Homeशहरमहाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे विजेचा दाब अचानक वाढल्याने अनेक...

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे विजेचा दाब अचानक वाढल्याने अनेक वीज ग्राहकांच्या घरातील विद्युत उपकरणे निकामी.

  • नुकसानग्रस्त विज ग्राहकांचे पंचनामे करून त्यांना तात्काळ शासकीय मदत उपलब्ध करून देण्याची मनसेची मागणी..

उल्हासनगर दि २४ :  महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी,उल्हासनगर – १ यांच्या कार्यक्षेत्रातील तानाजीनगर,  हनुमान नगर परिसरात शनिवार दु.१२.३० ते १.०० च्या सुमारास विजेचा दाब वाढला आणि उच्च दाबामुळे वीज ग्राहकांच्या घरातील विजेवर चालणाऱ्या उपकरणांमध्ये शॉक सर्किट होऊन टीव्ही, फ्रीज, गिजर, पंखे, ट्यूब लाईट,एल ई डी दिवे,वाय- फाय राऊटर यांच्यात बिघाड झाला ते निकामी झाले.

तानाजीनगर, हनुमाननगर परिसरात हातावर पोट असणारे गोर-गरीब समाजघटक म्हणजे नाका कामगार, कंत्राटी कामगार, फळ विक्रेते, रिक्षाचालक वर्ग मोठ्या प्रमाणात राहतो, बहुतेक रहिवाश्यांच्या घरातील विजेची उपकरणे ही कर्ज काढून हफ्त्यावर घेतलेली आहेत, काहींचे पुर्ण हफ्ते ही फीटलेले नाहीत परंतु विद्युत वितरण कंपनीच्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळे घरातील विद्युत उपकरणे निकामी झालेली असल्याने अगोदरच डोक्यावर कर्जाचा डोंगर आणि आता हे हजारोंचे नुकसान यामुळे तानाजीनगर,हनुमान नगर परिसरातील नागरिक हवालदिल झालेले आहेत.

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळे परिसरातील शेकडो वीज ग्राहकांचे हजारोंच्यावर नुकसान झालेले असल्याने विज वितरण कंपनी कडून अति-शिघ्रपणे सदर  परिसरातील नुकसानग्रस्त वीज ग्राहकांच्या घरी जाऊन पंचनामे तयार करून त्यांना तत्काळ मदत उपलब्ध करून द्यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीकडे निवेदनाद्वारे केलेली आहे.

नुकसानभरपाईच्या कामात दिरंगाई झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीच्या निष्क्रिय कार्यपद्धती विरोधात गोर-गरिब वीज ग्राहकांना नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी आंदोलनाचे हत्यार उपसावे लागेल असा इशाराही मनसे तर्फे देण्यात आलेला आहे. यावेळी मनसेचे मैनुद्दीन शेख, विभाग अध्यक्ष कैलास घोरपडे,कैलास वाघ,पांडुरंग गुंड आणि मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उल्हासनगरसाठी २११.०६ कोटींच्या पाणीपुरवठा प्रकल्पाला मंजुरी; शहरवासीयांना मुबलक व शुद्ध पाणी मिळणार: खासदार श्रीकांत...

उल्हासनगर दि. १५ ( प्रमोद दळवी )  : केंद्र सरकारच्या अमृत अभियानांतर्गत उल्हासनगर शहरासाठी २११.०६ कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी पाणीपुरवठा प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे. या...

रेफरी पक्षपाती दाव्यांच्या दरम्यान अर्जेंटिनाला फिफा विश्वचषकातून बाहेर काढण्यासाठी 10 दशलक्षाहून अधिक स्वाक्षरी याचिका

अर्जेंटिनाला फिफा विश्वचषकातून बाहेर काढण्यासाठी 10 दशलक्षाहून अधिक स्वाक्षरी याचिका FIFA आणि सामना अधिकाऱ्यांवर लिओनेल मेस्सी आणि गतविजेत्याची बाजू घेत असल्याचा आरोप करून...

मुंबईच्या व्हीजेटीआयला पायाभूत योजनेसाठी माजी विद्यार्थ्यांकडून मिळालेली सर्वात मोठी देणगी; माजी विद्यार्थी 60 कोटी...

वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूटला सर्वात मोठे माजी विद्यार्थी देणगी मिळाली वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट (VJTI) ही राज्याच्या मालकीची स्वायत्त संस्था आहे जी विद्यापीठ...

केंद्राच्या परवडणाऱ्या घरांच्या योजनेसाठी मुळशी चराई भूमीविरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली | पुणे बातम्या

पुणे : मुंबई उच्च न्यायालयाने राज्याला वळविण्याचा अधिकार असल्याचे सांगितले गायरान केंद्र किंवा राज्य सरकारच्या सार्वजनिक उद्देश/प्रकल्पांसाठी जमिनी (गावातील गुरांच्या मोफत चरण्यासाठी...

या 5 महाकाय पाळीव मांजरी इतक्या मोठ्या आहेत की लोक त्यांना जंगली प्राणी समजतात

नेहमीच एक मांजर आहे ज्याबद्दल लोक बोलणे थांबवू शकत नाहीत. ते असामान्यपणे फ्लफी आहे किंवा त्याचे डोळे निळे आहेत म्हणून नाही, तर त्याच्या आकारामुळे.काही...

error: Content is protected !!