Homeशहरमलंगगडावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आरती : मोठ्या संख्येने शिवसैनिक...

मलंगगडावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आरती : मोठ्या संख्येने शिवसैनिक भाविक सहभागी

उल्हासनगर दि २ (प्रमोद दळवी ) : ठाणे जिल्ह्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अंबरनाथ तालुक्यातील श्रीमलंगगड येथे माघी पौर्णिमेनिमित्त भव्य यात्रोत्सव मोठ्या भक्ती भावात साजरा करण्यात आला. यानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी श्रीमलंगगडावर उपस्थित राहून श्रीमलंग मच्छिंद्रनाथ महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले व मनोभावे पूजा करत आरती केली.

अंबरनाथ तालुक्यातील श्रीमलंगगडावर दरवर्षी माघी पौर्णिमेला होणाऱ्या या उत्सवासाठी यंदाही मोठ्या संख्येने भाविकांनी हजेरी लावली होती. यावेळी उपस्थित भाविकांनी श्रीमच्छिंद्रनाथ महाराज की जय अशा जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. हिंदूंची वहिवाट हीच मलंगगड मुक्तीची पहाट हा मंत्र देत हिंदूहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुढाकाराने श्रीमलंगगड उत्सवाची सुरुवात झाली होती.

धर्मवीर दिघे यांनी सुरू केलेल्या या धार्मिक उत्सवाची परंपरा पुढे नेत आज  राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना मुख्य नेते एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हा उत्सव अत्यंत जल्लोषात साजरा होत आहे. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेत त्यांच्या सोयीसाठी श्रीमलंगगडावर फ्युनिक्युलर  ट्रेनची उभारणी  करण्यात आली असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी फ्युनिक्युलर ट्रेनने प्रवासही केला. श्रीमलंगगडावरील काही मालमत्तांबाबत न्यायालयात प्रकरण प्रलंबित असल्याचे नमूद करत यासंदर्भात लवकरच न्यायालयाचा निर्णय अपेक्षित असून न्याय मिळेल अशी आशा उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. यावेळी आमदार राजेश मोरे, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, शिवसेना उत्तर महाराष्ट्र सचिव भाऊसाहेब चौधरी, ठाणे विधानसभा प्रमुख हेमंत पवार उल्हासनगर महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी, नगरसेवक अरुण आशान,  अश्विनी कमलेश निकम यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी शिवसैनिक आणि मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सांगितले  दरवर्षीप्रमाणे हा मलंगनाथाचा उत्सव यात्रा या ठिकाणी होत असते. हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी ही यात्रा सुरू केली. आणि ती अखंडितपणे आजही सुरू आहे. म्हणून हजारो लाखो भाविक भक्त राज्यभरातून या ठिकाणी दर्शनाला येत असतात. मनोभावे नाथांच दर्शन घेत असतात. नाथांच्या समाधीचे दर्शन घेत असतात आणि या ठिकाणी ही मलंग यात्रा अनेक दिवस या ठिकाणी सुरू असते राज्यातून परराज्यातून देखील हजारो लाखो भाविकया मलंगनाथाच्या उत्सवामध्ये यात्रेमध्ये सहभागी होतात. मी त्यांचे  स्वागत करतो, यावेळेस मलंग भक्तांसाठी फ्युनिक्युलर  ट्रेनची सेवा सुरू झालेले आहे. त्यामुळे यावर्षी ज्या लोकांना वयोवृद्ध आहेत, महिला आहेत त्यांना इच्छा असून देखील मलंगनाथांचं नवनाथांचा दर्शन घेता येत नाही ते वंचित राहतात त्यांना फ्युनिक्युलरमुळे ही सेवा प्राप्त झालेले आहे. मलंगभक्त या ठिकाणी या मलंग मुक्तीच्या यात्रेमध्ये सहभागी होतायत याचा आनंद आहे आणि सगळ्यांना दर्शन घेता येतो याचाही आनंद असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महाराष्ट्र चित्रपट महामंडळाच्या राज्य संघटक पदी चित्रपट निर्माते दीपक मस्के यांची निवड

छत्रपती संभाजीनगर ( औरंगाबाद) दि .२५ ( प्रमोद दळवी ) : महाराष्ट्र चित्रपट महामंडळाचे मुख्य कार्यालय सिडको येथे राज्य कार्यकारणीची बैठक आयोजित करण्यात आली...

अटल सेतूवरून उडी मारलेल्या पतीच्या मृत्यू प्रमाणपत्रासाठी विधवेने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली |...

मुंबई: अटल सेतूवरून कथितरित्या उडी मारलेल्या व्यक्तीच्या विधवेने मुंबई उच्च न्यायालयात आपण मृत झाल्याचे घोषित करावे आणि त्याचे मृत्यू प्रमाणपत्र जारी करण्याचे...

एनर्जी ड्रिंक्स सायलेंट किलर, सहा तरुणांपैकी एकाने दारूचा प्रयत्न केला: अभ्यास

पुणे: ज्ञान प्रबोधिनीच्या मानसशास्त्र संस्थेने शुक्रवारी एक सर्वेक्षण प्रकाशित केले ज्यात तरुणांमध्ये अल्कोहोलचे दुष्परिणाम अधोरेखित केले गेले आणि सहा वृद्ध किशोरवयीन मुलांपैकी एकाने एकदा...

IPL 2026: वैभव सूर्यवंशीचा बदला वाचला 6,6,6,6; प्रफुल्ल हिंगे 24 धावांच्या षटकात बाद झाला

राजस्थान रॉयल्सचा वैभव सूर्यवंशी (पीटीआय फोटो) राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील आयपीएल 2026 च्या चकमकीत वैभव सूर्यवंशीने प्रफुल्ल हिंगेला जोरदार प्रत्युत्तर दिले...

बागकामाची साधने: आवश्यक बागकाम साधने आणि त्यांचे उपयोग: नवशिक्यासाठी मार्गदर्शक |

शेवटी तुम्ही शेतीला गांभीर्याने घेण्याचे ठरवले. त्यामुळे, खरेदीच्या यादीसह हा नवीन प्रवास सुरू करण्याचा निर्धार करून तुम्ही बागेच्या केंद्रात जा. वीस मिनिटांनंतर,...

error: Content is protected !!