Homeशहरनागरिकांच्या तक्रारींबाबत प्रतिनिधिमंडळाकडून महावितरणाला निवेदन

नागरिकांच्या तक्रारींबाबत प्रतिनिधिमंडळाकडून महावितरणाला निवेदन

उल्हासनगर दि.८ : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण महामंडळाच्या विरोधात नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी पैनल क्रमांक १२च्या एक प्रतिनिधिमंडळाने महावितरणला भेट दिली. या प्रतिनिधिमंडळात मा. नगरसेविका सविता तोरणे रगडे, प्रवक्ता शिवाजी रगडे, माजी नगरसेवक गजानन शेळके, फिरोज खान विभाग प्रमुख, दशरथ चौधरी उपविभाग प्रमुख, आदिनाथ पालवे शाखाप्रमुख, तानाजी माळी, टिओके युथ महासचिव विजय उबाळे, व्यापारी मंडळाचे अध्यक्ष दुर्गेश पांडे यांचा समावेश होता.वाढते विद्युत बिल, सातत्याने खंडित होणारा विद्युत प्रवाह आणि नवीन विद्युत मीटर जोडण्यात येणाऱ्या अडचणींबाबत विविध तक्रारी नागरिकांकडून प्राप्त झाल्या होत्या. या संदर्भात प्रतिनिधिमंडळाने कार्यकारी अभियंता हरीश भराडे यांची भेट घेऊन निवेदन दिले आणि नागरिकांच्या तक्रारी सोडवण्याविषयी विनंती केली.

सम्राट अशोक नगर, आनंद नगर, संतोष नगर, रेणुका सोसायटी, आशीर्वाद सोसायटी आणि वडोलगाव या परिसरात जुने पोल बदलून नवीन पोल लावण्याचे काम प्रलंबित आहे. सकाळी पाण्याच्या वेळी सम्राट अशोक नगर, रेणुका सोसायटी आणि आशीर्वाद सोसायटी या ठिकाणी सातत्याने विद्युत प्रवाह खंडित होतो, ज्यामुळे नागरिकांना पाणी मिळत नाही. नागरिकांचे हजार ते पंधराशे दरम्यान येणारे बिल आता अडीच ते तीन हजाराच्या वर गेलेले आहे, याची कारणे शोधून तक्रारीचे निवारण लवकरात लवकर करावे अशी मागणी त्यावेळी निवेदनाद्वारे करणायत आली. कार्यकारी अभियंता हरीश भराडे यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन येणाऱ्या दहा-पंधरा दिवसांमध्ये परिसरात एक शिबिर लावून नागरिकांच्या बिलासंदर्भातील तक्रारी लवकरात लवकर सोडवण्याचे आश्वासन दिले. त्यांनी इतर मागण्या देखील सकारात्मकपणे लवकरात लवकर सोडवण्याचे आश्वासन दिले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ग्लोबल चेस लीग मसुदा: मॅग्नस कार्लसन, अनिश गिरी, दिव्या देशमुख, कोनेरू हम्पी एकाच संघात...

मॅग्नस कार्लसन, अनिश गिरी, दिव्या देशमुख आणि कोनेरू हंपी ग्लोबल चेस लीग (GCL) च्या सीझन 4 साठी प्लेयर ड्राफ्टने सोमवारी भरपूर उत्साह निर्माण...

मुंबईतील चार रेल्वे एफओबी असुरक्षित म्हणून ध्वजांकित केल्याबद्दल बीएमसी आयआयटी-बीला ऑडिट करणार आहे

मुंबई: रेल्वेने असुरक्षित म्हणून ध्वजांकित केलेल्या दक्षिण आणि मध्य मुंबईतील रेल्वे ट्रॅकवरील चार पादचारी पुलांचे IIT बॉम्बे द्वारे स्ट्रक्चरल ऑडिट केले जाईल,...

‘सियाला कॅबमध्ये बसायचे नव्हते’: बाली ट्रिपच्या अगोदर, कॅब ड्रायव्हरच्या दाव्याने साहिल गोयल केतन अग्रवाल...

(LR) कॅब चालक (इमेज -सोशल मीडिया), केतन अग्रवाल, सिया गोयल आणि भाऊ साहिल गोयल पुणे: पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवालच्या कथित हत्येच्या काही दिवस...

थोटा वैकुंटम: एका किराणा दुकान मालकाचा गावातील मुलगा जो भारतातील सर्वात प्रसिद्ध कलाकारांपैकी एक...

तेलंगणाच्या एका गावातल्या किराणा दुकानातून थोटा वैकुंटमचा कलात्मक प्रवास बहरला. प्रारंभिक शंका असूनही, त्याच्या समर्पणामुळे त्याला आंतरराष्ट्रीय ख्याती मिळाली. त्याची आई आणि त्याच्या...

उल्हासनगर महापालिकेच्या प्रभाग समिती सभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल : चौघांचीही बिनविरोध निवड , अधिकृत...

उल्हासनगर दि . २९ ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगर महानगरपालिकेच्या  चार प्रभाग समितीच्या सभापतीपदासाठी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. महायुतीच्या वाटपानुसार शिवसेना...

error: Content is protected !!