Homeशहरप्रभागात दूषित पाणीपुरवठा : नगरसेवकाने सभागृहात महापौरांच्या समोर ठेवली दूषित पाण्याची बाटली

प्रभागात दूषित पाणीपुरवठा : नगरसेवकाने सभागृहात महापौरांच्या समोर ठेवली दूषित पाण्याची बाटली

उल्हासनगर दि.१८ ( प्रमोद दळवी ) :  बुधवारी उल्हासनगर महापालिकेत सर्वसाधारण महासभेचे आयोजन करण्यात आले होते. स्थायी समितीच्या १६ सदस्यांची निवड करण्याकरिता ही महासभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी शिवसेना नगरसेवक सुरज सोनकांबळे यांनी त्यांच्या प्रभागात गेल्या अनेक महिन्यापासून दूषित पाणीपुरवठा होत असल्याने चक्क दूषित पाण्याने भरलेली बाटली आणून सभागृहातच महापौरांच्या समोर ठेवल्याने सभागृहात या दूषित पाण्याचा विषय गाजला.

उल्हासनगर शहरातील कम्प  नंबर -४ परिसरातील लालचक्की येथे गेल्या अनेक महिन्यापासून दूषित पाणीपुरवठा होत आहे. शिवसेना नगरसेवक सुरज सोनकांबळे यांनी या दूषित पाणीपुरवठा बाबत महापालिका प्रशासनाकडे तक्रार केली होती. पण या तक्रारीची दखल घेतली गेली नसल्याने अखेर बुधवारी सभागृहात महासभा सुरू असताना नगरसेवक सुरज सोनकांबळे यांनी सोबत आणलेली दूषित पाण्याचे बाटली महापौर यांच्यासमोर जाऊन ठेवली. माझ्या प्रभागात गेल्या अनेक महिन्यापासून दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. त्या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून या दूषित पाण्याबाबत प्रशासनाकडे त्यांनी तक्रार केली होती पण त्या समस्या कडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नगरसेवक सुरज सोनकांबळे यांनी केला. त्यामुळे या दूषित पाण्यासंदर्भात प्रशासनाचा लक्ष वेधण्यासाठी त्यांनी सभागृहातच दूषित पाण्याने भरलेली बाटली  आणली असल्याचे सांगितले. याशिवाय त्यांनी महापौर व आयुक्तांना आम्ही हे दूषित पाणी कसं प्यायचं असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे या दूषित पाण्याचा प्रश्न महासभेत गाजला. त्यावेळी महापालिका आयुक्त व महापौर यांनी सुरज सोनकांबळे यांना हा दूषित पाण्याचा प्रश्न लवकर सोडविण्यात येईल. असे आश्वासन दिले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंतिम मुदत आज संपत आहे, परंतु राज्यातील 1 कोटीहून अधिक वाहने आणि पुण्यातील 15...

पुण्यात एक कामगार दुचाकीला HSRP चिकटवतो पुणे : खूप कमी अधिकृत विक्रेते, गोंधळलेला रोलआउट, एक गोंधळलेली ऑनलाइन अपॉइंटमेंट सिस्टम आणि प्रचंड किंमत, एप्रिल...

जर्मनी विरुद्ध पराग्वे, फिफा विश्वचषक 2026 फेरीतील 32 थेट स्कोअर- 0-1: पहिल्या हाफमध्ये एन्सिसो...

FIFA विश्वचषक 2026 च्या त्यांच्या महत्वाकांक्षेला विजय मिळवून देण्यास काही कमी पडेल हे जाणून जर्मनीने त्यांच्या बाद फेरीची मोहीम सुरू केली. त्यांच्या मार्गात पॅराग्वे...

हृदयाच्या धक्क्यानंतर मुंबईच्या डॉक्टरांनी दुर्मिळ लिपिड विकार असलेल्या अर्भकाला वाचवले | मुंबई बातम्या

मुंबई : परळच्या बाई जेरबाई वाडिया रुग्णालयातील डॉक्टरांनी अडीच महिन्यांच्या चिमुरडीचे रक्त काढले तेव्हा ते गोठले. परिचित किरमिजी रंगाच्या ऐवजी, सिरिंज जाड,...

बिष्णोई टोळीच्या सदस्याने पुण्यातील कपड्याच्या दुकानदाराकडे 2 कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे

पुणे : बिष्णोई टोळीतील एका सदस्याने खडकवासल्याजवळील उत्तमनगर येथील एका कपड्याच्या दुकानदाराला धमकावून शनिवारी सकाळी २ कोटी रुपयांची मागणी केली, असे पोलिसांनी...

अमेरिकेतील 5 शहरे जिथे 100 वर्षांपूर्वी वेळ थांबल्यासारखे वाटते

जिम थॉर्प, उर्फ ​​अमेरिकेचे स्वित्झर्लंड, त्याच्या डोंगराळ वातावरणामुळे, त्याच्या शतकानुशतके जुन्या व्हिक्टोरियन वास्तुकलासाठी ओळखले जाते. हे शहर मूळतः 19 व्या शतकाच्या सुरुवातीस माउच चंक...

error: Content is protected !!