उल्हासनगर दि. १२ ( प्रमोद दळवी ) : केंद्र शासनाने गॅस सिलेंडरच्या दारामध्ये केलेल्या दरवाढीमुळे लाडक्या बहिणींमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. केंद्र शासनाने केलेल्या या दरवाढीमुळे महाराष्ट्रात महिला वर्गांनी जोरदार आंदोलन सुरू केले आहेत. उल्हासनगर देखील जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने गॅस सिलेंडरच्या किमतीत केलेल्या दरवाढीच्या निषेधार्थ जोरदार आंदोलन करण्यात आले. तसेच मोदी सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली.

प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार व प्रदेशाध्यक्ष.आ. हर्षवर्धन सपकाळ यांच्या सूचनेनुसार गुरुवारी प्रांत कार्यालयासमोर उल्हासनगर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे केंद्र शासनाने गॅस सिलेंडरच्या दरामध्ये केलेल्या मोठ्या दरवाढीच्या निषेधार्थ जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रोहित साळवे यांच्या नेतृत्वाखाली प्रतीकात्मक सिलिंडर हातात घेऊन जोरदार आंदोलन – निदर्शने करण्यात आले. सर्वसामान्यानी जगावे कसे , सिलिंडर विकत घ्यावे कसे ! मोदी सरकारचा सामान्य जनतेवर हल्ला , पुन्हा एकदा सामन्यांच्या खिशावर डल्ला ! मोदी सरकार हाय हाय,गरिबांनी खावे काय ! अश्या प्रकारचे सूचना फलक घेऊन घोषणा देण्यात आपल्या व त्या नंतर प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या आंदोलनात प्रदेश सचिव कुलदीप ऐलसिंहनी , ब्लॉक अध्यक्ष किशोर धडके , नानिक आहुजा , प्रदेश प्रतिनिधी वझरुद्दीन खान , सेवा दल अध्यक्ष शंकर आहुजा , नगरसेविका गटनेता अंजली साळवे , पुष्पा लता सिंह , मालती गवई , कालिंदी गवई , विजया मोर , राजेश फक्के ,रजनीकांत शाह , अन्सार शेख , ईश्वर जागियाशी ,मनोहर मनुजा ,हरमीत सिंग, आनंद साले ,आतिश जाधव व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





























