Homeशहरभुयारी गटार योजनेचे काम तात्काळ बंद करा - मनसे

भुयारी गटार योजनेचे काम तात्काळ बंद करा – मनसे

उल्हासनगर दि.२४ : ७ जून पासुन नियमीत पावसाळा सुरु होता.व सध्या अवकाळी पाऊस सुरु आहे.व येत्या १५ ते २० दिवसात म्हणजेच ७ जून पासून नियमित पावसाळा सुरु होईल. त्यामुळे भुयारी गटार टाकण्यासाठी ईगल कंपनी कडून जे रस्ते खोदण्याच काम सुरु आहे. ते तात्काळ बंद करून अगोदर खोदलेल्या सर्व रस्त्यांची दुरुस्ती तातडीने करण्यात यावी.जेणे करून पावसाळ्यात होणारे छोटे मोठे अपघात टाळता येतील.व यापुढे पावसाळा संपेपर्यंत कोणतेही रस्ते खोदू नये असे सक्त आदेश ठेकेदाराला देण्यात यावेत.अशी मागणी मनसे जिल्हा अध्यक्ष बंडू देशमुख व शहर अध्यक्ष संजय घुगे यांनी महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्यकडे निवेदनाद्वारे केली आहे.

पालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी बैठक घेऊन ठेकेदाराला तश्या तात्काळ सूचना देण्यात येतील असे आश्वासन मनसे शिष्टमंडळाला दिले. ईगल कंपनीने भुयारी गटाराच्या कामासाठी जे रस्ते अतापर्यंत खेदले ते रस्ते सुस्थितीत करणे कंपनीला बंधनकारक आहे. परंतु अतापर्यंत जेवढे रस्ते खोदले त्या सर्व रस्त्यांची दुरुस्ती ही ठेकेदाराच्या वतीने निकृष्ट पद्धतीने करण्यात आलेली आहे. याची आपण स्वतः जातीने शाहनिशा करावी. ठेकेदाराने खोदलेल्या रस्त्यामुळे आजपर्यंत अनेक अपघात झाले परंतु याचे प्रशासन किंवा ठेकेदार यांना कोणतेही सोयर सुतक नाही असा आरोप ही मनसेच्या वतीने करण्यात आला.

ईगल कंपनीने भुयारी गटार साठी आत्तापर्यंत जेवढे रस्ते खोदुन व दुरुस्त केले आहेत, त्या सर्व रस्त्यांच्या कामाची उच्चस्तरिय चौकशी करण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली. प्रशासनाने नेमलेले सल्लागार हे महापालिकेचे लाखो रुपये मानधन घेऊन काम मात्र ठेकेदाराच करतात असा आरोप ही मनसेच्या वतीने करण्यात आला आहे .त्यामुळे अश्या सल्लगाराची तात्काळ उचल बांगडी करण्यात यावी.अशीही मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली. यावेळी जिल्हा अध्यक्ष बंडू देशमुख शहर अध्यक्ष संजय घुगे उपशहर सचिन बेंडके, मुकेश शेठपलांनी, रवी पाल यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मोशी दुर्घटनेच्या चौकशीसाठी राज्याने समिती स्थापन केली, पीसीएमसीने शहर आणि पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता...

पुणे : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (पीसीएमसी) प्रशासकीय इमारतीवर 8 जुलै रोजी झालेल्या मोशी कचरा ते ऊर्जा प्रकल्पातील दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने...

ठाणे जिल्हा रुग्णालयाच्या धर्तीवर उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयाचा पुनर्विकास होणार – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

मध्यवर्ती रुग्णालय नव्याने उभारणीसाठी जलदगतीने विकास आराखडा तयार करावा - खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे कामगार रुग्णालयाची क्षमता वाढवून सहा महिन्यात लोकार्पण होणार उल्हासनगर दि....

उल्हासनगर गारमेंट फेअर 3.0 च्या समारोपाला उद्योगमंत्री संजय सावकारे यांची भेट : आयोजकांच्या प्रयत्नांचे...

उल्हासनगर दि. १४ ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगरच्या वस्त्रोद्योगाला नवी दिशा देणाऱ्या उल्हासनगर गारमेंट फेअर (UGF) 3.0 च्या समारोपाच्या दिवशी महाराष्ट्राचे उद्योगमंत्री संजय...

स्वत:हून सूचनेनंतर एनजीटीने मोशी दुर्घटनेवर नागरी संस्था, प्रदूषण मंडळाकडून उत्तर मागवले

पिंपरी चिंचवड महानगरपालिका संचालित वेस्ट-टू-एनर्जी (डब्ल्यूटीई) प्लांटची तीन मजली प्रशासकीय इमारत मोशी येथील कचऱ्याचा ढिगारा कोसळल्याने घटनास्थळावरील ढिगारा हटवत आहे. पुणे : नॅशनल...

ज्ञानदा विद्या मंदिरात माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याने उजळल्या जुन्या आठवणी

उल्हासनगर दि. १४ ( प्रमोद दळवी ) :- शाळेच्या प्रांगणात रंगलेला माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा हा एक अत्यंत भावुक आणि आनंददायी सोहळा असतो.वर्षानुवर्षानंतर जुन्या...

error: Content is protected !!