- नवरात्रीचे औचित्य साधून घडला “अवतार वाघिणीचा”
मुंबई दि.६ : सर्वात आधी सांगायचं झाल तर कोकण कलारंजन हे व्यासपीठ नवोदीत कलाकारासाठी निर्माण केलेलं व्यासपीठ आहे. यामाध्यमातून नुकतच “गावकीत कंदाल” हे नाटक कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाल आहे. दसऱ्याचं अवचित साधून या पर्वातील “गावकीत कंदाल” या नाटकाचा शुभारंभाचा नारळ सांताक्रूझ येथे फोडण्यात आला. या प्रसंगी नाटकाची निर्माता – जयवंती कदम, लेखक – सुरज हातणकर, दिग्दर्शक – सचिन पालकर, सह दिग्दर्शक – जयेश मास्कर त्याचबरोबर अक्षय दुर्गोळी, अजित घाणेकर, गणेश कुळये, मंगेश कुळये, महेंद्र काप, प्रथम पवार, प्रभाकर गुरव, सायली मास्कर इत्यादी कलाकार उपस्थित होते. या पर्वातील पहिला आणि एकूण तिसरा या नाटकाचा प्रयोग लवकरच श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर दादर येथे होणार आहे. तरी या नाटकाच्या कोणाला तिकिट हव्या असतील तर संपर्क करा – 9370000353, 7021716868.

नवरात्रीचे औचित्य साधून कोकण कलारंजन टीम ने एक स्त्रीच्या सत्य जीवनावर आधारित मराठी लघुचित्रपट बनवला” अवतार वाघिणीचा”. या लघुचित्रपटात स्त्री चा विषय अगदी योग्य रित्या हाताळला गेला आहे. या लघुचित्रपटाचे लेखन सुरज हातणकर याने केले असून दिग्दर्शन अक्षय दुर्गोळी याने पूर्ण केले आहे. लघुचित्रपटात सर्वात महत्वाचा भाग म्हटला तर छायांकन आणि संकलन या गोष्टी विनय फटकरे आणि सुरज हातणकर यांनी अगदी उत्तम रित्या पूर्ण केल आहे त्यामुळे लघुचित्रपटाला एक वेगळा च रंग आला आहे. सोबत अक्षय दुर्गोळी, अजित घाणेकर, श्वेता चाळके, साक्षी रुमडे, सिमा चाळके, गणेश कुळये, संकेश कावणकर, महेंद्र काप, जयेश मास्कर, ओमप्रकाश तुमडे, या सर्व कलाकारांनी अतिशय सुंदर अभिनय करुन या कथेला योग्य तो न्याय दिला आहे. सर्व महिला वर्गणी कोकण कलारंजन या youtube वाहिनी वर जाऊन एकदा ” अवतार वाघिणीचा ” हा लघुचित्रपट नक्की बघा..





























