Homeशहरप्राचीन शिव मंदिराच्या सुशोभीकरणासाठी पालिकेची जवळपास ३० हून अधिक घरांवर तोडक कारवाई...

प्राचीन शिव मंदिराच्या सुशोभीकरणासाठी पालिकेची जवळपास ३० हून अधिक घरांवर तोडक कारवाई : संताप्त नागरिक कुटुंबासह रस्त्यावर, पोलिसांचा लाठीचार्ज, एक गरोदर महिला जखमी

  • प्रकल्पामध्ये बाधित झालेल्या घरांचे खासदार पुनर्वसन करणार – आमदार बालाजी किणीकर

उल्हासनगर दि ७ ( प्रमोद दळवी ) : अंबरनाथ येथील शिवमंदिर परिसराचा शुशोभीकरण करण्यात येत असून त्या ठिकाणी जवळपास ३०  हून अधिक घरांना उल्हासनगर महानगरपालिकेने नोटीसा बजावून घर खाली करण्यास सांगितले होते. पण गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी राहत असलेल्या नागरिकांनी आम्हाला पर्याय जागा उपलब्ध करून द्या किंवा आम्हाला दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करा अशी मागणी करत घर खाली न केल्याने अखेर महानगरपालिकेने या घरांवर शनिवारी तोडक कारवाई केली.

अंबरनाथ येधील प्राचीन शिवमंदिर परिसराचा विकास करण्याचा प्रकल्प अंबरनाथ नगरपरिषदेने हाती घेतला आहे. सदर प्रकल्पांतर्गत वालधुनी नदीच्या तीरावरील सांडपाण्याचा नाला उल्हासनगरकडे जाणाऱ्या विद्यमान रस्त्यावरील मुख्य पुलाच्या पलीकडे वळविण्यासाठी उल्हासनगर महानगरपालिका प्रभाग समिती क्र.४ हद्दीतील एकूण ३१ कच्चे व पक्के बांधकामे विकास कामाने बाधीत होत होती . शनिवारी प्रभाग समिती क्र.४ कार्यक्षेत्राअंतर्गत एकता नगर, कैलाश कॉलनी शिव मंदिर जवळ, उल्हासनगर-४२१००५ या ठिकाणी घाट विकसित करण्याच्या विकासकामात बाधीत होणाऱ्या ३० पक्के बांधकामे (घरे) व ०१ दुकान या प्रमाणे एकूण ३१ बांधकामे निष्कासित करण्यात आली आहेत. उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त यांचे मार्गदर्शनानुसार प्रभाग समिती क्र.४ च्या सहायक आयुक्त, श्रीम. अलका पवार यांनी पोलीस बंदोबस्तासह कारवाई केली. त्यावेळी कारवाई करते वेळी गणेश शिंपी, सहायक आयुक्त, प्रभाग समिती क्र.२ तसेच पोलिस प्रशासनातील अधिकारी / कर्मचारी उपस्थित होते.

प्रचंड पोलीस बंदोबस्तात महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी या घरांवर तोडक कारवाई सुरू केल्याने संतापलेले नागरिक आपल्या कुटुंबासह रस्त्यावर उतरले. आमच्याकडे लाईट बिल आहे, पाणी बिल आहे व आम्ही गेल्या ४० ते ५०  वर्षापासून या ठिकाणी राहतो. आम्ही बेकादेशीर कसे असा प्रश्न नागरिकांनी विचारत आपले घर खाली करण्यास नकार दिला. अखेर पोलिसांनी प्रत्येकांना घरातून खेचून बाहेर काढले. त्यावेळी पोलिसांनी नागरिकांमध्ये काही ठिकाणी धक्काबुक्की ही झाली. याशिवाय पोलिसांनी आमच्यावर लाठीचार्ज केला. त्यात आमचे काही नागरिक व  गरोदर महिला ही जखमी झाली असा आरोप त्या नागरिकांनी केला आहे.

खासदार श्रीकांत शिंदे यांनी आम्हाला तुम्हाला पर्याय जागा दिले जाईल अशा आश्वासन दिले होते. पण निवडणुकीनंतर मात्र सर्वांनीच आमच्या समस्या कडे पाठ फिरवली असा आरोप ही नागरिकांनी केला आहे. वारंवार शिंदे यांच्याकडे जाऊनही व त्यांना आमच्या समस्या सांगूनही पालिकेने आम्हाला नोटीसी पाठवून कारवाईला सुरुवात केल्याने व हि  कारवाई थांबवण्यासाठी विनंती करूनही कोणीच आमच्या मदतीला धावून आले नाही असा आरोप ही नागरिक करीत आहेत. पालिकेच्या या कारवाईमुळे जवळपास ३० हून अधिक कुटुंब रस्त्यावर आले आहेत आपल्या न्याय हक्कासाठी आणि आम्हाला पर्याय जागा उपलब्ध करून द्यावी या मागणीसाठी नागरिकांनी अमरण उपोषण त्या ठिकाणी सुरू केले आहे.

खासदार श्रीकांत शिंदे यांच्या शब्दाला बळी पडून आज हे आमच्यावर दिवस आले आहे असे नागरिक बोलत आहेत. त्यांनी आम्हाला शब्द दिला होता की पहिले तुमचा पुनर्वसन करू नंतर तुमचे घर तोडण्यात येतील पण त्यांनी तो शब्द पाळला नाही असा संतप्त सवाल नागरिक करीत आहेत. पालिकेने असविधानिक मार्गाने लोकांची घरे तोडले आहेत जोपर्यंत लोकांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही याच ठिकाणी बसून राहणार आणि इथे बेमुदत आमरण उपोषण सुरू करत असल्याचे नागरिकांनी सांगितले.

याशिवाय काही पोलिसांनी महिलांना देखील अमानुषपणे मारहाण केला असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. काही जणांना अमानुषपणे घरातून खेचून बाहेर काढण्यात आले. भर उन्हामध्ये ही तोडक कारवाई करण्यात आल्याने बेगर झालेले कुटुंब उन्हामध्ये उभे राहून ही कारवाई थांबवण्यासाठी विनंती करताना दिसत होते. पालिकेच्या या तोडक कारवाईमुळे जवळपास ३०  हून अधिक कुटुंब बेगर झाले  आहेत

प्राचीन शिवमंदिर परिसरातील ३०  घरांवर पालिकेने तोडक कारवाई केल्याबाबत व त्या परिसरातील नागरिक बेघर झाल्या प्रकरणी स्थानिक आमदार बालाजी किणी कर यांच्याकडे विचारणा केले असता त्यांनी सांगितले खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शिवमंदिर परिसरात ड्रीम प्रोजेक्ट सुरू होणार आहेत. याशिवाय प्राचीन शिव मंदिराचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. या प्रकल्पामध्ये ज्या नागरिकांची घरे बाधित झाली आहेत. त्या सर्वांना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे पर्यायी जागा उपलब्ध करून देणार आहेत. किंवा एम.एम.आर.डी.ए च्या माध्यमातून घरे देखील उपलब्ध करून देणार आहेत. श्रीकांत शिंदे यांनी शब्द दिला आहे तो शब्द ते पूर्ण करतील. कुठल्याही कुटुंबाला ते उघड्यावर पडून देणार नाहीत असे बालाजी किणीकर यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शुभमन गिल ते हार्दिक पांड्या पर्यंत: GT आणि MI यांच्यातील आजच्या IPL 2026 च्या...

हार्दिक पांड्या आणि शुभमन गिल (इमेज क्रेडिट: BCCI/IPL) नवी दिल्ली: पाच वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्स आयपीएल 2026 च्या कठीण मोहिमेचा सामना करत...

बटाटे वाढवण्यासाठी सर्वोत्तम वेळ: ब्रिटीश घरगुती बागांमध्ये बटाटे कधी वाढवायचे |

ब्रिटनमध्ये तुमच्या स्वत:च्या बटाट्याची लागवड केल्यास एक स्वादिष्ट बक्षीस मिळते. लागवडीच्या खिडक्या समजून घेणे ही भरपूर कापणीची गुरुकिल्ली आहे. 'अर्ली' साधारण 12 आठवड्यांत...

शाळा विशिष्ट दुकानातून गणवेश, पुस्तक खरेदीचा आग्रह धरू शकत नाहीत

पुणे: राज्याच्या शिक्षण विभागाने खाजगी शाळांना पालकांना गणवेश, पुस्तके किंवा इतर शैक्षणिक साहित्य विशिष्ट विक्रेत्यांकडून किंवा शाळेकडून विकत घेण्यास भाग पाडण्यास मनाई केली आहे...

अंमली पदार्थांच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी, मुंबई पोलिसांनी बीकेसी येथे मैफिलीसाठी होकार नाकारला

मुंबई कॉन्सर्टमधील मृत्यू (फाइल फोटो) मुंबई: रविवारसाठी नियोजित आंतरराष्ट्रीय अंडरग्राउंड हाऊस आणि टेक्नो म्युझिक इव्हेंट काही तासांपूर्वीच रद्द करण्यात आला होता, बीकेसी...

error: Content is protected !!