Homeशहरबाई तुझा आशिर्वाद ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला : उल्हासनगरातील अक्षता...

बाई तुझा आशिर्वाद ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला : उल्हासनगरातील अक्षता प्रमोद टाले झळकणार मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत

उल्हासनगर दि. १ ( प्रमोद दळवी ) : आनंदी नंतर स्टार प्रवाहवर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे नवी मालिका बाई तुझा आशीर्वाद ही मालिका घराला घरपण देणाऱ्या स्त्रीच्या कथाभोवती फिरते म्हणजेच बाईच्या भूमिकेवर लक्ष केंद्रीत आहे. कथेच्या सुरुवातीला ज्या घराला बाईच्या असण्याची सवय नाही, अशा पूर्णपणे पुरुषप्रधान घरात अवनीचं आगमन होतं आणि तिथून नात्यांचा नवा प्रवास सुरू होतो. अवनीच्या येण्याने त्या घरात फक्त एक व्यक्ती नाही तर समज, संवाद, आपुलकी आणि घरपण येतं. या घराला घरपण देणाऱ्या अवनीच्या भूमिकेत उल्हासनगरातील अक्षता प्रमोद टाले ही नवोदित अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे .

प्रेक्षक आता या मालिकेच्या कथानकाची आणि नवोदित अभिनेत्रीच्या अभिनयाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. रुईया कॉलेजमधून फिलॉसॉफी विषयात ड्रिग्री घेतलेल्या अवनीला लहानपणापासूनच अभिनय क्षेत्र खुणावत होतं. ७ वर्षांची असतानाच तिने कथ्थक शिकायला सुरुवात केली. अवनीच्या नृत्यकलेतूनच तिला तिच्या आयुष्यातली ङ्गस्टारफ ही पहिली एकांकिका मिळाली. ही एकांकिका खूप गाजली. त्यानंतर गुड बाय किस, अत्तरमन अश्या अनेक एकांकिका अवनीने केल्या.

याच दरम्यान तिला बाई तुझा आशीर्वाद या मालिकेतल्या अवनी या मुख्य नायिकेच्या भूमिकेसाठी विचारणा झाली. अवनी दिसायला सुंदर.. बोलायला लाघवी.. मीतभाषी. घरात आई-बाबांची लाडकी असली तरी तिला आई वडिलांच्या प्रेमळ शब्दांपुढे आपला हट्ट रेटता येत नाही. अवनी आपल्या स्वप्नांचा पाठलाग कसा करणार याची गोष्ट मालिकेतून उलगडेल. अवनी या भूमिकेप्रमाणेच अक्षता देखिल खूप महत्त्वाकांक्षी आहे. खऱ्या आयुष्यातही अभ्यासात प्रचंड हुशार आणि सतत नवं काहीतरी करण्याची धडपड यामुळेच अवनी हे पात्र खूप भावल्याचं अक्षता म्हणते. त्यामुळेच ही मालिका केवळ एक अभिनयाची संधी नसून स्वतःला व्यक्त करायची संधी असल्याची भावना अवनीने (अक्षताने ) व्यक्त केली. अक्षता प्रमोद टाले ही माजी नगरसेवक प्रमोद टाले यांची कन्या असून तिने स्टार प्रवाह वरील नवीन मालिकेत एन्ट्री केल्यामुळ उल्हासनगरातून तिच्यावर सर्वत्र अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

IND vs ENG 2रा ODI: विराट कोहलीने इंग्लंडविरुद्धच्या आणखी एका ODI अर्धशतकासह व्हिव्ह रिचर्ड्सची...

विराट कोहलीने व्हिव्ह रिचर्ड्सची बरोबरी केली विराट कोहलीने गुरुवारी कार्डिफ येथील सोफिया गार्डन्स येथे झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात आणखी एक अर्धशतक झळकावून इंग्लंडविरुद्धचा...

मुंबई उच्च न्यायालयाने सर्व पोलिस ठाण्यांमधील सीसीटीव्ही, फुटेजचा कालावधी जतन केल्याबद्दल डीजीपीचा अहवाल मागवला

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने राज्याच्या पोलीस महासंचालकांना महाराष्ट्रातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये तथ्य शोधून काढण्याचे निर्देश दिले आहेत आणि सीसीटीव्ही कॅमेरे आणि...

बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टरचा आत्महत्या, 14 जणांवर गुन्हा | पुणे बातम्या

पुणे : गुलटेकडी, मार्केट यार्ड येथे गुरुवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास एक 65 वर्षीय इमारत कंत्राटदार घरातील पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.स्वारगेट...

यूएस मधील 5 कमी प्रसिद्ध राष्ट्रीय उद्याने जी आश्चर्यकारकपणे रिकामी आणि शांत आहेत

नॉर्थ कॅस्केड्स नॅशनल पार्क हे अमेरिकन आल्प्स म्हणूनही ओळखले जाते. 300 पेक्षा जास्त हिमनद्या असूनही हे यूएस मधील सर्वात कमी भेट दिलेल्या राष्ट्रीय उद्यानांपैकी...

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या कल्याण जिल्हा कक्ष प्रमुखपदी सौ. मीना (ताई) सोंडे यांची नियुक्ती

उल्हासनगर दि १६ ( प्रमोद दळवी )  : वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या कल्याण जिल्हा (उल्हासनगर व अंबरनाथ) कक्ष प्रमुखपदी सौ. मीना...

error: Content is protected !!