहस्य शोधत असतात. फिटनेस ट्रेंड आणि विशेष आहार हे संभाषणावर वर्चस्व गाजवत असताना, 101 वर्षीय पत्रकार...

कलम १५५ च्या गैरवापरप्रकरणी ६९ महसूल अधिकाऱ्यांना विभागीय चौकशीला सामोरे जावे लागणार

ही कारवाई कलम 155 च्या कथित गैरवापरावर राज्याच्या कारवाईचा एक भाग आहे, ही तरतूद महसुली नोंदींमधील कारकुनी किंवा अपघाती चुका सुधारण्यास परवानगी देते...

error: Content is protected !!