Homeजिल्हाभोरगाव लेवा पंचायत शाखांचे विस्तारीकरण

भोरगाव लेवा पंचायत शाखांचे विस्तारीकरण

भोरगाव दि. २५ : भोरगाव लेवा पंचायत,पाडळसे,ता.यावल, जि.जळगाव,या सामाजिक संस्थेला तशी समुपदेशन कार्याची फार वर्षांपूर्र्वीची (जवळपास शंभर वर्ष) जुनी पार्श्वभूमी लाभलेली आहे. लेवा समाजातील कौटुंबिक वाद-विवादग्रस्त पती-पत्नीचे समुपदेशन करणे,विवाहपूर्व समुपदेशन करणे,युवा युवती समुपदेशन व शैक्षणिक, कौटुंबिक समस्यांचे समुपदेशन करणे हे या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट व कार्य असुन सामुदायिक विवाहसोहळे आयोजित करणे, शेतकरी, महिला युवा युवती यांचेसाठी आरोग्य, उद्योग, शिक्षण, आर्थिक ,व्यावसायिक सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, विविध वयोगटातील महिला व पुरुष यांचेसाठी क्षमता-बांधणी,सबलीकरण,कला,क्रीडा,साहित्य व प्रदशर्ने यासारख्या उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक विकासाच्या संधी उपलब्ध करून देणे आणी समाजाच्या बदलत्या गरजांच्या परिस्थितीत त्यात दिवसेंदिवस सर्वत्र अद्यावतपणा आणणे या वर आता केंद्रीकरण होत आहे.

सद्यसस्थितीत कौटुंबिक समस्या,कौटुंबिक वाद-विवाद वाढत आहेत या पार्श्‍वभूमीवर समाजातील कौटुंबिक वाद विवादांना प्रतिबंध करण्याच्या दृष्टिकोनातून समुपदेशनाची चळवळ वाढवणे गरजेचे आहे हे विचारात घेऊन भोरपंचायत पाडळसे तर्फे मागणी होईल,त्या भागात समुपदेशन केंद्र उभारण्याची विधायक भुमिका घेतलेली आहे. सद्यस्थितीत मुंबई-कोंकण विभागासाठी तसेच नाशिक विभागासाठी नुकतीच भोरगाव लेवा पंचायत तर्फे समुपदेशन समित्या गठित झालेल्या असून लवकरच कार्यान्वित ही होत आहेत. मुंबई- कोकण विभागीय कार्यालय डोंबिवली येथे आहे तर नाशिक विभागीय कार्यालय नाशिक येथे आहे. सर्व विभागात सकल लेवा पाटीदार समाजातील अनुभवी, समाजप्रेमी, कौटुंबिक,व सामाजिक समस्यांची जाणीव असलेले,समायोजनक्षम आणी प्रगल्भ व्यक्तीमत्व समितीत समाविष्ट केलेले आहेत,सोबत नियंत्रण,समन्वय,व मार्गदर्शन यादृष्टीने एक कायर्कारिणी सदस्य जाणीवपूर्वक समन्वयक म्हणून दिलेला आहे.

समाज बांधवांनी समुपदेशनाच्या दृष्टिकोनातून खाली दर्शवल्याप्रमाणे संपर्क साधावा.समिती सदस्य : १)श्री. तुकाराम (बाळू)प्रल्हाद नेहेते (शाखा प्रमुख), (मोबाईल क्र. 9702869696),२)श्री. संजय चुडामण झांबरे (उपाध्यक्ष) (मोबाईल क्र.7977702951),३)सौं. भाग्यश्री मुरलीधर पांचपांडे (सचिव), (मोबाईल क्र. 9987079281),४)अनिल प्रभाकर महाजन (खजिनदार), (मोबाईल क्र. 8097313258), ५)श्री. नितीन काशिनाथ जावळे (सहसचिव),(मोबाईल क्र.9320665475).६)श्री. श्याम सुंदर पाटील (कायदेशीर सल्लागार),(मोबाईल क्र. 8879111888),७)श्री. विष्णू प्रभाकर चौधरी (मोबाईल क्र. 7507907037),८ )श्री.गेंदा वामन पाटील (मोबाईल क्र. 9867825151),९ )सौं. प्रतिभा किसन वराडे (मोबाईल क्र. 9921579057),१०)सौं. निशा शांताराम अत्तरदे. (मोबाईल क्र. 9224337849),११)श्री. सतीश वसंत कोल्हे (मोबाईल क्र. 9028662042),१२).श्री. उज्ज्वल भागवत चौधरी.( मोबाईल क्र.9822175531), पदसिद्ध सदस्य:- : १ ) श्री. ललित कुमार रमेश पाटील(कुटुंब नायक) ,२ ) डॉ.उल्हास पाटील(अध्यक्ष),३ ) श्री.संजय मनोहर राणे(सचिव, भोरगांव लेवा पंचायत ठाया पाडळसे), ४ )डॉ. श्री. ज्ञानेश्वर एकनाथ पाटील,( मोबाईल क्रमांक 9923722323)(समन्वयक व कायर्कारिणी सदस्य, मुख्य शाखा पाडळसे). समाजातील कौटुंबिक समुपदेशनाची आवश्यकता असलेल्या गरजू समाजबांधवांनी समितीशी संपर्क साधून समुपदेशन सेवेचा लाभ घ्यावा.यथोचित पद्धतीनेच आपल्या कौटुंबिक वाद विवादास्पद विषयाबाबत योग्य तो समुपदेशनाचा लाभ मिळवण्याच्या दृष्टीने आन्तरक्रियात्मक संवाद व संपर्क ठेवून भोरपंचायतीची प्रतिष्ठा उंचावण्यास सहकार्य करावे. तसेच पुणे,औरंगाबाद,मलकापूर या विभागांसाठी ही समित्यांच्या रचनेची प्रक्रीया चालू आहे याची कृपया नोंद घ्यावी.या प्रत्येक विभागातून समुपदेशन समितीशिवाय मनुष्यबळ विकसनाच्या दृष्टिकोनातून विविध क्षेत्रातील सकल लेवा महिला,आणी सकल लेवा युवा युवती गट स्थापन केले जात आहेत. आपणही भोरपंचायतीच्या विधायक कार्यात सहभागी होऊन लेवापाटीदार भोरपंचायतीचे व्यासपीठ अधिकाधिक भक्कम करण्यासाठी नम्र आवाहन करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जपानी कंपन्या परदेशी नोकरीच्या संधींसाठी AISSMS अभियांत्रिकी विद्यार्थ्यांशी संलग्न आहेत

एआयएसएसएमएस येथे आयोजित जागतिक करिअरच्या उभारणीवर अभिमुखता कार्यक्रम पुणे : जपानमध्ये कुशल अभियंत्यांची मागणी सतत वाढत असल्याने जपानी उद्योगातील एका शिष्टमंडळाने अलीकडेच AISSMS...

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) संदर्भात भाजप कार्यालयात माजी खासदार किरीट सोमय्या यांची मार्गदर्शन बैठक...

उल्हासनगर दि. २८ ( प्रमोद दळवी )  : भारतीय जनता पक्षाच्या उल्हासनगर येथील कार्यालयात सोमवारी  विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR)) या विषयावर महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन...

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) २०२६ : १४१-उल्हासनगर विधानसभा मतदारसंघातील मतदारांना सहकार्याचे आवाहन

उल्हासनगर दि.२८ ( प्रमोद दळवी )  : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत करण्याच्या उद्देशाने विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (Special...

गुवाहाटी येथे नवनिर्वाचित नगरसेवकांसाठी विशेष प्रशिक्षण वर्ग यशस्वीरीत्या संपन्न. ; ७६ नगरसेवकांचा सहभाग

उल्हासनगर दि. २८ ( प्रमोद दळवी )  : अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वतीने गुवाहाटी (आसाम) येथे नवनिर्वाचित नगरसेवकांसाठी आयोजित करण्यात आलेला पाच दिवसीय...

भव्य सायकल टूर मार्गांवर खड्डे दिसू लागल्याने कार्यकर्त्यांनी ऑडिटची मागणी केली | पुणे बातम्या

फर्ग्युसन कॉलेज रोडवर खड्डे पडले आहेत पुणे : या वर्षी जानेवारी महिन्यात झालेल्या उद्घाटनाच्या भव्य सायकल टूरसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे पुनर्संचयित केल्यानंतर शहरातील अनेक...

error: Content is protected !!