उल्हासनगर दि २८ ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळी समाजसेवक शिवाजी रगडे यांनी पॅनल क्रमांक १२ मधील आनंद नगर परिसरातील नागरिकांना त्यांच्या परिसरात माता रमाबाई भीमराव आंबेडकर व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे प्रवेशद्वार उभारण्यात येईल असे आश्वासन दिले होते. या विकास कामाचा पहिला नारळ याच ठिकाणी फोडल्या जाईल असा शब्द नागरिकांना दिला होता. आज तो शब्द शिवाजी रगडे यांनी पूर्ण करून दाखवला.

खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या खासदार निधीतून उल्हासनगरातील कॅम्प नंबर तीन परिसरातील पॅनल क्रमांक १२ मधील आनंद नगर येथे माता रमाबाई भिमराव आंबेडकर व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे प्रवेशद्वार उभारण्यात यावे अशी मागणी नगरसेविका सविता तोरणे रगडे यांनी केली होती. आज या प्रवेशद्वाराचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. उल्हासनगर महानगरपालिकेच्या महापौर अश्विनी कमलेश निकम व शिवसेना महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी यांच्या हस्ते हा भूमिपूजन सोहळा पार पडला. त्यावेळी नगरसेवक आकाश चक्रवर्ती, गजानान शेळके, भगवान मोहिते, दशरथ चौधरी, बापू सोनवणे, वैशाली सोनवणे, आदिनाथ पालवे, समाधान प्रधान, साठे सर, रोहित मुळे, अमोल सरदार, शशी भूषण सिंग, नासिर खान, नरेंद्र करोतिया गजानन शेळके, प्रकाश म्हात्रे ,शाहिद मुलानी, वत्सलाबाई बगाडे व तमाम प्रतिष्ठित व्यक्तींच्या उपस्थितीत हा भूमिपूजन सोहळा पार पडला. तसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या निधीतून येणाऱ्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनचे काम देखील सुरू करण्यात येईल अशा आश्वासन शिवाजी रगडे यांनी दिले





























