Homeशहरगौतमवाडीतील बहुप्रतीक्षित सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रारंभ ; महापौर अश्विनी निकम आणि...

गौतमवाडीतील बहुप्रतीक्षित सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रारंभ ; महापौर अश्विनी निकम आणि माजी आमदार पप्पू कलानी यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

उल्हासनगर, दि. १३ ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगर कॅम्प क्रमांक ३ मधील गौतमवाडी परिसरातील रहिवाशांची अनेक वर्षांपासूनची मागणी अखेर पूर्णत्वास जात असून, क्रिटीकेअर हॉस्पिटल ते गुरुगोविंद शाळेकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्याच्या सिमेंट काँक्रीटकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. या कामाचे भूमिपूजन महापौर अश्विनी कमलेश निकम आणि माजी आमदार पप्पू कलानी यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.

स्थानिक नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला हा रस्ता अनेक वर्षांपासून खराब अवस्थेत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. निवडणुकीदरम्यान नगरसेवक आकाश चक्रवर्ती आणि नगरसेविका डिंपल कुमारी ठाकूर यांनी या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्याचे आश्वासन दिले होते. व रस्त्याच्या दुरावस्थेबाबत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची भेट घेऊन निधीची मागणी केली. त्यांच्या पाठपुराव्यानंतर नगरविकास मंत्रालयाच्या माध्यमातून या रस्त्याच्या कामासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. हा रस्ता बिग सिनेमा, कल्याण-बदलापूर मार्ग तसेच मध्यवर्ती रुग्णालयाकडे जाणाऱ्या प्रमुख मार्गाला जोडणारा असल्यामुळे येथे दिवसभर मोठ्या प्रमाणावर वाहतूक असते. त्यामुळे या रस्त्याच्या काँक्रीटीकरणामुळे वाहतूक अधिक सुरळीत होण्यासह नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

यावेळी महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी यांनी सांगितले की, पॅनल क्रमांक ९ मधील शिवसेनेच्या नगरसेवकांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या रस्त्याच्या कामासाठी सुमारे दीड कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. अनेक वर्षांपासून नादुरुस्त असलेल्या या रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण होत असल्याने परिसरातील नागरिकांची मोठी समस्या दूर होणार आहे. शहरातील विविध भागांमध्ये नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने विकासकामे सुरू असून, त्याचाच एक भाग म्हणून या कामाची सुरुवात करण्यात आली आहे. लवकरच नागरिकांना दर्जेदार सिमेंट काँक्रीटचा रस्ता उपलब्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भूमिपूजन कार्यक्रमाला महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी, नगरसेवक आकाश चक्रवर्ती नगरसेविका डिंपल कुमारी ठाकूर, कमलेश निकम, नरेश दुर्गाणी, सुमित चक्रवर्ती, सुंदर मुदलीयार, जमनादास पुरुषवाणी, स्थायी समिती सभापतीबिट्टू भाई कलवतसिंग सोहता यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बुद्धिबळ विश्वचषकात मोठे बदल! FIDE 2027 पासून ओपन आणि महिला इव्हेंटसाठी नवीन फॉरमॅट मंजूर...

FIDE महिला विश्वचषक 2025 दिव्या देशमुख आणि FIDE विश्वचषक 2025 विजेत्या जावोखिर सिंदारोव (PTI फोटो) आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ (FIDE) ने 2027 पासून विश्वचषक...

मुंबईत खोदलेल्या खड्ड्यात १० वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू | मुंबई बातम्या

सुमारे साडेतीन तास ही शोधमोहीम चालली मुंबई : अंधेरी (पश्चिम) येथे सोमवारी दुपारी खोदलेल्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यात शिरल्याने एका 10 वर्षीय मुलाचा बुडून...

दिवसा घरापासून दूर? शहरी मतदारांसाठी बीएलओ संध्याकाळच्या फेऱ्या करणार | पुणे बातम्या

पुणे : 27 वर्षीय आयटी प्रोफेशनल स्नेहा राव काम संपवून घरी परतली तेव्हा तिला कळले की सध्या सुरू असलेल्या स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन...

घरातून नकारात्मक ऊर्जा काढून टाका: नकारात्मक उर्जेपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही तुमच्या घरातून 5 गोष्टी...

तुम्ही कधी कोणाच्या घरी गेलात आणि लगेच शांत वाटले आहे का? आणि मग काही घरे कशीतरी जड वाटतात, जरी सर्वकाही पूर्णपणे स्वच्छ...

गर्दी नियंत्रण आणि आपत्ती प्रतिसादासाठी राज्य पोलिसांनी कॉम्पॅक्ट सर्व्हिलन्स व्हॅन सुरू केल्या आहेत

गेल्या दोन महिन्यांत राज्यभरातील विविध पोलिस तुकड्यांकडे एकूण 360 व्हॅन सुपूर्द करण्यात आल्या आहेत. पुणे : गर्दीचे व्यवस्थापन आणि आपत्कालीन प्रतिसाद क्षमता मजबूत...

error: Content is protected !!