- दर्शनासाठी भाविकांची गर्दी
- कल्याण डोंबिवली आणि उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्तांनी केली विठ्ठल रुक्मिणीची आरती
- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्ञानदिंडी सहभागी होऊन घेतले विठुरायाचे दर्शन
उल्हासनगर दि . ६ ( प्रमोद दळवी ) : ठाणे जिल्ह्यातील प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उल्हासनगरच्या प्रसिद्ध बिर्ला मंदिरात आषाढी एकादशी निमित्त पहाटेपासून भक्तांच्या जयघोषाने गजरुन गेले. दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती .आषाढी एकादशीनिमित्त, कल्याण चैरिटी ट्रस्ट, सेंच्युरी रेऑन, बी.के. बिर्ला महाविद्यालय, बी.के. बिर्ला नाईट कॉलेज, बी.के. बिर्ला पब्लिक स्कूल आणि सेंच्युरी रेऑन हायस्कूल यांनी भव्य ज्ञान दिंडी कार्यक्रमाचे आयोजन केले होते . उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्ञानदिंडी सहभागी होऊन विठुरायाचे दर्शन घेतले.

बिर्ला मंदिर हे ठाणे जिल्ह्यातील प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाते आषाढी कार्तिकी एकादशीला या मंदिरात भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात.आषाढी एकादशी निमित्त पहाटे उल्हासनगर महानगरपालिकेच्या आयुक्त मनीषा आव्हाळे आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांनी श्री विठ्ठल-रुख्मिणीच्या महापूजेस उपस्थित राहून आपली निष्ठा आणि श्रद्धा व्यक्त केली. या महापूजेस सेंचुरी रेऑन कंपनीचे प्रमुख ओमप्रकाश चितलांगे, दिग्विजय पांडे आणि श्रीकांत गोरे हेही उपस्थित होते. त्यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले . पहाटे पाच वाजता अभिषेक, आणि त्यानंतर सहा वाजता आरती भाविकांच्या साक्षीने पार पडली. मंदिर परिसर टाळ-मृदंगाच्या गजरात न्हालेला दिसून आला.

आषाढी एकादशी निमित्त काढण्यात आलेल्या ज्ञान दिंडी कल्याण येथील बिर्ला महाविद्यालयाच्या प्रांगणातून सुरू झाली आणि शहाड येथील विठ्ठल मंदिरात समाप्त झाली . ज्ञान दिंडीत, बिर्ला स्कूल, बिर्ला कॉलेजच्या हजारो विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा परिधान करत टाळ मृदुंग ढोलकीच्या गजरात विठ्ठलनामात तल्लीन होत सहभाग घेतला होता. हि ज्ञान दिंडी कॉलेज पासून शहाडच्या विठ्ठल मंदिरापर्यंत ज्ञानोबा- तुकाराम विठ्ठल- विठ्ठल जयघोष घुमत होता. ही दिंडी केवळ धार्मिक परंपरेची नव्हे तर शिस्त, संस्कार, सामूहिक सहभागीची जिवंत उदाहरण ठरली.
बिर्ला मंदिरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेत आरती केली. त्यावेळी उल्हासनगरचे आमदार कुमार आयलनी, अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर, सेंचुरी रेऑन कंपनीचे ओमप्रकाश चितलंगे, राष्ट्रवादीचे प्रमोद हिंदुराव, शिवसेना उल्हासनगर महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी, अरुण आशान आधी उपस्थित होते .
आषाढी एकादशी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या ज्ञानदिंडीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील सहभागी झाले होते. त्यांनी सांगितले आज महाराष्ट्र मध्ये आषाढी एकादशीचं भक्तिमय वातावरण निर्माण झाल्याचे आपण पाहतो. पंढरपूर मध्ये देखील लाखो वारकरी पांडुरंगाच्या भक्ती मध्ये तलीन झालेले आपण पाहतो त्याचबरोबर सकाळी मुंबईमध्ये वडाळा येथे प्रति पंढरपूर तिथे देखील हजारो लाखो वारकरी पांडुरंगाच्या दर्शनाला आले. आज इथं एक आगळा वेगळा वारीचा उपक्रम बिर्ला स्कूल, बिर्ला कॉलेज, बिर्ला मंदिर आणि सेंचुरी कंपनीच्या माध्यमातून चितलांगे सर आणि सर्व सहकार्याने आयोजित केले. या ज्ञानदिंडीमध्ये वारकरी म्हणून आज विद्यार्थी ही ज्ञानाची दिंडी या ठिकाणी पुढे नेत आहेत. हे विद्यार्थी पुढे आपल्या देशाचे भवित्य आहेत. खऱ्या अर्थाने हा ज्ञानसागर या ठिकाणी आपण पाहतोय खऱ्या अर्थाने हा उपक्रम अतिशय वेगळा उपक्रम या ठिकाणी आषाढी एकादशीच्या निमित्ताने दरवर्षी आयोजित केला जातो.
या दिंडीत मला देखील सहभागी होता आलं मी सगळ्या वारकऱ्यांना आणि या ज्ञान दिंडीमध्ये सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा देतो .पांडुरंगाला एवढेच पांडुरंगाला साकडं घालतो या महाराष्ट्रातला बळीराजा शेतकरी सुखी होऊ दे, चांगला पाऊस होऊ दे ,तो पडतोय, चांगलं पीक येऊ दे, बळीराजाला सुखी होऊ दे आणि माझ्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ ,शेतकरी, वारकरी ,महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या जीवनामध्ये सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे दिवस येऊ दे हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. मी नुकताच पंढरपूरला जाऊन आलो तिथे व्हीआयपी दर्शन बंद केल्यामुळे आता सर्वसामान्य वारकऱ्यांना दर्शन मिळत आहे. मी देखील रांगेत उभे राहून दर्शन घेतले असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

यावेळी माजी केंद्रीय मंत्री श्री. कपिल पाटील, आमदार विश्वनाथ भोईर, कुमार आयलानी, आमदार डॉ बालाजी किणीकर , सुलभा गायकवाड, नरेंद्र पवार, प्रकाश भोईर, श्री. प्रमोद हिंदूराव, शिवसेना उल्हासनगर महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी, अरुण आशान ,महाविद्यालयीन शिक्षण संचालक डॉ. नरेश चंद्र, प्राचार्य डॉ. अविनाश पाटील, डॉ. हरीश दुबे, सुबोध दवे आणि सेंच्युरी रेयॉन युनिटचे प्रमुख श्री. दिग्विजय पांडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. महाविद्यालय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. ओ. आर. चितलांगे यांनी उपमुख्यमंत्र्यांना रुक्मिणी-विठोबाची मूर्ती, शाल, नारळ आणि तुळशीचे रोप देऊन सन्मानित केले आणि उपस्थित सर्व विठ्ठल भक्तांचे स्वागत केले.या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीची माहिती सेंच्युरियन कंपनीचे जनसंपर्क अधिकारी मेहुल लालका यांनी दिली,






























